हिजडा म्हणाल्याप्रकरणी आ. डॉ. किरण लहामटेंवर गुन्हा दाखल करा! तृप्ती देसाई यांची मागणी, खा. सुळे व विधानसभेकडे तक्रार!

        
 सार्वभौम (पुणे) : 
                         निवृत्ती महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात दि. 23 फेब्रुवारी रोजी एका सभा भरविण्यात आली होती. त्यात अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तृतीयपंथीयांच्या भावना दुखावतील असे शब्दप्रयोग केले होते. या क्रांतीकारकांच्या भुमीमध्ये तुला काय हिजड्यांची पैदास वाटली काय! असे म्हणत त्यांनी तृतियपंथींच्या भावना दाखवल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. डॉ. लहामटे यांनी माझ्याबाबत देखील अक्षेपहार्य वक्तव्य केले आहे. त्यामुळे, काही देखील काही पत्रव्यहार करणार असल्याची माहिती देसाई यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय टिका टिप्पणी करताना हिजडा हा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे, त्यांच्यावर जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे यांच्या शब्दप्रयोगाने आमच्या भावान दुखावल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. आता हा वाद येथेच थांबला नाही. तर अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची देखील एक क्लिप व्हायरल होऊ लागली आहे. त्यानी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व तृतीयपंथी यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्याचे काही पुरावे देसाई यांनी माध्यमांना तसेच तृतीयपंथ्यांना दिले आहेत. डॉ. लहामटे यांनी जे शब्दप्रयोग केले आहे. ते अक्षेपहार्य असून ते भावना दुखावणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी देसाई यांनी केली आहे. त्यामुळे, हाच शब्दप्रयागे वारंवार करणार्‍या डॉक्टरांवर काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खा. सुप्रिया सुळे व विधानसभेत तक्रार करणार!
दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना सांगितले की, अकोल्याचे आमदार यांनी माझ्याबाबत देखील अक्षेपहार्य वक्तव्य केले आहे. त्यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे. इतकेच काय! हिजडे म्हणून त्यांनी तृतीयपंथींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, मी राज्यसरकार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील कारवाईची मागणी करणार आहे. कारण, ते जेव्हा शपथ घेतात तेव्हा म्हणतात आम्ही भेदभाव करणार नाही, सर्वांना समानतेची वागणूक देऊ. ही अशी त्यांची वागणूक आहे का? त्यामुळे, मी तृतीयपंथींशी सपर्क केला असून येत्या दोन दिवसात योग्यती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी सार्वभौमशी व्यक्त केली.
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 400 लेखांचे 39 लाख वाचक)