संगमनेर तालुक्यातील धांदरफळमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण, खाजगीत तपासणी, सरकारीत तपासणी करणार.!
सार्वभौम (संगमनेर) -
संगमनेर तालुक्यात आठ रुग्ण ठिक झाल्यानंतर तालुक्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धांदरफळ येथे एक रुग्ण संशयित होता. त्याची एका ठिकाणी खाजगीत तपासणी केली होती. त्यात तो पॉझिटीव्ह असल्याचे मिळून आला आहे. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला असून प्रशासनाने आता सावध भुमिका घेत त्याचे अहवाल पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहे. तुर्तास संगमनेर शांत व सुरक्षित रहावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून संबंधित ठिकाणे सील करायचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान या व्यक्तीच्या सानिध्यात असणार्या काही व्यक्तींच्या देखील तपासण्या कराव्या लागणार आहे.
संगमनेर तालुक्यात अद्याप आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप घरी पोहचण्याचे भाग्य लाभले. तर तालुक्यात पोलीस, महसूल, आरोग्य व नगरपालिका यांच्या अथक प्रयत्नामुळे पुढील प्रादुर्भाव होणे टळला आहे. कालच (दि.6) कोरोना बाधित असलेले चार तबलीगी बरे होऊन तालुक्यात आले. तालुका कोरोनामुक्त झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, आज पुन्हा धांदरफळ परिसरात एक नवा संशिंयत मिळून आला आहे. असे असले तरी संगमनेरकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, प्रत्येकाने काळजी घेणे महत्वाचे आहे. संबंधित मिळून आलेल्या व्यक्तीने एका खाजगी ठिकाणी तपासणी केली होती. त्यात तो पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, त्याची सरकारी यंत्रणेकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
संगमनेरमध्ये दोन वेळा हॉटस्पॉट घोषित केले होते. पहिल्या काळात चार जण पॉझिटीव्ह झाल्याने हॉट्स्पॉटचा कालावधी वाढविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एकही रुग्ण मिळून आला नाही. त्यामुळे आज संध्याकाळनंतर संगमनेरचे हॉट्स्पॉट उठले जाईल. तर धांदरफळ येथे एका व्यक्तीचा खाजगीत केलेला कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याचे रिपोर्ट सरकारी तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.- डॉ. शशिकांत मंगरुळे (प्रांताधिकारी)
----------------------------------------
विनाकारण कोणी बाहेर दिसला तर 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.
सुचना : कृपया कोणी बातमी कॉपी करु नये!