अकोल्यातील पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा कोरोना तपासणी दरम्यान मृत्यू; कारण गुलदस्त्यात; नवलेवाडी व धुमाळवाडी परिसरातील महिला,


सार्वभौम (अकोले) : 
                            अकोले तालुक्यात नवलेवाडी व धुमाळवाडी या परिसरात राहणार्‍या एका पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा कोरोना तपासणी करण्यासाठी नगरला नेले असता. तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दरम्यान या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे. याची अद्याप डॉक्टरांना खात्री पटलेली नाही. त्यामुळे, तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. हा प्रकारामुळे, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसे अन्य अफवा पसरवू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुमाळवाडी व नवलेवाडी ही दोन्ही गावे शेजारी शेजारी आहे. यांचे आरोग्य राखण्याचे काम म्हाळादेवी आरोग्य विभागाच्या अंतर्गत येते. या कर्मचार्‍यांनी संबंधित महिलेस थोडा त्रास होत असल्यामुळे सोमवारी रात्री कोरोना, सारी व अन्य  तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेले होते. दरम्यान तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी या महिलेचा अचानक मृत्यु झाला आहे. ही महिला पाच महिन्यांची गरोदर होते. तर तिला पुर्वीपासून अस्ममाचा विकार होता अशी माहिती वैद्यकीय अधिक्षकांकडून मिळाली आहे. दरम्यान सोमवारी रात्री तिच्या कोरोना तपासणीसाठी काही नमुने घेतले होते. त्यानंतर आज तिचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे देखील सागितले जाते. मात्र, अचानक या महिलेला मृत्युला सामोरे का जावे लागले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
                     
  अकोले तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही पेशन्ट नाही. त्यामुळे प्रशासन कसून काम करीत आहे. त्यामुळे हा मृत्यू कसा झाला याबाबत प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारणा केली आहे. मात्र, अद्याप त्याचे काही निदान झालेले नाही. ज्या काही शंका आहेत. त्यांची खात्री केली जाईल त्यांनतर कारण उघड होईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, या अचानक दोन जीवांचा मृत्यू होतो. याला कोणी दोषी आहेत का? मृत्यूचे कारण काय? याची सखोल चौकशी होणार आहे. त्यानंतर बर्‍याच गोष्ठी उघड होतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान जोवर काही माहिती मिळत नाही. तोवर कोणी अफवा पसरवू नये. प्रशासनाला मदत करावी. नागरिकांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


विनाकारण कोणी बाहेर दिसला तर 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.
सुचना :  कृपया कोणी बातमी कॉपी करु नये!
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)