संगमनेरात खडकावर 24 तास पाणी, पठारावर भर उन्हाळ्यात हिरवीगार शेती, ओसाड गावची यशस्वी कहाणी!


   सार्वभौम (संगमनेर) : 
              संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात शिरोळे मळा आणि माहुलीची वाडी येथे चक्क खडकावर लाखो लिटर पाणी साचले आहे. त्यावर चार हजार जनता आपली तहान भगवत असून 200 शे एकर माती ओली होऊन खर्‍या अर्थाने शेतकर्‍याची भाकर आणि त्याच्या अर्धांगिनीच्या डोक्यावरील हिरवीगार  पदर झाली आहे. असे म्हणतात प्रयत्न करता वाळुतून तेलही गळे. त्यालाच साजेसे हे श्रम महिलांच्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे. कारण, उभा उन्हाळा डोक्यावर घेत शेकडो माहिलांनी 2018 मध्ये गाळलेल्या घामाची साठवण आज या बंधार्‍यात होत आहे. त्यामुळे, गेली वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी मरण पायाखाली घेऊन हंडे वाहणार्‍या महिलांना आज पाणी घरात मिळत आहे. ही किमया केली ती जलयुक्त शिवार आणि पाणी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने खंदरमाळवाडी येथील गावकर्‍यांनी. त्यामुळे, आज वर्षानुवर्षाचा प्रश्न सुटला असून येथील शेती आणि घरातील माय माऊली पाण्यासाठी वणवण करीत आहे. हेच त्यांच्या कष्टाचे फलित आहे.
               सन 2016 मध्ये अभिनेता अमिर खान व किरण राव यांनी पाणी फाऊंडेशनची स्थापना केली होती. शेतकर्‍यांचे हाल पाहून सत्यमेव जयतेच्या माध्यमातून हा प्रोजक्ट उभा राहिला. बोलबोल करता खडकाळ आणि बेवारस जमिनीवर हजारो टिएमसी पाणी साचले. कालवर ज्या शेतात शेतकरी आत्महत्या करीत होता, त्याच शेतात आज तोच बळीराजा नांगर हाकून सोनं पिकवत आहे. हे शक्य झाले ते जयलुक्त शिवार आणि पाणी फाऊंडेशनमुळे. हे चित्र राज्यात पहायला मिळालेच मात्र, नगर जिल्ह्यात त्याची सरासरी फार होती. त्यात संगमनेर तालुका कोठेच कमी नव्हता. तेव्हा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गावागावात जाऊन काळजाचे पाणी करुण पाणी आडवा पाणी जीरवा हा संदेश दिला होता. तेव्हाच खर्‍या अर्थाने  खंदरमाळवाडी गावाला कळा येऊ लागली होती. त्यांच्यानंतर पाणी फाऊंडेशनने या गावाला हात दिला आणि अशक्याचे शक्यात रुपांतर झाले.
                  ते साल 2018 चे होते. गावात पिण्यासाठी पाणी मिळणे अशक्य होते. महिला दोन हांड्यांसाठी रानीवणी भटकून पाण्यासाठी पायपिट करीत असे. पोटासाठीच पाणी नाही. तर शेतासाठी कोठून मिळणार? त्यामुळे, काळ्या-भुरक्या कसदार जमिनी भेगाडल्या होत्या. त्यांचा आत्मा तृप्त होण्यासाठी आठ महिने पावसाळ्याची वाट पहावी लागत असे. यामुळे, जमीन असून देखील शेतकरी म्हणण्याची धाडस भल्याभल्याची होत नसे. पण हे दरीद्री किती दिवस चालणार होती. त्यामुळे एकदा गावच्या सरपंच सौ. वैशालीताई किशोर डोके यांनी गावचे सर्वेक्षण केले. यापुर्वी गावात पाणी आणण्यासाठी फार वेळा बैठका झाल्या होता. कोणी समर्थक तर कोणी विरोधक असे हो-ना करत पाण्याचा प्रश्न गेली कित्तक वर्षे प्रलंबित पडला होता. त्या दिवशी गावातील महिलांनी ठरविले होते. रोज पाण्यासाठी चुंभळ करणारा पदर आज कंबरेला खोवायचा आणि थेट बंधार्‍याचा पाया आपण स्वत: रचायचा. त्या दिवशी महिला आणि गावकर्‍यांनी प्रण आखला आणि कामाला सुरूवात झाली.
     
