धन्यवाद डॉक्टर! तुम्ही एक टाळाटाळ केली असती तर आज संगमनेरचे मालेगाव झाले असते!
सार्वभौम (अहमदनगर) :-
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे कोरोनाचा वाणवळ दिला कोणी हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, यात खाजगी व सरकारी डॉक्टर आणि प्रशासनाच्या समन्वयाचा आभाव असल्यामुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असे मत जाणकार मांडू लागले आहे. पण काहीही झाले तरी त्या नातेवाईकांच्या आठमुठेपणासमोर का होईना! डॉक्टर चुकले.! पण, त्यांनी जर सरकारी हट्ट धरुन या कोरोना बाधिताकडे दुर्लक्ष केले असते. तर? तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. इतके रूग्ण शहरात आणि धांदरफळमध्ये मिळून आले असते. जर सरकारी डॉक्टरांनी खाजगी तपासणीचा अट्टाहास मान्य केला नसता किंवा सरकारी पद्धतीने त्याकडे काना डोळा करुन अहवाल पाठविला नसता तर मात्र संगमनेरात मालेगाव सारखी परिस्थिती उद्भवली असती. त्यामुळे, त्यांच्या काही चुका आहेतच. यात तिळमात्र शंका नाही. मात्र, त्यांनी जे रिपोर्ट पाठवून तत्परता दाखविली, त्याची दाद द्यावी लागेल.
धांदरफळचे 68 वर्षीय महाशय त्यांच्या मार्गाने गेले खरे. पण, त्यांनी सगळ्या जिल्ह्याला कामाला लावले. कदाचित थोडी नम्र भुमीका घेत पैशाचा जोर न दाखविता सरकारी रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली असती. तर आज ना त्यांच्या घरच्यांना इतक्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले असते ना प्रशासनाची धावपळ झाली असती. पण त्यांचीही काय चूक म्हणायची. कारण, प्रत्येकजण सांगतो. संगमनेर, अकोले आणि अन्य तालुक्यातून गेलेल्या रुग्णांना जिल्हा रग्णालयात चांगली वागणूक दिली जात नाही. कोरोना होण्याच्या पुर्वीच तेथील आवस्था पाहून माणूस निम्मा खचून जातो. आजवर प्रत्यक्ष अनुभव आलेल्यांची फार वेदनादायी कथा आणि व्यथा सांगितल्या आहेत. त्यामुळे, चार दोन रुपये गेले तरी हरकत नाही. पण नगरला जाण्याची कोणाची मानसिकता होत नाही. हे प्रखर सत्य आहे. ही प्रशासनाची पहिली चूक आहे. की ते रूग्णांना योग्यती सेवा देऊ शकले नाही. ना त्यांना विश्वास व धीर देऊ शकले.!
आता ही कोरोना बाधित व्यक्ती एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. तेथे त्यांना काही संशयित बाधा असल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांनी आपल्या अंगावरचे सर्व झटकत हात वर केले. तु सरकारी रुग्णालयात जा. इतके बोलून त्यांनी स्वत:चा रोलच काढून घेतला. मात्र, त्यांनी या संशयीताची माहिती प्रशासनाला कळविली नाही. त्यांना पुढे पाठविले म्हणजे नक्कीच साशंकता होतीच. मग रिकामे ओझे बोकांडी घेण्यापेक्षा त्याला आम्ही पाठविले आणि तो गेला. पुन्हा आलाच नाही. येथे आमचा रोल संपला! म्हणजे केवळ शासनाने दिलेले काम पार पाडून आपल्या पाट्या टाकून झाल्या. असेच म्हणायचे की, मग जनता मरो, जगो, कोणाला लागण होवो अथवा बाहेर जग बुडो! फक्त आमच्यावर आफत नको. एरव्ही हेच डॉक्टर मंडळी प्रांत, तहसिल, पीआय, मुख्याधिकारी यांच्याशी किती लगट लावून असतात. मात्र, त्या दिवशी त्यांना एकदाही संपर्क साधावासा वाटला नाही! थेट माणूस मयत झाल्यानंतर यांचे खुलासे सोशल मीडियावर फिरू लागले. ऐरव्ही साधा अपघात झाला तर एमएलसी नोंदविली जाते. आज एक जबाबदार डॉक्टर म्हणून त्या दोघांनी प्रशासनाशी संपर्क साधणे गरजेचे नव्हते का? कदाचित तो मयत पेशन्ट योग्य ठिकाणी क्वारंटाईन झाला असता तर आज संगमनेर अगदी कोरोनामुक्त असते.
