आमदारकीच्या ‘रथाचे श्रीकृष्ण’ म्हणजे अशोक भांगरे, विधानपरिषदेवर हवेत!


सागर शिंदे

दै. रोखठोक सार्वभौम (अकोले) :- राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेेते तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी हातातील घड्याळ सोडले आणि भाजपत प्रवेश करुन पराभव पायावर पाडून घेतला. त्यांचा पक्षपात हा जनतेला जिव्हारी लागला, तरी देखील त्यांना विजयाची खात्री होती. कारण, अनेक उमेदवारांची मतविभागणी किंवा कोणालातरी पुढे करु एकास-एक होऊ द्यायचे नाही. हीच त्यांची नियमीतची व्युव्हरचना सपसेल खोटी ठरली. इतकेच काय ! रिपाई, शिवसेना आणि भाजप यामुळे आपला विजय 50 ते 60 हजारांनी होईल अशी आकडेमोड त्यांच्याभोवती मलिदा खाणार्‍यांच्या तोंडून वारंवार होत होती. पण, वेळ आली तेव्हा ‘टांग पलटी घोडे फरार’ झाल्याचे पहायला मिळाले. अर्थात, हा टांगा पलटी करणारा कोण? असा प्रश्न पडला. पण याचे उत्तर जर आ. डॉ. किरण लहामटे असे मिळत असेल.
                             अशोक भांगरे (रा. शेंडी) माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे सुपुत्र तर माजी आमदार गोपाळ भांगरे यांचे नातलग.! तशीतर फार मोठी परंपरा यांनी जोपासली आहे. परंतु, पिचड कुटुंबाचा पराभव करण्यात त्यांना यश आले नाही. ही सर्वात मोठी खंत आजही त्यांच्या मनात सलत आहे. ‘हम नही तो और सही’! असे म्हणत डॉ. लहामटे यांना पवार साहेबांच्या शब्दाखातर साथ दिली आणि अकोल्याच्या घड्याळाचे काटे सुईच्या दिशेने नियमीतपणे विधानसभेत फिरले. खरंतर आजवर भांगरे यांनी अनेक पक्ष बदलले हा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे नकळत त्यांची बदनामी झाली आणि पर्याय म्हणून डॉक्टर समोर आले. पण, वास्तवात त्यांना मागे ठेवण्यासाठी तालुक्यात एक अदृश्य शक्ती कार्यरत होती. हे देखील वेळ आल्यानंतर समोर येईल. पण, त्यांनी पक्ष बदलले त्याची कारण मिमांत्सा कोणी करु शकले नाही. अर्थात त्यांचा प्रत्येक बंड हा पिचड कुटुंबाच्या विरोधात राहिला आहे. अपवाद म्हणून देखील तुम्हाला कोठे उदाहरण सापडणार नाही. जनता दल, अपक्ष, शिवसेना, मनसे, भाजप असा टोकाचा संघर्ष टिकविण्यासाठी त्यांनी विरोध जिवंत ठेवला. त्याचे फलित म्हणून त्यांना फितुरीचा शिक्का मिळाला. जर, फितुरी करायची असती. तर, याच निवडणुकीत काय कमी झाले असते? पण, राघोजी भांगर्‍यांचे रक्त जातीच्या नावाखाली समाजात बाटलं गेलं असलं. तरी, त्याला लालुच नाही, बेईमानी नाही. याचे ‘प्रमाण’ या निवडणुकीने दिले आहे. त्यामुळे, आता आरोप करणार्‍यांच्या दातखिळ बसविणारा हा प्रत्येय असून यानंतर कोणी ‘फितुर’ म्हणाल तर ‘जबड्यात हात घालन, दात हातात देऊ’ असेच अमित भांगरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
