हा तर सामुहीक बलात्कार? एक आरोपी मोकाट, पोलीस हारतुर्‍यात मग्न!


अकोले (प्रतिनिधी) :- 
                       अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात जी घटना घडली होती. ती अतिशय अमानविय आहे. यात पोलिसांनी दोन आरोपी अटक केले असून अद्याप एक आरोपी पसार आहे. ही घटना अकोलेकरांनी इतकी साधारणपणे पचविली की, याची ग्रॉव्हिटी सामाजिक संघटना आणि राजकीय पुढारी आणि जे सजग नागरिक म्हणून मिरवतात, त्यांनी कोणतीही पत्रकबाजी केली नाही, ना सखोल तपासाची मागणी कोणाला करु वाटली. वास्तव पाहता नशिब त्या पीडित मुलीचे, कि तिच्या जीवंतपणी भले तिला कोणाची मदत मिळाली नाही. पण, मृत्युपश्चात काही पोलीस अधिकारी असे मिळाले की, त्यांनी न्यायात्मक दृष्टीकोण ठेऊन सखोल तपास केला. अन्यथा पहिल्याच आरोपीवर हा तपास थांबला असता आणि विरगाव दरोड्याप्रमाणे कित्तेक दिवस ही केस चालली असती आणि आरोपी निर्दोष मुक्त झाला असता. अकोले तालुक्यातील वेदांत देशमुख हे प्रकरण सर्वाना ज्ञात आहे. त्याचे काय झाले? संशयीत म्हणून एकास अटक केली मात्र, कोणताही सबळ पुरावा नाही ना प्रबळ दोषारोपपत्र! ही अशीच गुन्हे दडपवून जनप्रक्षोभ शांत करायचा. मात्र पीडितेच्या न्यायाचे काय?
             
 तुमाला माहित असेल, कोपर्डी प्रकरणात देखील सामुहीक बलात्काराची कलमे नव्हती, त्यात तिघांना 120 (ब) प्रमाणे फाशी झाली आहे. त्या तुलनेत हे प्रकरण कमी नाही. त्यावेळी केेवळ जातीयवाद उभे केल्याचे बोलले गेले. आता ते वास्तव वाटू लागले आहे. कारण, या पीडितेच्या आरोपींना फाशीवर लटकविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरायला तयार नाही. जिल्हाधिकारी, एसपी, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना कोणी निवेदने द्यायाला तयार नाहीत. केवळ का ? तर पीडित मुलगी आदिवासी आहे म्हणून तर नाही ना? 
                           खूप काही प्रश्न उभे राहतात. पण, मांडावे कसे? कारण हा तालुका स्वत:ला पुरोगामी म्हणून घेतो. येथे निवडणुकीचे वारे वाहिले की, नेते जागे होतात. मोर्चे आंदोलने उभे करतात, पण एका पीडितेसाठी कोणी सरकारकडे मागणी करायला तयार नाही. आता ज्या पोलिसांनी एक आरोपी पकडला आहे. त्याचा साथीदार पकडण्यास कधी मुहुर्त काढणार देव जाणे! एकीकडे एक आरोपी मोकाट आहे आणि दुसरीकडे अवैध धंद्यावाल्यांचे हार सत्कार घेण्यात पोलीस धन्यता मानत आहे. त्यामुळे त्यांचे एका गोटातून कौतूक होत असले तरी दुसर्‍या बाजूने पोलिस टिकेचे धनी ठरत आहे.

 भाग 6 क्रमश:
सागर शिंदे
क्राईम स्पेशल
 ============

       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)