संगमनेर झाले शंभर टक्के कोरोनामुक्त, त्या चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह! आज मिळाला डिस्चार्ज, आठही रुग्ण ठणठणीत.. तर हॉट्स्पॉट उठले
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण मिळून आले होते. आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवार दि. 10 एप्रिल रात्री हॉट्स्पॉट घोषित केले होते. मात्र, संगमनेरात आणखी चार नवे रुग्ण असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आणि संगमनेरकरांच्या समस्येत वाढ झाली. ज्या दिवशी हॉट्स्पॉट उठणार त्याच दिवशी नवे रुग्ण मिळून आल्यानंतर हा कालावधि वाढविला गेला होता. मात्र, आता संगमनेरच्या त्या चारही रूग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, संगमनेरकरांसाठी ही एक खुशीची खबर असून काही दिवसात येथील हॉट्स्पॉट उठण्याची शक्यता आहे.
![]() |
गाडी निघाली आहे.! |
संगमनेरकरांच्या बेजबाबदार पणामुळे तालुक्यात आठ जणांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरलाच. मात्र, प्रशासनाला देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दुर्दैवाने शहरात बाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांना दिली गेली नाही. त्यामुळे अनर्थ वाढत गेला. इतकेच काय हे चार रुग्ण आढळल्यानंतर आणखी चार मिळून आले. ते देखील होमक्वारंटाईन केलेले असताना देखील आणि त्यांची वैद्यकीय चाचणी केलेली असताना देखील त्यांनी नंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे हॉट्स्पॉट सारख्या बंधिस्त यंत्रणेला तोंड देताना नागरिक आणि प्रशानाच्या नाकीनव आले. मात्र, सुदैव असे की, प्रशासनाची तत्परता मानावी तितकी कमीच आहे. कारण, हे 14 तबलिगी त्यांनी तत्काळ शहराबाहेर होमक्वारंटाईन केले होते. पोलिसांनी त्यांचा जीव धोक्यात घालुन यांची रवानगी केली होती. नंतर यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ते पोलीस शंकेनेच व्हेंटीलेटरवर पडले होते. मात्र, सुदैवाने असे काही झाले नाही.
दरम्यान हरात 14 एप्रिल रोजी हॉट्स्पॉट संपल्यानंतर ते पुन्हा नऊ दिवस त्याची मर्यादा वाढविण्यात आली होती. या 14 दिवसांच्या दरम्यान येथे सर्व सुविधा शासनाने पुरविल्या आहेत. या परिसरात तब्बल संगमनेरात 1 हजार 854 कुटूंबातील 9 हजार 555 नागरिक पुन्हा होमक्वारंटाईन करण्याता आले होते. आता या चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्यांना आज सोडले आहे. त्यामुळे, येणार्या काळात जर एखादा रुग्ण मिळाला नाही तर येथील हॉट्स्पॉट उठणार यात शंका नाही. सद्या एकचा व्यक्तीचा अहवाल येणे बाकी आहे. मात्र, शासनाचे आदेश येईपर्यंत नियमांचे उल्लंघन करु नये. अशी सुचना प्रशासनाने केली आहे.
नियम व अटी
विनाकारण कोणी बाहेर दिसला तर 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.
सुचना : कृपया कोणी बातमी कॉपी करु नये!
सागर शिंदे
sushant pawse
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)