कोरोनाने माणूस मारत नाही! फक्त जगण्याची इच्छाशक्ती हवी! आजी गेली मात्र, सहा वर्षीय चिमुकलीने कोरोनाशी युद्ध जिंकले, आज घरी आली!


सार्वभौम (कर्जत) : 
                       कोरोना झाला म्हणून धाय मोकलून राडणार्‍यांसाठी एक धैर्य वाढविणार आणि उर भरुन येणार प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. कारण, एका आजीसोबत मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे सहा वर्षीय चिमुरडी आली होती. तिला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समजले आणि ती त्यास मोठ्या धैर्याने सामोरे गेली. आज तीने कोरोनाशी झुंज देत तो लढा यशस्वीपणे जिंकला असून ती आजच सुखरुप घरी परतली आहे. त्यामुळे, या भयान महामारीला धाडसाने उत्तर देत तिने ललकारी दिली. जीने की तमन्न आज मेरे दिल मे है! देखना हैं! जोर कितना बाजु ऐं कातीलमे है! आज मोठ्या आनंदाने ती घराकडे चालती झाली तेव्हा तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतरांनाही फार  गहिवरला आले होते. या सर्वांनी ती कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. आज खर्‍या अर्थाने कोरोनाला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. धर्य धरले आणि वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेश तिने देशातील बांधवांना दिला आहे.
                 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तिच्या वडिलांनीही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला. डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आज ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली. त्यामुळेच, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे. त्यासाठी गरज आहे, ती वेळीच आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, नव्हे, आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे.
                         
जिल्हा प्रशासन आणि सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, संपर्क टाळण्याचे, सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. गाव आणि शहरातील दैनंदिन कामकाज सुरळीत होत असताना नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे असतील तर आपल्याकडून तो संक्रमित होणार नाही याची काळजी अशा व्यक्तींनी घेऊन तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, तर इतरांनी या आजारामुळे आपण संक्रमित होणार नाही, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क, समोरच्या व्यक्तीशी बोलताना पुरेशे अंतर ठेवून बोलणे, सॅनिटायझर चा वापर करणे, वारंवार हात धुणे या गोष्टी अवश्य करणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाला पराभूत करु शकतो, हा विश्वास या सहा वर्षीय चिमुरडीने दिला आहे. परंतू, हा आजारच होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी आहे.
                                       
दरम्यान ज्या व्यक्तींना कोरोना झाला आहे. त्यांच्यासाठी हे फार मोठे उदा. आहे. आयुष्य फार सुंदर आहे. फक्त ते जगण्यासाठी हिंमत आवश्यक आहे. ज्यांना गावागावात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना स्थानिक प्रशासनाकडून फार त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. मात्र, ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. त्याचे दु:ख आपल्या वाट्याला नाही हेच आभार मानले पाहिजे. हे दिवस फार काळ टिकणार नाही. मात्र, मतभेद आणि मनभेद करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. आज या मुलीने फार मोठा संदेश आपल्यासाठी दिला आहे. तो मनात ठेऊन घाबरायचे नाही पण काळजी घ्यायची. हेच महत्वाचे आहे.

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 49 लाख वाचक)