देवठाण गाव तीन दिवस बंद! येथे उपचार घेतलेले बापलेक पॉझिटीव्ह.!, दोन डॉक्टर क्वारंटाईन!


- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) : 
                       अकोले तालुक्यातील देवठाण येथे सिन्नर तालुक्यातील धुळवड येथील दोन व्यक्तींनी खाजगी रुग्णालयात उपाचार घेतले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून गावकर्‍यांनी आज शुक्रवार दि. 26 जून पासून सोमवार दि. 29 जून पर्यंत गाव स्वयंप्रेरणेने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, त्या कोरोना बाधित असणार्‍या बापलेकांवर उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले असून 13 हजार गावकर्‍यांनी स्वत:ला स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन केले आहे. एक प्रतिबंध म्हणून स्थनिक पुढारी, प्रशासन व नागरिक यांच्या निर्णयाचे प्रशासनाने स्वागत केले आहे.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरपासून 15 किमी अंतरावर धुळवड नावाचे गाव आहे. या गावकर्‍यांना सिन्नर पेक्षा देवठाणची बाजारपेठ जवळ (7 किमी) आहे. त्यामुळे तेथे दोन व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ते देवठाण येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. गेल्या चार दिवसांपासून हे रुग्ण येथे उपचार घेत होते. मात्र, त्यांना तेथे अधिकच त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांचा नाशिक येथे स्वॉब तपासला असता त्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तर हे रुग्ण येथे कधीपासून होते. त्यांची काही माहिती कोणी दडविण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याची सखोल माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. जर असे काही वाटले तर याप्रकरणी एखादी कारवाई देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.!
                                       
तुर्तास या बाप-लेकांच्या संपर्कात आलेल्या देवठाणच्या दोन डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक समितीने क्वारंटाईन केले आहे. मात्र, जे दोन कोरोना बाधित मिळून आले आहे. त्यांचा देवठाण बाजारपेठ आणि कोणाशीही जनसंपर्क आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणी काही अफवा पसरवत असेल तर त्यावर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, एक दक्षता म्हणून देवठाण गाव सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तर समिती व गावकरी, व्यापारी यांनी स्वयंप्रेरणेने स्वत: घराबाहेन न निघण्याचा निर्णय घेतला आहे. तो कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे.
                                   
सध्या अकोले तालुक्यात 3 हजार 200 संशयीतांना होमक्वारंटाईन करण्यात आलेेले आहे. तर तालुक्यात केवळ 16 रुग्ण हायरिस्क आहेत. अकोले तालुका तसा पुर्णत: कोरोनामुक्त असून केवळ कंटेनमेंट म्हणून कोतुळ आणि समशेरपूर हे अपवाद वगळता संपुर्ण तालुका कोरोनाच्या धोक्यातून बाहेर आहे. आज दि. 26 रोजी केवळ 16 रुग्ण तालुक्यात नव्याने आले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. फक्त शहरात व तालुक्यात जे लोक नव्याने येत आहेत. त्यांची माहिती कोणी दडविण्याचा प्रयत्न करु नये, संशयीत वाटल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)