नगर जिल्ह्यात शुक्रवार पासून जनजीवण पुर्वपदावर येणार.! बाजारपेठा, बस, गाड्या, उद्योग, बँका, सलून, रेस्टॅरन्ट असे विविध व्यवहार सुरु होणार! नियम व अटी! रेड झोन बंदच


सार्वभौम (अहमदनगर) :- 
                        दिनांक 20 मे अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 22 मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. अर्थात, जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्ये प्रतिबंधीत केलेल्या व्यवहार व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहारासाठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
             अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन मध्ये करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता वरील प्रमाणे नॉन रेड झोन मध्ये प्रतिबंधीत केलेल्या व्यवहारा व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहार खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परवानगी दिलेले व्यवहार करण्यासाठी कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता असणार नाही.
                        क्रीडासंकूले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी खुले ठेवण्याची परवानगी असेल. तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहारासाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस परवानगी असेल त्यासाठी दुचाकीवर 1 स्वार, तीन चाकीवर तीन स्वार, चार चाकीत तीन स्वार, जिल्हांतर्गत बस सेवेस जास्तीत-जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
                       सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी 09 ते सायं. 05 या कालावधीत खुली राहतील. तसेच बाजारपेठा, दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास स्थानिक प्रशासन त्वरीत अशा बाजारपेठा व दुकाने बंद करण्याची कार्यवाही करतील.  
अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये असल्याने सार्वजनिक ठिकाणी व कामाचे ठिकाणी कोव्हीड 19 चे व्यवस्थापनाचे दृष्टीने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणार्‍यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे.
                      विवाह समारंभात सामाजिक अंतराचे पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अंत्यविधीस सामाजिक अंतराचे पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. दुकानांचे ठिकाणी ग्राहकांमध्ये कमीत कमी 06 फुट अंतर असेल व 05 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. यामध्ये, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्तव कामांच्या व व्यवसायांच्या वेळांचे नियोजन करावे.
                  कामाचे ठिकाणी आत येण्याचे व बाहेर जाण्याचे मार्ग तसेच सामाईक मोकळ्या जागांचे ठिकाणी थर्मल स्कॅनर, हॅण्ड वॉश व सॅनिटायझर्स पुरविण्यात यावे. कामाचे ठिकाणी, सुविधा केंद्राचे ठिकाणी सर्वसामान्यपणे वेळोवेळी हाताळण्यात येणारे भाग किंवा वस्तू  (उदा. दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट स्वीच, विजेची बटणे इ.) यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कामांचे ठिकाणांचे सर्व प्रभारी यांनी त्याठिकाणी कामगार तथा कर्मचारी यांचेमध्ये योग्य अंतरासह तसेच शिफ्ट दरम्यान व जेवणाची वेळ यादरम्यान योग्य अंतर ठेवून सामाजिक अंतराचे पालन करावे. असा न झाल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहतील.

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 31 मे पर्यंत वाढविला आहे. लॉकडाऊन संदर्भांत सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामुळे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी लॉकडाऊन संदर्भांत सुधारीत मार्गदर्शक सुचनांसह प्रतिबंधात्मक आदेश दि.31 मे रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार, अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये  कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशान्वये दि.22 मे, 2020 रोजी पासून ते दि. 31 मे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे.
सागर शिंदे