भारतीय क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू!


सार्वभौम (संगमनेर) :
                      भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा तथा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड (रा. आश्वी) यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुण पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना अचानक घडल्यामुळे संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. 
                      याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास राजेंद्र गायकवाड हे आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेले होते. मात्र, बराचं वेळ होऊनही ते घरी लवकर आले नाही. त्यामुळे, त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान त्याच परिसतरातील काही व्यक्तींना विचारणा देखील केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. यावेळी तपास करता-करता काहींनी शेतातील विहिरीलगत त्यांना आवाज देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला.
                           
  दरम्यान एक संशय म्हणून सहज विहिरीत डोकावून पाहिले. कारण तेथे त्यांची चप्पल पडलेली होती. तर  त्यांचा मृतदेह विहरीत आढळून आला. यानतंर एका पोहणार्‍या व्यक्तीस बोलावून गावकरी व नातेवाईकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर फार उशिर झालेला होता. त्यांच्यावर बुधवारी शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले आहे. गायकवाड हे शारिरीक व मानसिक दृष्य नैसर्गिकरित्य खचलेले होते. त्यामुळे, विहीरीच्या काठी गेल्यानंतर त्यांना चक्कर आल्यानंतर हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे.
                        दरम्यान राजेद्रं गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे यांचे मामा असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजय, तीन बहीनी, मेव्हणे व वडील असा मोठा परिवार आहे. येथिल प्रसिद्ध डॉक्टर गणेश गायकवाड यांचे ते बंधु होते. त्याच्या अकस्मात निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 38 लाख वाचक)