वाळुच्या गर्त्यात दोन सख्या भावांचा बळी, अकोले आणि संगमनेरात खुलेआम वाळुतस्करी!
सार्वभौम(अकोले/संगमनेर) :-
देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना देखील काही लोभी मानसे त्याचा फायदा उठवत आहे. कोणी दारु तर कोणी गुटखा, कोणी गांजा तर कोणी तंबाखू अशा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा कमवत आहे. अर्थात यामुळे आरोग्याला धोका तर आहेच. मात्र, याहून भयानक वाळुतस्करी म्हणजे आणि त्याहून घेतले जाणारे जीव हा फार मोठा गहण प्रश्न आहे. या वाळुतस्करीने आजवर कित्तेक बळी घेतले आहे. याच महिन्यात वाघापूर परिसरात एका तरुणाचा खोल गर्त्यात सापडून मृत्यू झाला होता. तर अकोले तालुक्यातील नवलेवाडी फाट्यावर वाळुच्या ढंपरखाली एका महिलेचा जीव गेला होता. आज दुर्दैव असे की, संगमनेर पठार भागावर अगदी दोन चिमुरड्यांना नदीपात्रात गुद्मरुन जीव सोडावा लागला आहे. त्यामुळे, आज जीतके लोक जिल्ह्यात कोरोनाने गेले नाही. तितके लोक वाळुतस्करांच्या कारणम्यांचे बळी ठरले आहेत. त्यामुळे, सद्या संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यात भर दिवसा नदिपात्रांतून वाळुउपसा होत असून महसूल आणि पोलीस दोन्ही अगदी शांततेच्या भुमिका पार पाडताना दिसत आहे. इतक्या फ्रिडममध्ये वाळुउपसा होत असेल तर यांच्यावर वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
देशात जेव्हा लॉकडाऊन सुरू नव्हते. तेव्हा अकोले संगमनेरात वाळुतस्करी होत नव्हती असे नाही. मात्र, आज सामान्य नागरिक देश वाचविण्यासाठी घरात बसला आहे आणि नैसर्गिक साधन संपत्तीची तस्करी करणारे हे दलाल यांना काहीच कसे वाटत नाही. भले यांच्यावर प्रशासकीय वरदहस्त असुद्या! मात्र, यांच्यामुळे चिमुकल्यांच्या आनंदाला थेट मृत्युने उत्तर द्यावे लागत आहे. कारण, खैरदरा येथील सुरज शरद कातोरे (वय 5) व तेजस शरद कातोरे (वय 9) अशा दोघांचा जीव घेण्यास जबाबदार कोण? ही दोघे लहान असली तरी मागासवर्गीय कुटुंबातील होती. त्यामुळे त्यांना नदी नाले हे त्यांचे मित्रच! पण, पोहण्यासाठी जातात लहान भाऊ वाळुच्या गर्त्यात सापडतो म्हणून दुसरा त्यास वाचविण्यासाठी जातो आणि मुळा नदी दोघांनाही गिळंकृत करते! किती काळजाला स्पर्श करणारी घटना आहे. जर येथे वाळुचे खड्डे झाले नसते तर आज दोन जीव वाचले असते. याच्या वेदना त्या कुटुंबातील माय माऊलींना विचारा, त्यांना आयुष्य नको-नको होत असेल. मात्र, याचा प्रशासनाला काही सोयरसुतक नाही. लोकं मरुद्या फक्त आमचे मलिदे आम्हाला पोहच करा.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfDHuXy0rcVa3IKqfajzsOzjTs4HcgyrW__au7gL-Gi4oVnNMJXC3iTlizaIqFAh041pISUYZwgHGCHvp4WpQOOP4ohfwVg9iFIzl3avpQSBYOkVK2rihmdo6aMr46ym94ah5-x65VmBOw/s1600/IMG-20200524-WA0041.jpg)
खरंतर जिल्ह्यात तत्कालिन जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम होऊन गेले. ते दोन गोष्टी वारंवार बोलून दाखवत असे. की, रस्त्यावर होणार्या अपघातात एक मिनीटाला दोन मानसे मरतात. हे पातक तसे प्रशासनाचे आहे. म्हणून त्यांनी फार कडक रुपरेषा आखली होती. तर दुसरी म्हणजे वाळु तस्करीतून किती खून, मारामार्या आणि लुटमार होते. तेव्हा त्यांनी महसूल विभागाला खास 52 कर्मचारी दिले होते. त्यांनी फक्त छापे मारण्याचे काम करायचे. त्यावेळी कमी वेळात सर्वाधिक महसूल दंडातून वसूल झालेला आहे. आता मात्र, तसे होत नाही. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि वर्दीतील लोकांचे मुले देखील वाळु तस्करी करु लागले आहेत. खरंतर जेव्हा महसूल विभागाला एखादी करवाई करायची असेल तर नियमानुसार पोलीस संरक्षण घेऊन जाणे अनिवार्य आहे. मात्र, ते तसे करत नाहीत, उगच यांना अर्थपुर्ण तडजोडीत वाटेकरी नको असतो. मात्र, जेव्हा तडजोड होते तेव्हा ठिक, मात्र, झालीच नाही तर लगेच वाळु तस्करांवर सरकारी कामात अडथळा (353), अंगावर वाहन घालून ठार मारण्याचा प्रयत्न (307), सरकारी काम करुच दिले नाही (333) वाळु चोरी (379) किंवा गौण खणिज दंड अशी अनेक कलमे त्यांच्यावर लादली जातात. अर्थात महसूल काय आणि खा-की काय! एकाच माळेचे मनी, अर्थात पोलिसांना वाळुवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. मात्र, ते 379 कलमाचा सहारा घेऊन आपला फार मोठा गुजारा करतात. शेवटी कलमांचे खेळ त्यांनाच जमोजाणे..!
