अखेर अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रवेश, लिंगदेवला एक पुरुष कोरोना बाधित.!

             
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एक पुरुष कोरोना बाधित रुग्न आढळल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे, गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेणाऱ्या प्रशासनाच्या प्रयत्नांना कलंक लागल्यासारखे झाले आहे. दरम्यान या व्यक्तीला कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे, अकोले आरोग्य विभाग मोठ्या शर्तीने प्रयत्न करीत आहे. आज शनिवार दि.  23 मे रोजी आरोग्य विभागाकडून हा अहवाल प्राप्त झाला असून अकोले प्रशासनाची आता एकच धांदल उडाली आहे. या  पुरुषाची तपासणी संगमनेरच्या एका खाजगी रुग्णालयात केली होती. आज ती खाजगी तपासणी पॉझिटीव्ह आली असून तिली लिंगदेव गावातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
         अकोले तालुक्यात अद्याप पावेतो एकही रुग्ण मिळून आला नव्हता. आता मात्र, तेथे एक कोरोना बाधित निघाल्याचे एका खाजगी तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे अकोले प्रशासनाची आता धांदळ उडाली आहे. आरोग्य व महसुल प्रशासनाने लिंगदेवकडे घाव घेतली असून तत्काळ पुढील उपायोजना राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी या माहितीचा दुजोरा दिला आहे. या पुरुषाची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात येणार असून तो अहवाल आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे.
    सद्या या महिलेस क्वारंटाईन करण्यात आले असून जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच ही महिला पुर्वीपासूनच क्वरंटाईन होती. त्यामुळे, कोरोनाचा प्रदुर्भाव होईल अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे, घाबरु नका पण काळजी घ्या असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

अकोले तालुक्यात आज लिंगदेव येथे एक पुरुष रुग्ण मिळून आला आहे. या व्यक्तीचे नाव महिला आणि पुरुष यासारखे संदिग्ध असावे म्हणून प्रशासनाने दिलेली माहिती पहिल्यांदा महिला संगण्यात आले होते. मात्र, नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच तो रुग्ण पुरुष असल्याचे सांगितले. त्यामुळे,  तो कोरोना  बाधित पुरुष आहे.


कॉपी पेष्ट बहाद्दरांनी बातमी चोरु नका. अन्यथा.....
सागर शिंदे
सुशांत पावसे