तहसिलदारांनी काढली पळवाट! हॉस्पिटलांचे ते प्रसिद्धपत्रक रद्द! पुन्हा दुसरे पत्रक जारी!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेरमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना खाजगी रुग्णालयात काही पेशन्ट मिळून आले होते. मात्र, प्रशासनाने त्यांना क्लिनचीट देत एक प्रसिद्धपत्रक काढले होते. मात्र, त्यावर माध्यमांनी टिकेची झोड उठविली असता एका समाजसेवकाने थेट आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यातून बचावात्मक भुमिका घेण्यासाठी मा. तहसीलदार यांनी पुन्हा गुरूवार दि. 14 मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, मंगळवार दि.12 मे रोजी काढण्यात आलेले पत्रक रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, एक प्रकारे साहेबांना त्यांच्या मनसोक्त शब्दांची माघार घेत शासकीय शब्दांमध्ये हा पत्रक काढले असून त्यात रूग्ण होते, डॉक्टरांची तपासणी केली, हॉस्पिटल निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. असा निर्वाळा त्यांनी या पत्रकात केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धांदरफळ येथील एक रुग्ण एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेला होता. त्यानंतर त्यास कोरोना झाल्याचे लक्षात आले. हे प्रकरण सॉल होते कोठे नाहीतर पुन्हा दुसर्या खाजगी रुग्णालयातील कुरण रोडचा रुग्ण पॉझिटीव्ह निघाला. त्यावेळी ही दोन्ही रुग्णालये प्रशासनाने निर्जंतुकीकरण केले होते. तसेच या रुग्णालयात पेशन्ट आलेले असताना देखील तेथे कोणीही रुग्ण आला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. एकीकडे कोविडने तालुक्यात उच्छाद मांडलेला असताना खरी माहिती दडवून बड्या रुग्णालयांच्या चूका दडविण्यात प्रशासनाने धन्यता मानली होती. इतकेच काय! त्याबाबत त्यांना शुद्धपत्र देखील देण्यात आले होते. यावर दै. रोखठोक सार्वभौम या वृत्तपत्राने सडेतोड वृत्तांकन करुन या जाहिरातबाजीवर आवाज उठविला होता. त्यानंतर एका समाजसेवकाने या प्रसिद्धपत्रकावर अक्षेप घेत थेट नाशिक विभागिय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
आता हा विषय सोशल मीडियावर प्रचंड टिकेचा ठरला होता. तसेच वरिष्ठांना तोेंड द्यावे लागणार म्हटल्यावर तहसिलदार यांनी अवघ्या दोन दिवसात त्या पत्रकाला बाद ठरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महसूल विभागाच्या जावक कक्षेतून पत्र बाहेर पडले की, मंगळवार दि.12 मे रोजी काढण्यात आलेले पत्रक गुरूवार दि. 14 मे रोजी रद्द करण्यात आले आहे. असे त्या पत्रकात म्हटले आहे. तसेच त्यांनी डॉक्टर, हॉस्पिटल, स्टाप यांना जी क्लिनचीट दिली होती. त्यावर निर्वाळा ते स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे तहसिलदार महोदयांच्या त्या निर्णयावर टिका झाल्यानंतर देर से! मगर दुरूस्त आऐं! असे बोलले जाऊ लागले आहे.
दरम्यान, तहसिल साहेब हे तालुक्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी असे किती पत्रके दिले याची माहिती नाही. मात्र, असेच पत्र जर त्यांनी सरकारी रुग्णालये, उपकेंद्र अशांना बहाल केले असते तर खाजगी हॉस्पिटलांच्या झोळ्या भरण्याऐवजी एक विश्वास म्हणून ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने तेथे उपचार घेतले असते असे सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींनी मत मांडले आहे.
हे असे असले तरी तहसिलदार साहेबांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे. डॉक्टरांना विलगिकरण कक्षेत ठेवले आहे. मात्र, एका डॉक्टरने विलगिकरण कक्षेत असताना अनेक रुग्णांची तपासणी केली आहे. तशा तारखेची तपासणी करणारे लेटरहेड अनेक रुग्णांकडे आहे. त्यामुळे, विलगिकरण हा पाठशिवणीचा खेळ केवळ कागदावरच होता की काय? असा प्रश्न अनेक समाजसेवकांनी उपस्थित केला असून तसे पुरावे आयुक्तांना सादर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
- सुशांत पावसे