यात महत्वाचे म्हणजे, हे पेशन्ट ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी फारच आतातईपणा केला. डॉक्टरांवर कादाचित दबाव आणला गेला असवा. त्यामुळे, डॉक्टरांनी समज देवून देखील ते अॅडमिट होण्यास तयार झाले नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोरोनाबाधीत व्यक्ती सरकार दरबारी आला होता. त्यामुळे, त्यांच्या मनावर न घेता सरकारी पद्धतीने तपासणी करणे त्यांच्या गळी उतरविणे अवश्यक होते. त्याच ठिकाणी त्यास क्वारंटाईन करणे अपेक्षित होते. भलेही बळाचा वापर करता आला असता. मात्र, मुख्य वैद्यकीय अधिक्षक फारसे पडद्यावर येण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु, पडद्याआड त्यांची चांगलीच सेवा सुरू आहे. कदाचित त्या दिवशी त्यांनी अन्य कामे सोडून थोडे दवाखाण्याकडे लक्ष दिले असते. तर अधिकार आणि बळाचा वापर करीत आजची अघटीत घटना घडली नसती.असे असले तरी त्यांचे सहाय्यक कोरोनात पुरते न्हावून निघाले आहेत. स्पष्टच सांगायचे झाले. तर, सरकारी काम सरकारी माणूस कसे करतोे, हे आपण सगळे अगदी उघड्या डोळ्यांना आजवर पाहत आलो आहे. कदाचित असेच काम जर तेथील डॉक्टरांनी केले असते. सरकारी टेस्टसाठी नकार देणार्या व्यक्ती तेव्हाच घरी गेल्या असत्या. मग बाकी एकाच दिवसात नगण्य लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असता. हे महाशय कोठे कोठे फिरले असते. शुगर आणि किरकोळ कणकण आहे. असे समजून त्यांना सगळ्या गावाला अवाटनं घातलं असतं. त्यांचा मटन व अंडी विक्रीचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांनी किती ठिकाणी वानवळा दिला असता याची कल्पना त्यांना देखील झाली नसती. एक-एक करुन हा रोग इतका पसरला असता की, तो कोरोना आहे. हे देखील लवकर लक्षात आले नसते. कदाचित तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या कोरोनाची शंका देखील कोणी घेतली नसती. हा प्रादुर्भाव मालेगाव पेक्षा भायनक व अमोरीकेपेक्षा भयवाह झाला असता. त्यामुळे, “होता जीवा म्हणून वाचला शिवा” अशी एक म्हण आहे. म्हणून आज ज्या डॉक्टरांनी कोणतीही टाळाटाळ न करता खाजगी का होईना कोरोना टेस्ट करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळेच खरे संगमनेरचा घाव अटोक्यात आला आहे. त्याच्या अस्तित्वानंतर मृत्युचे कारण स्पष्ट झाले नसते तर येथे मालेगावपेक्षा फार भयंकर परिस्थिती असती. म्हणून त्या डॉक्टरांचे खरोखर धन्यावाद मानेले पाहिजे. ज्यांनी संगमनेरचे मालेगाव होताना रोखले आहे. बाकी चुका काढत गेले तर नकारात्मक गोष्टींमुळे फार मोठी सकारात्मक गोष्ट पडद्याआड राहून जाते. त्यामुळे, दै. रोखठोक सार्वभौमचा त्या डॅाक्टरांना सॅल्युट..!
स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे
एक महत्वाची बाब म्हणजे मयत झालेला व्यक्ती समजात उठबस करणारा होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच गावातील काँग्रेससह अन्य पक्षाचे पुढारी तेथे हजर झाले होते. इतकेच काय! संगमनेरातून काही शिवसैनिक तेथे गेल्याचे बोलले जाते. अर्थात यात सर्वजण कोरोना संदर्भात अनभिज्ञ होते. मात्र, त्यांना स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन किंवा हॉटस्पॉट उठायची वेळी आणि नवे रुग्ण पुढे यायचे.!
ये तो अभी झाकी है! शहर अभी बाकी है!
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे आठ जणांची नावे पुढे आली आहेत. एक डॉक्टरच्या चुकीमुळे धांदरफळची धांदल उडाली आहे. मात्र, कुरण रोडवरील महिला देखील एका खाजगी रूग्णालयातच दिर्घकाळापासून उपाचार घेत होती. ती कोणाकोणाच्या संपर्कात आली होती. हे सांगायला कोणी पुढे येत नाही. पण, ही लागण आता स्थानिकांना भिडली आहे. त्यामुळे, धांदरफळ एक नमुना आहे. मात्र, योग्य दक्षता घेतली नाही. तर मग कळेल मालेगावचा गुणाकार येेथे कसा होतो. त्यामुळे, सतर्क राहा.!सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)