                          खरंतर राष्ट्रवादीचा पडता काळ होता. तेव्हा पिचड साहेबांनी सोडलेली साथ पवार साहेबांच्या जिव्हारी लागून गेली. पवार साहेबांनी कितीही ठरविले असते. तरी पिचड कुटुंबाचा पराभव ते करुच शकले नसते. अशोक भांगरे यांना सोडून तर नाहीच नाही. हे कटू वाटत असले तरी ते सत्य आहे. कारण, त्यांचे अस्तित्व कोणताही पक्ष म्हणून नाही. तर, माणूस म्हणून भांगरे यांना माणनारा 20 ते 30 हजार जनतेचा समुदाय आहे. एखादे काम झाले म्हणजे त्यांच्याकडे डोकून पहायचे नाही, संपर्क करायचा नाही.! असा स्वार्थी स्वभाव अशोक भांगरे यांनी कधीच बाळगला नाही. असे इतिहासाला साक्ष असलेले लोक सांगतात. त्यामुळे, त्यांनी अपक्ष जरी अर्ज भरला असता. तरी मतांची विभागणी झाली असती. आज जे 56 हजारांचे लिड मिळाले आहे. ते सोबत नसते तर वातावरण निर्मिती झाली नसती. त्यामुळे, अकोले आमदारकीच्या ‘परिघाचा केंद्रबिंदू’ भांगरे आहेत. हे नव्याने स्पष्ट करायला नको. त्यामुळे, भांगरे कुटुंबाला पवार कुटुंबाने डावलू नये. अशीच अपेक्षा स्थानिक निष्ठावंत राष्ट्रवादीकडून होत आहे.
                             यशवंत भांगरे यांच्या रुपाने या कुटुंबाला 50 वर्षाचा सामाजिक व राजकीय वारसा आहे. तर, त्यांच्या पाठोपाठ अशोक भांगरे यांनी 40 वर्षे तो रथ अविरत चालता ठेवला आहे. त्यामुळे, श्रीगोंदा पॅटर्नची पुनरावृत्ती अकोल्यात यशस्वी पार पाडणार्‍या भांगरे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी विधानपरिषदेवर घ्यावे. अशी विनंती अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, अकोले शहर अध्यक्ष संपतराव नाईकवाडी, युवक अध्यक्ष रविंद्र मालुंजकर, युवक शहर अध्यक्ष अमित नाईकवाडी, पोपटराव दराडे, प्रा. सुरेश खांडगे, आर के उगले, जेष्ठ नेते मिनानाथ पांडे, राजेंद्र कुमकर, कोंडाजीबाबा ढोन्नर, पाटिलबुवा साांवत, संदिप शेेेेणकर, विकास बंगाळ, रामहारी चौधरी, विनोद हांडे, मारुती लांघी, बबनराव तिकांडे, दिपक वैद्य, अंकुश वैद्य, राज वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, संतोष शिंदे, संजय वाकचौरे, तान्हाजी देशमुख, सचिन चौधरी, संतोष नाईकवाडी, योगेश नाईकवाडी, शेंगाळ, नवनाथ पांडे, साहेबराव देवकर, सुनिल दराडे, धोंगडे साहेब, अस्वले यांनी केली आहे.
आजच्या अंकात ६ मे
                   आज खर्या अर्थाेन रथाचे सारथी खरे कोण असेल. तर ते अशोक भांगरे हे आहेत. त्यांनी जर पुढाकार घेऊन प्रचाराचे कासरे खेचले नसते. तर, 40 वर्षाचा रथ कोणी आकळू शकले नसते. हेच वास्तव आहे. इतकेच काय ! शरद पवारांच्या बुद्धीबळाचा वजीर होण्याचे भाग्य देखील भांगरे यांनी आपल्या कपाळी लावून घेतले आहे. भांगरे यांनी या निवडणुकीत श्रीकृष्णाची भुमिका निभविली. म्हणून तर हा विजय शक्य झाला. हे कोणी नाकारु शकत नाही. आता या सर्वांचे फलित म्हणून तालुक्यात इतिहास रचणार्‍या अशोक भांगरे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर घ्यावे.! अशी मागणी अकोल्यातील राष्ट्रवादी समर्थकांनी केली आहे.

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)