मासे खाणे महागात पडले, भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू! महिन्याभरात नऊ जणांना पाण्याने गिळले!


सार्वभौम (राजूर) :-
                       लॉकडाऊनच्या काळात मासे खाऊ वाढले म्हणून एक व्यक्ती भंडारदरा धरणात मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, तोल जाऊन तो धरणात पडला आणि त्याचा मृत्यूू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रावणा सोमा मधे असे या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार मृतदेह फुगून वर आल्यानंतर लक्षात आला. मधे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याप्रकारणी राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
                           याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि.20 मे रोजी सकाळी श्रावणा मधे हे आपल्या घरातून बाहेर पडले होते. जाताना त्यांनी घरून जेवणाचा डबा घेतला आणि थेट भंडारदारा धरणावर गेले. सोबत मासे पकडण्याचा गळ देखील घेतला होता. काही मासे पकडून घरी भाजी करता येईल किंवा त्यापासून दोन-पाच रुपयांचा फायदा होईल अशा हेतूने त्यांनी थेट धरण गाठले. काही काळ त्यांनी मासे पकडण्याचा आपला उपक्रम राबविला. मात्र, त्यांचा तोल जाऊन म्हणा किंवा पाय सटकून म्हणा ते पाण्यात पडले. कदाचित पाण्याची खाली आणि शांत पाणी याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे, ते पाण्यात पडून देखील वर येऊ शकले नाही. दुपार उलटून गेली तरी वडील घरी आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी धडपडू लागला. शेवटी संध्याकाळचे सहा वाजले तरी वडील घरी आले नाही. त्यामुळे त्याने थेट धरण गाठले. तेथे त्याने आपल्या वडीलांसा साद दिली, तरी प्रतिउत्तर आले नाही. तो ज्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी त्याचे वडील होते. मात्र, ते खोल पाण्यात होते. अखेर मुलगा घरी परतला. दुसर्‍या दिवशी पुन्हा वडीलांची शोधाशोध सुरू झाली. मुलगा गुरूवारी (दि.21) भंडारदरा धरणाच्या पाणवठा येथे श्रावणा मधे यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. हा प्रकार सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना समजला असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. या घटनेचा पुढील तपास के.एल. तळपे व पो. हे. कॉ. निमसे हे करत आहेत.
                             दरम्यान जसे लॉकडाऊन सुरू झाले आहे. तसे केवळ अकोले तालुक्यात फक्त एका महिन्यात पाण्यात बुडून नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकी मृत्युची संख्या जिल्ह्यात देखील कोरोना बळीची नाही. एकंदर अकोले तालुक्याने आरोना वेशीवर रोखला असला तरी वेशीच्या आत असणार्‍या मानसांनी स्वत:पासून मृत्युला रोखले नाही. या दरम्यानच्या काळात फार चांगल्या व्यक्तींनी आपले प्राण गमविले आहे. विशेष म्हणजे एकाला वाचविताना दुसर्‍याने जीवाला जीवाचे बलिदान दिले. हे फार वेदनादायी आहे. कारण, लहित येथे गेलेला आदर्श शिक्षक आणि दोन अभियंते, उंचखडक बु व खुर्द येथे गेलेले दोघे, पिंपळगाव निपाणी येते शेततळ्याचे काम करताना बुडून मयत झालेले दोघे, कोतुळला पाण्यात बुडालेला तो अपंग व्यक्ती आणि आज अकोले तालुक्यातील भंडारदार धरणात बुडालेला व्यक्ती अशा आठ जणांचा मृत्यू काळजाल चटका लावून जाणारा आहे. त्यामुळे, पाण्यापासून सावधान रहा.!

महत्वाचे...!

नागरिकांना एक विनंती आहे. आपण कोरोना रोखू शकलो ते आपल्या प्रत्येकाच्या घरी बसण्याने. मात्र, घरी असतांना कोणताही विरंगुळा शोधा मात्र, पाणी, वीज, आग्नी अशा जीवघेण्या गोष्टींपासून थोडे दिवस तरी दूर रहा. कारण, आपल्याला जगायचे आहे. म्हणून आपण घरात बसून कोरोनाला हारवितो आहे. तो आता हारला आहे. पण, ही ऐतिहासिक  जीत पाहण्यासाठी आपण स्वत: सुरक्षित रहावे. हीच कळकळीची विनंती आहे.
आकाश देशमुख
(राजूर प्रतिनिधी)

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------



(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 400 लेखांचे 39 लाख वाचक)