अकोल्यात भरलाय वेड्यांचा बाजार! कोरोनाला प्रशासनाचे निमंत्रण! तुमचा बाजार उठवा.! संघटना आक्रमक!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण मिळून आलेला नाही. मात्र, तो अगदी 10 किलोमीटर अंतरावर येऊन ठेपला आहे. असे असताना अकोले प्रशासनाने जी खबरदारी घ्यायला हवी. ती घेतली जात नसून केवळ महसुलपोटी सगळा बाजार एकत्र भरविला असून हा प्रकार म्हणजे कोरोनाला निमंत्रण ठरले आहे. प्रशासनाचा हा प्रकार जनतेला आवडला नसून हा निर्णय नसून तो वेड्यांचा बाजार आहे. असे परखड मत तालुक्यातील काही संघटनांनी मांडले आहे. त्यामुळे, आजवर प्रशासनाने जे काम केले आहे. ते नक्कीच कौतुकास्पद असून त्यावर पाणी फेरणारा हा प्रकार आहे. त्यामुळे, एकवेळी महसूल नाही मिळाला तरी चालेल. मात्र, एकत्र बाजार भरवू नये. अशी विनंती सर्वानुमते प्रशासनाला करण्यात आली आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे. की, रोखठोक सार्वभौम हे एक निर्भीड वृत्तपत्र आहे. त्यामुळे, आमच्या भावना प्रशासनाकडे आपण प्रभाविपणे माडू शकता. म्हणून हे पत्र आहे. प्रथमत: अकोले तालुक्यात जे अधिकारी कोविड योद्धे म्हणून तुम्ही शब्दांकीत केले. त्यांना खरोखर सलाम व त्यांचे अभिनंदन. त्यांनी जे काही काम केले. त्याचे फलित म्हणून आज अकोले सुरक्षित आहेत. मात्र, आम्ही एक नागरिक म्हणून त्यांनी जो एकत्र बाजार भरविण्याचा प्रयोग केला. तो अक्षरश: चुकीचा असल्याचा वारंवार भासते आहे.
कारण, गेल्या काही दिवसांपासून प्रशासन अगदी झटून काम करीत होते. मात्र, आता अकोले शहरात बाजारपेठेकडे पाहिले की, भिती वाटू लागली आहे. कारण, येथे होणारी गर्दी, व्यापारी, शेतकरी, ग्राहक यांच्या मुक्तसंचाराचे चित्र पाहिले की वाटते. हा प्रकार म्हणजे पुढील काही दिवसात धोक्याची घंटीतरा सुतोवाच तर नाही ना? खरोखर याचे चिंता केले पाहिजे.
आज अकोल्यापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावर असणार्या धांदरफळ गावात आणि 20 कोलोमीटरवर असणार्या संगमनेर शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण सापडतात. या गोष्टीला अद्याप चौदा दिवस देखील झालेले नाहीत. जेव्हा रुग्ण नव्हते तेव्हा आपले प्रशासन अकोल्याची फार काळजी घेत होते. मात्र, आज कोरोना वेशीवर येवून बसला आहे. असे असताना हे प्रशासन तितकी काळजी व प्रतिबंध करतय असे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये अजिबात दिसत नाही. मग यात प्रशासनाचा एकमेकांमधील समन्वयाचा अभाव म्हणावा लागेल, नाहीतर आत्तापर्यंतच्या कोरोनाच्या लढाईतील यशात आलेल्या कामाचा आलेला थकवा. कारण काहीही असू शकते.
एकीकडे जिल्हाधिकारी सांगतात आठवडे बाजार भरवू नये, एका ठिकाणी गर्दी करु नये! सोशल डिस्टन्स पाळले जावेत, तोंडला मास्क आवश्यक आहे. असे अनेक नियम असताना या नियमांची शहरात रोज पायमल्ली होत आहे. मग जिल्हाधिकार्यांनी अकोल्यासाठी काही वेगळी नियमावली तयार केली आहे. का? असेल तर ती जाहिर करावी. एक दुर्दैव असे की, अकोल्यात सोडा जिल्ह्यात जितकी लोकं कोरोनाने मयत झाली नाही. तितकी घरात कंटाळून बाहेर पडल्यानंतर झाली आहे. कारण, एकाच आठवड्यात अकोले तालुक्यात सात जणांची बळी केवळ पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर झाला आहे. गर तुम्ही दुपारी प्रवरा नदीवर पाहिले तर अक्षरश: तेथे जत्रा भरते यावर अंकुश कोणाचा हवा आहे? कोठे आहे जमावबंदी आणि सोशल डिस्टन्स!यात सर्वांमध्ये आम्ही एक गोष्ट लक्षात आणून देतो की, जेव्हा बाजारतळावर बाजार भरत नव्हता. त्यावेळी अकोल्याच्या आजुबाजुला खरे शेतकरी आपला भाजीपाल्याचा माल विक्री करत होते. तेव्हा थेट शेतकरी ते ग्राहक असा सहसंबंध होता. जो तो आपल्या घराजवळ भाजी स्टॅल लावून भाजी घेत होता तर कोणी विकत होते. ती गर्दी विभागून जात होती. त्यामुळे गर्दी असली तरी सोशल डिस्टन्स आपोआप निर्माण होत होता. आता मात्र, गर्दी एकाच ठिकाणी जमते आहे. यात महत्वाचे म्हणजे आता शेतकरी कमी परंतु व्यापारी शेतकर्यांकडून माल घेऊन विक्री करत असून हा खर्या अर्थाने लुटमार करणारा बाजार भरत आहे. इतकेच काय! तर हा कोरोनाला निमंत्रण देणारा वेड्यांचा बाजार आहे. तो तत्काळ बंद केला पाहिजे. अशी मागणी करण्यात आली आहे.
चलो अकोले..!! चलो अकोले..!!
संगमनेर संपूर्ण लोकडॉऊन करण्यात आले आहे. त्यामुळे तेथेल काही महाशय अनके वस्तू घेण्यासाठी चक्क अकोले गाठत आहे. संगमनेरचे काही मद्यशौकीन अकोल्याच्या रांगेत दिसत आहेत. इतकेच काय! तेथील अनेक रुग्ण, गरजेच्या वस्तु घेणारे नागरिक, मद्यपी अकोल्याच्या मार्केटमध्ये येत आहेत. त्यांच्या प्रतिबंधासाठी आपल्याडे काय उपाययोजना आहे हे देखील पाहिले पाहिजे.
या सर्व प्रकारातील महत्वाची बाब म्हणजे, गर्दी जमवू नये, एकत्र बाजार भरवू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा अशा सुचना शरद पवार साहेबांपासून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अनेकांनी सांगितले आहे. मात्र, चक्क लोकप्रतिनिधींच्या सांगण्याहून आपण एकत्र बाजार भरविला आहे. असे उत्तर प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे, रक्षकच भक्षकाचे निर्णय घेऊ लागले आहेत की काय! असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.!
तरच आम्ही नक्की दिवे लावू..अकोल्याच्या अधिकार्यांचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण, त्यांनी प्रत्येक गोष्टी स्वत:च्या मनाने किंवा कोणाच्या सांगण्याने घेऊ नये. ज्याला जनतेचा विरोध आहे. जे सरळ सरळ दिसते आहे. ते तुम्ही स्विकारून जनतेच्या माथी मारू नका. हे राजकारण नाही तर जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आम्हला जर अपेक्षित कामे केली तर आम्ही नक्कीच आपल्या कोविड योद्ध्यांसाठी एक दिवा लावू
- स्व. जितेंद्र पिचड सेवाभावी संस्था, अकोले
सागर शिंदे