बांध कोरला म्हणून भावाने घातले भावावरच कुर्हाडीचे घाव! एकाचा मृत्यू, आरोपी अटक! संगमनेरमधील घटना.!

सार्वभौम(संगमनेर)-
संगमनेर तालुक्यात कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून चक्क भावानेच भावाची कुर्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार रविवार दि. 10 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास यादव वस्तीवर घडला. यात सतिश छबू यादव (वय 36) हा तरुण मयत झाला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गोरख संपत यादव (रा. कौठेकमळेश्वर) यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संमगनेर तालुक्यातील कौठेकबळेश्वर येथे छबू माधव यादव यांची गावात 75 गुंठे जागा आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ संपत माधव यादव यांची जमीन आहे. यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या आहेत. मात्र, केवळ शेतीच्या बांदाहून किरकोळ कारोकोरीचा वाद सुरू आहे. याबाबत त्यांच्यात आठ दहा दिवसांपुर्वी वाद झाले होते. हा वाद पोलीस ठाण्यात जावून पोहचला होता. तेथे तुर्तास तोडगा निघाला होता. मात्र, फनभर जागेसाठी दोन्ही गडी एकमेकांच्या जीवावर उठले होते. त्यामुळे, पोलिसांनी समजून सांगून देखील आरोपी गोरख यादव याने चुलत्यास कुर्हाडीने घाव घालून ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर हा वाद गावपुढार्यांपर्यंत गेला. मात्र, त्यांचे कोणी एकत असते तर पोलीस ठाण्यांची गरज भासली नसती आणि पराकोटीचे वादही झाले नसते. पुढार्यांना सांगितले, हे कोरोनाचे रहाकाळ मिटले की आपण बैठक घेऊन तुमच्या प्रश्नावर तोडगा काढू. मात्र, हा न्याय गोरख यादव यास मान्य झाला नाही. दरम्यान त्याच्या डोक्यात जमीन, बांध, दुष्मणी आणि कुर्हाड कायम राहिली. त्याने रविवार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चुलत्याचा मुलगा सतिश यादव गाठविले आणि कुर्हाडीने धपाधप त्याच्यावर घाव घालत त्यास ठार केले. हा प्रकार छबू यादव यांना समजला असता त्यांनी तत्काळ आपल्या मुलाकडे धाव घेतली. ते घटनास्थळी पोहचले असता त्याचा मुलगा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याचा देह केवळ धडधडत असल्यामुळे त्यांनी गावकर्यांना मदतीची याचना केली. त्यानंतर काही लोक त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी संतीशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिकचा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यास लोणीला हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, तोवर सतीशने दम सोडल्याचे सांगण्यात आले.दरम्यान याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. हा आरोपी अटक करण्यासाठी वरिष्ठांनी सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांचे एक पथक तयार केले. कादरी यांनी पोलीस कर्मचारी खरात, खेडकर, औटी, आहेर, बाबा खेडकर, लुमा भांगरे, चालक ओंकार शेंगाळ यांच्या मदतीने कौठेकमळेश्वर परिसरात सापळा रचला. घटनाक्रम लक्षात घेता त्यांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले होते. मात्र, योग्य शहनिशा केल्यानंतर आरोपी गोरख संपत यादव याच्या नावाची खात्री होताच पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. त्याने काही संदिग्ध माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसी खाक्या अंगावर पडताच तो पोपटासारखा बोलु लागला. गोरखने त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी या गुन्ह्यात काही सबळ पुरावे गोळा केले आहे. आज पुढील चौकशीसाठी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील घटनेचा तपास सपोनी पप्पू कादरी करीत आहेत.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)