                        एप्रिल-मे चे उन डोक्यावर मी म्हणत होते. गावातील बहुतांशी महिला, लहान मुले, बुजूर्ग, युवा तरुण सगळेच बंधार्‍यावर आपला घाम गाळू लागले. त्यांच्या कष्टाला एक दिवस फळ येणार हे प्रत्येकला माहित होते. हे अथक परिश्रम तब्बल 45 दिवस चालले. पाणी फाऊंडेशनची मदत, यंत्रसामग्री आणि स्थानिक व्यक्तींची इच्छाशक्ती यांचा मिलाप झाला आणि बंधार्‍यात 40 एमसीएफटी पाण्याची साठवण झाली. पुर्वीची नालाबंर्डींग व माथा ते पायथा संकल्पना आज प्रत्यक्षात उतरली. त्यामुळे, खंदरमाळवाडी परिसरातील 200 एकर शेती पाण्याखाली आली. महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला. आज पठार भाग म्हटलं की अनेकांच्या संकल्पना ओसाड पडतात. मात्र, खंदरमाळवाडी ही त्यास अपवाद ठरले आहे. आपल्या समस्या सरकारच्या माथी मारत असले तर त्यातून काहीच हाती लागत नाही. मात्र, उठा आणि स्वत:चे शिल्पकार स्वत: व्हा! असे म्हणून वाट शोधण्यास सुरूवात केली की अपयश येत नाही. हेच खंदरमाळवाडी येथील गावकर्‍यांनी सिद्ध करून दाखविले आहे
                        आज पठार भागात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहे. हजारो एकर शेती पडीक आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. जर प्रत्येक ठिकाणी असे कर्तुत्वान व इच्छाशक्ती असणारे सक्षम लोकप्रतिनिधी बसले तर कोणतेच गाव तहानलेले राहणार नाही. आज राळेगणसिद्धी व हिवरे बाजार अशा गावांची प्रेरणा घेऊन हजारो गावांनी आपले अस्तित्व उभे केले आहे. अर्थात हे कोण्या एकाचे काम नाही, तर हे एकीचे बळ आहे. याबाबत गावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, अ‍ॅड. दिलीप साळगट, जयकिसान पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नारायण भागवत, ज्ञानदेव शिरोळे, धोंडीभाऊ शिरोळे, किरण शिरोळे, सोपान हांडे, शरद सुपेकर आदि ग्रामस्थांनी गावकर्‍यांचे कौतुक केले आहे.

मागील वर्षी आमच्या शिरोळे मळ्यात पाणी फाऊंडेशनची कामे मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे आज भर उन्हाळ्यात विहीरी, कुपनलीकांनासह नाल्यांमध्ये भरपूर पाणी आहे. यापूर्वी आम्हाला भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सगळीकडे पाणीच पाणी पाहवयास मिळत आहे. ही सर्व किमया पाणी फाऊंडेशनची आहे. 
- धोंडीभाऊ चिमाजी


 शिरोळे मळ्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी आडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आज भर उन्हाळ्यात याठिकाणी पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे आम्हाला दुष्काळ जाणवला नाही. त्याच बरोबर मागील वर्षी टँकर सुरू होता. मात्र, यावर्षी टँकरची गरज पडली नाही. ही सर्व पाणी फाऊंडेशनची किमया आहे. जर अशाच पद्धतीने शेतकर्यांनी मनावर घेतले तर सर्वजण पाण्याने समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
- ज्ञानदेव शिरोळे

   मागील वर्षी आम्ही शिरोळेमळा याठिकाणी  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावच्या सरपंच वैशालीताई डोके, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके आदिंनी एकत्र येवून पाणी फाऊंडेशनचे काम केले आहे. आणी त्याचाच फायदा यावर्षी या भागाला झाला आहे. मे महिना सुरू झाला असून, अजूनही भरपूर प्रमाणात पाणी याठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे आजूनही आपल्या सर्वांना पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून खंदरमाळवाडी गावासह वाड्या वस्त्यांचा कायापालट करायचा आहे.
- अ‍ॅड. दिलीप  साळगट

सागर  शिंदे
8888782010
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 329 दिवसात 401 लेखांचे 34 लाख वाचक)