संगमनेरच्या घुलेवाडीत डॉक्टर निघाले कोरोना बाधित.! दापुरशी संबंध! नाशिकहून अहवाल.


सार्वभौम (संगमनेर) :
                    संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात एका डॉक्टरच कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आला आहे.  या डॉक्टरांना नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट  संगमनेर प्रशासनाला आज दि. 27 रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे, शहरात पुन्हा प्रशासनाने सावध भुमिका घेतली असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरु केला आहे. या डॉक्टरांनी दापूर येथील एक पेशन्ट तपासले होते. त्यांचे हॉस्पिटल घुलेवाडी परिसरात असून ते ये-जा करीत होते.
                         
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिन्नर तालुक्यातील दापूर येथील एक डॉक्टर संगमनेर शहरालगत असणार्‍या घुलेवाडी येथे ये-जा करुन आपली डॉक्टरकीची सेवा देत होते. त्यावेळी त्यांनी अनेक पेशन्ट तपासले. मात्र, त्याच्या निस्वार्थी सेवेत त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. त्यामुळे त्यांनी जे कोणी आवाज येईल तेथे हजार होण्याचा स्वाभाव होता. गेल्या काही दिवसांपुर्वी दापूर येथील अशाच एका व्यक्तीचे अंग दुखत होते. त्यावेळी डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. त्यांनी तत्काळ जाऊन ते पेशन्ट तपासले. मात्र, दुर्दैव असे की, त्या रुग्णास कोरोनाची बाधा झालेली होती.
                  गेल्या दोन दिवसापुर्वी संशयीत म्हणून दापूर येथून काही व्यक्तींना तपासणीसाठी नेले होते. त्यात त्यांचा रिपोट पॉझिटीव्ह आला होता. त्यातील एका पेशन्टला डॉक्टरांनी तपासले होते. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. आता या डॉक्टरांनी घुलेवाडी परिसरात किती पेशन्ट तपासले याचा शोध संगमनेर प्रशासनाने घेणे सुरू केला आहे. अर्थात स्थानिक प्रशासन आता कसोशीने काम करीत आहे. त्यामुळे संगमनेरला कोरोना बाधित रुग्ण मिळून येत नाही. मात्र, बाहेरुन येणार्‍या व्यक्त सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)