अरे देवा! त्याच्या बायकोला देखील कोरोना झाला ! संगमनेरात पुन्हा एक रुग्ण, बाकी निगटीव्ह!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात रहेमतनगर येथे राहणार्या एका व्यक्तीस कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्ती तसेच निमोण येथील काही व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील 48 अहवाल आज बुधवार दि.20 मे रोजी प्राप्त झाले आहेत. त्यात नगर शहरातील एक सुभेदार गल्लीतील रिक्षावाला व संगमनेर शहरातील रेहमतनगर येथे जो कोरोनाबाधित होता, त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संख्या 68 झाली आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे नगरचे 48 अहवाल पाठविले होते. त्यापैकी आज 45 रिपोर्ट निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. मात्र, नगर शहरातील मंगळवार बाजार आणि संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे जो कोरोना बाधित व्यक्ती मिळून आला होता. त्याच्या पत्नीला देखील कोरोना झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, संगमनेरचा आलेख वाढता झाला असून दिवसेंदिवस प्रशासनाचे काम वाढत आहे. हे अहवाल प्राप्त झाले असले तरी अद्याप काही महत्वाचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यातून अधिकची बाधित संकल्पना स्पष्ट होणार आहे.