तो कोरोनाचा पेशन्ट घरी गेलाच कसा? काही अनत्तरीत प्रश्न.! हा तर जीवघेणा बेजबाबदारपणा.! कारवाईची मागणी.!


सार्वभौम (अकोले) : - 
                         संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट तपासणीसाठी नाशिक मार्गे मुंबईला पाठविण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात हा व्यक्ती मयत झाला. त्यानंतर तो पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. मात्र, हा व्यक्ती घरी गेला कसा, तो मयत झाला कसा, त्याला कोरोना झाला कसा? हे काहीच कळायला तयार नाही. या सर्व प्रकारात एक मात्र नक्की. यात प्रशासनाची दिरंगाई आणि त्या संगमनेरच्या डॉक्टरांचा हालगर्जीपणा लक्षात येत आहे. त्यामुळे, संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. इतकेच काय तर यात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजे. अन्यथा देश एकीकडे लढतो आहे आणि हे बेजबाबदार हॉस्पिटल कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरक वातावरण तयार करीत असतील तर त्यांना मोकाट सोडून कसे चालेल?
                           एक महत्वाची गोष्ट म्हणजे धांदरफळचे हे महशय यांचा अंडे आणि मटणाचा धंदा आहे. सरकारला फार पुळका असल्यामुळे त्यांनी हातावर पोट असणार्‍या चहाच्या टपर्‍या आणि शिक्षणासाठी गावोगावी ट्युशन सुरू केले नाही. तर गल्लोगल्ली बार आणि पोटभर चिकन-मटण यासाठी परवानगी दिली. त्यामुळे, नको त्यांचे चोचले पुरविण्याच्या नादात कोरोनाला चांगलेच आमंत्रण दिले आहे. आता हे कोरोना बाधित व्यक्ती नेमकी किती जणांच्या सानिध्यात आले, त्यांना लागण नेमकी कोठे झाली, ते ज्या रुग्णालयात होते. तेथे त्यांचे वागणे आणि सहवास कसा होता. म्हणजे त्यांना लागन झाल्यापासून तर मृत्यू  झाल्यानंतर दफन करेपरर्यंत असा फार मोठा पल्ला गाठवून तो तपासावा लागणार आहे.
                      परंतु, या सर्व उठाठेवीत पहिला प्रश्न पडतो की, हा व्यक्ती आजारी असताना देखील स्थानिक आरोग्य सेवकांना त्याची माहिती का पडली नाही? ते केवळ शासनाच्या नियमांच्या पाट्या गिरविण्यात माहिर असल्याचे लक्षात येते. दुसरी गोष्ट म्हणजे  हा कोरोना बाधित रुग्ण ज्या यांच्याकडे उपचारासाठी गेला होता. मग त्यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याचे कोरोनासाठी लागणारे नमुने ताब्यात घेऊन ते मुंबईला देखील पाठविले. इथपर्यंत ठिक आहे. पण, जर त्यांना त्रास होत होता. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून येत होती. तर त्याला जिल्हा रुग्णालय किंवा स्थानिक ग्रामीण रुग्णालयात का पाठविले नाही? अर्थात पेशन्ट लावून धरण्याची थेअरी संगमनेरात नवी नाही. मात्र, त्या पेशन्टकडे लक्ष तरी देण्याचे उत्तरदायीत्व यांनी का निभावले नाही. नगर जिल्हा अगदी जवळ असताना रिपोर्ट थेट मंबईला जातात. हे न समजण्यापलिकडे आहे.
           बरं हे देखील मान्य केले. की, तो खाजगीत गेला, रिपोर्ट मुंबईला गेले पण मृत्यू तोंडावर असताना तो रुग्ण घरी गेला कसा? कारण, तसेही तालुक्यात बाहेरुन कोणी आले तर त्यला 14 दिवस होमक्वारंटाईन केले जाते. अवघे चारजण कोरोना बाधित सापडले तर संगमनेरात दिड हजार कुटूंब आणि 20 हजार नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले. ज्याला कोरोना म्हणजे काय? हे माहित नाही. त्याने गेल्या दोन महिने स्वत:ला डांबून घेतले आहे. मग हे तर हॉस्पिटल आहे. यांना इतकी घाई काय झाली होती. त्या पेशन्टला घरी सोडण्याची? जो कोरोना बाधित आहे की नाही. हे सिद्ध करणारा रिपोर्ट येणे बाकी असताना देखील त्याला सोडण्याची घाई करण्यात आली.
                             आता कोण काय कांगावा करणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही किंवा दोषींना कोण पाठीशी घालणार हे देखील सर्वज्ञात आहे. पण, अशा प्रकारांना जर कोणी पाठीशी घालत असेल तर संगमनेरकारांना खरोखर आत्मचिंतन केले पाहिजे. कारण, मालेगावात एका चुकीचे फळ सगळे नाशिकर आणि राज्य भोगत आहे. त्यामुळे, कोणालाही पाठिशी न घालता दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. अशी मागणी सामाजिक संघटना करु लागल्या आहेत.
भाग ३ क्रमश:.....
सागर शिंदे