अकोल्यात 11 हजार लोक होमक्वारंटाईन, धामनगाव व राजुरचे केळुंगण सील.! तर समितीवर गुन्हे दाखल होणार!
सार्वभौम(अकोले) -
अकोले तालुक्यात मुंबईहून आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता होत चालला आहे. त्यामुळे लिंगदेव, ढोकरी, समशेरपूर, पिंपळगाव खांड, केळुंगण आणि आता धामणगाव पाट येथे कोरोनाने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात पुर्व भाग वगळता सगळ्या दिशांमध्ये कोरोनाचे आगमन झाले आहे. त्यामुळे तालुक्यात पाच गावे सील करण्याची वेळ आली आहे. आता केेळुंगण आणि धामनगाव पाट अशी दोन्ही गावे सील करण्यात आली असून दोन्ही गावातील 7 हजार लोक होमक्वारंटाईन करण्यात आले आहेत. अद्याप तीन जणांचे अहवाल येणे बाकी असून त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अकोले तालुक्यात लिंगदेव येथे 2 हजार 500 लोक होमक्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आत या गावात अद्याप कोणताही रुग्ण मिळून आला नाही. त्यामुळे तेथील कंटेनमेंट उठणार यात शंका नाही. तर समशेरपूर येथे 300 लोकवस्ती होमक्वारंटाईन तर 40 लोक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यानंतर पिंपळगाव खांड येथे 910 लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहेत. मात्र, येथे पाच जणांना कोरोनची बाधा झाल्यामुळे प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली आहे. त्यांच्यानंतर केळुंगण येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच 3 हजार 500 लोकसंख्या वस्तीचे गाव प्रशासनाने होमक्वारंटाईन केले आहे. त्यांच्या पाठोपाठ धामनगाव पाट येथील 3 हजार 500 लोकसंख्या असणारे गाव देखील होमक्वारंटाईन केल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे आता तालुक्यात सरासरी सहा गावे मिळून 11 हजार लोक होमक्वारंटाईन करण्यात आलेले आहेत.
आता तसे पाहिले तर तालुक्यात स्थानिक व्यक्तींना प्रादुर्भाव झालेला नाही. म्हणून तर प्रशासन व नागरिक दक्षतेसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. सद्या तालुक्यात जांभळे आणि अन्य दोन रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यातील एकच व्यक्तीला जास्त सिमटन्स असल्याचे दिसते आहे. मात्र, अन्य संशयितांना धोका नाही. त्यामुळे, प्रत्येकाना आपापली काळजी घेतली पाहिजे. घाबरून न जाता सावध रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे
बाप रे.! फक्त एक अॅम्ब्युलन्स!!
अकोले तालुका दुर्गम भाग आणि आदिवासी क्षेत्र म्हणून प्रचलित आहे. येथे बाहेरुन गावी येणार्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळेच तर कोरोनाची ऐन्ट्री तालुक्यात झाली आहे. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पुढारी आणि नेते म्हणतात आम्ही हे करतो ते करतो परंतु सर्वात मोठे क्षेत्रफळ असणार्या तालुक्यात कोविडसाठी फक्त एक अॅम्बुलन्स आहे. येथे वारंवार गरज पडली तर पाथर्डी तालुक्यातून अॅम्ब्युलन्स बोलवावी लागते. त्यामुळ, आमदार महोदय यांनी खाजगी बाब करुन किंवा अन्य पुढार्यांनी तालुक्यासाठी दुसर्या अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
लपविले त्यांना बाहेर काढा.!!
अकोले तालुक्यात आत्तापर्यंत बाहेरून आलेल्या 2 हजार 300 लोकांनी प्रवेश केला आहे. त्यापैकी 9 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. कोणी निगेटीव्ह आहेत तर कोणी घरात दडून बसले आहेत. खरंतर गावात ज्या कोविड प्रतिबंध समित्या तयार केल्या आहेत. त्यांचा फार मोठा भोंगळ कारभार सुरू आहे. त्यांचे मतदार किंवा नातेवाईक असेल तर त्यांना थेट घरी नेले जाते.
मात्र, सामान्य मानसांना 14 किंवा 10 दिवस क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे 2 हजार 300 हा निव्वळ कागदावरील आकडा असला तरी लपवून ठेवल्याल्यांची संख्या बाहेर काढली तर ती पाच हजारांच्या घरात असेल. त्यासाठी प्रत्येकाने असे छुपे कारणामे करणे बंद केले पाहिजे. जर चुकून एखाद्याला बाधा झालेली असेल तर त्याच्या कुटुंबासह तो तालुक्याला धोका निर्माण करु शकतो. त्यामुळे, जर असे छुपे लोक कोणी दडविले असतील तर गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा महसुलने घेतला आहे.