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi7zIdZyDU7ymTo26TPgMhl9_hOwomykz-hCiyYAq65S6bGP2arID1DqQmi04vUWbOPIzPA4E9wLAjvgJwxpO-nC1HwjKkN4fvWEnbaQgMu8Y0jw5s75KI4xUMGIdF1eRA_BDDzPkp0bEZT/s320/MADHUBHAU+NAWALE.jpg)
काही झाले तरी, जे लखमी गौतम यांनी जिल्ह्यात केले ते विद्यमान पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह करतील का? तशा तर त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. कारण, हे एसपी लखमी यांच्याच नवी मुंबई झोनमधून येथे आलेले आहेत. त्यामुळे ते करु शकतात असे वाटते. मात्र, तरी देखील हे वाळुतस्कार म्हणजे यांना लादेन किंवा छोटा शकील यांचे पाठबळ नसते तर स्थानिक आमदार, खासदार यांचीच ती पिलावळ असते. शेवटी निवडणुक रेव्हेयू आणि मतांची गोळाबेरीज येथूनच होत असते. त्यामुळे नगर जिल्ह्यात या बड्या मियाँच्या छत्रछायेखाली यांची अस्थित्व टिकून राहते. त्यामुळे कारवाई केली तर पुढार्यांचे फोन येतात नाही केली तर वरिष्ठांचे बोलणे एकावे लागता. सर्व अलबेले ठेवले तर जनता ओरडते अन्यथा बदलीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अर्थपुर्ण तडजोडीतून सर्वाची मने तृप्त करण्याचा पायंडा येथे रुढ झाला आहे.
अकोले तालुक्यात तर आज भर दिवसा वाळुतस्करी सुरू आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी काही लोक अधिकार्यांशी सलगी करतात आणि वाहने खुपीया मार्गाने काढून देतात. सद्या होमगार्ड देखील चांगले चटावले आहेत. रात्रीच्या वेळी शेतच कुपण खातय अशी चर्चा तालुक्यात जोरदार सुरू आहे. सिन्न तालुक्यातील चास नळवाडी, सुगाव खुर्द, पठारभाग आणि नदीलगत असणार्या गावांमध्ये सद्या स्ॅटक सिस्टिम सुरू आहे. अर्थात हा कारभार दिवसरात्र सुरू आहे. त्यांना कोणी विचारणा केली तर ते सरळ उत्तर देतात सर्व मॅनेज केले आहे. आता याचा काय अर्थ घ्यायचा हे नव्याने सांगायला नको.! पण, हा इतका अनागोंदी कारभार नव्या पोलीस अधिक्षकांच्या काळात हे कोठेतरी जनतेला रुतू लागले आहे. संगमनेर विभागात पठार भाग आणि शहरालगत गावांमध्ये रात्रीस खेळ चाले असे उपक्रम जोरात सुरू आहे. याच आठवड्यात दोन कारवाया झाल्या तर एका तलाठ्यावर हात उगरण्याची मजल वाळु तस्करांची झाली. म्हणजे कायद्याचा धाक संपला की काय? असाच प्रश्न उपस्थित होता.
पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे फार चांगले नाव आहे. मात्र, आत्मियता सोडून त्यांच्याकडून कोणतीही विशेष कामगिरी नाही. त्यांच्या पथकांची त्यांनीच चौकशी करणे गरजेचे आहे. खरंतर अप्पर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांचा कार्यकाळ आठविला की खरोखर खाकीला सलाम करावासा वाटतो. ते सद्या गडचिरोली येथे पोलीस अधिक्षक आहेत. त्यांनी नगरला असताना एक विशेष पथक स्थापन केले होते. ज्या पथकात अर्थपुर्ण तडजोड काय असते याचा जरा देखील लवलेश नव्हता. सर्वाधिक कारवाया तेव्हा झालेल्या असाव्यात, त्या देखील मोठमोठ्या.! आता मात्र, नगर आणि श्रीरामपूर येथून पोलीस येतात आणि भेटीगाठी घेऊन निघून जातात. कदाचित अधिकार्यांना माहित असेल नसेल मात्र, हे वास्तव जनतेच्या तोडून नेहमी बाहेर पडत असते. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळात बंद शटरमागे जसे सर्वकाही सुरू आहे. तसे ओसाड रस्त्यांनी वाळुतस्कारांचे सर्व काही अलबेले सुरू आहे. या तस्करीने मात्र, सामान्य मानसांचा जीव जातोय हे दुर्दैव आहे.
जर ही तस्करी थांबवायची असेल तर ज्या भागात वाळुतस्करी होते. तेथील ग्रामसेवक, तलाठी, बीट हवालदार आणि पोलीस पाटील यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारी लोकांच्या बढत्या आणि पगारवाढ थांबविली पाहिजे. इतकेच काय! संबंधित गावच्या सरपंचास जबाबदार धरुन त्याचे पद रद्द केले पाहिजे. तरच अशा प्रकारे ग्राम पातळीवर होणारी वाळुतस्करी अटोक्यात येऊ एकते.
जाहिरातीसाठी संपर्क साधा
8888782010 / 8208533006
सागर शिंदे