खानापूर खून व बलात्कारातील तो बोकड्या..अखेर, संगमनेर बाजारात मिळाला.!
अकोले (प्रतिनिधी) :-
खानापूर परिसरात झालेल्या अत्याचार व खून प्रकरणात सोमनाथ गायकवाड (रा. टाकळी) याने जो बोकड्या विकला होता. तो मिळून आला आहे. या नराधमाने तो संगमनेर मार्केटमध्ये विकला होता. तो पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची योग्या ठिकाणी रवाणगी केली आहे. हा बोकड तोच असल्याचे समोर येत असून ज्या व्यक्तीस तो विकला होता. त्याने देखील वास्तव माहिती पोलिसांना दिल्याचे समजते आहे. त्यामुळे या नराधमाच्या गळ्याभोवतीचा फास पक्का होत चालल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे हा तपास पोलीस उपअधिक्षक रोशन पंडीत यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी अनेक पथकांच्या मदतीने या तपासात सबळ पुरावे जमा केले आहे. त्यामुळे हा गुन्हा येणार्या काळात अंडरट्रायल चालवुन यात चांगल्या वकीलांची नियुक्ती झाल्यास पीडित मुलीस योग्य न्याय मिळू शकतो. असे सामाजिक संघटनांना वाटते आहे.
अकोले तालुक्याच्या जवळच खानापूर परिसरात एका आदिवासी मुलीशी अमानविय कृत्य करुन तिची निघृणपणे हत्या करण्यात आली. केवळ बोकड चोरण्याच्या बहाण्याने गेलेला हा नराधम थेट तिच्यावर देहावर तुटून पडला. तिने या घटनेची कोठे वाच्चता करू नये म्हणून तिच्या तोंडात टॉवेल कोंबून हत्या केली. ही घटना एकल्यानंतर अकोले तालुक्यात हा असला प्रकार घडला हे सांगताना अनेकांची जीभ तोतरी होते. मात्र, वासनेपोटी अशा प्रकारचे कृत्य घडते आणि त्यात जिव जातो हा प्रकार अगदी काळिमा फासणारा आहे.
भाग ५
पुढील अंकात
वाचा रोखठोक सार्वभौम
क्राईम रिपोर्टर
सागर शिंदे

जरी घटना घडत असल्या तरी त्याची उकल करणे हाच खरा पीडित मुलीला न्याय समजावा लागला. त्यामुळे पोलीस खात्याने गायकवाडच्या मुसक्या आवळून तिला खरा न्याय दिल्याच्या भावना अकोलेकरांनी व्यक्त केल्या आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा प्रकार घडला तरी कसा? त्याचा उलगडा केला असता लक्षात आले की, गायकवाड याचे काही नातेवाईक पीडित मुलीच्या घराजवळ राहत होते. त्यामुळे तो या परिसरात वारंवार ये-जा करीत होता. त्या दिवशी हा नराधम खानापूर परिसरात गेला होता. त्याला रस्त्यात बोकड दिसला त्याचा पाटलाग करीत असतांनी याची नियत फिरली आणि त्याने पीडितेवर अमानुषपणे अत्याचार केला. ती मयत झाली हे माहित असून देखील या बहादराने बोकडाचा शोध घेऊन तो तेथून पसार झाला. त्याने हा बोकड संगमनेरच्या बाजारात विकला. त्यानंतर पोलिसांच्या नजआड होऊन त्याला वाटले हा गुन्हा पचला. मात्र, कानुन के हाथ लंबे होते है.! असे म्हणतात हे वाक्य खरे ठरले. त्यानंतर पंडीत यांनी या गुन्ह्याचा सखोर तपास करुन तो बोकड ताब्यात घेतला असून त्याची योग्य काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी ठेवला आहे.दरम्यान हा तपास पोलीस अधिक्षक सागर पाटील, अप्पर एसपी दिपाली काळे मॅडम, डिवायएसपी रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आदविंद जोंधळे, एएसपी पप्पू कादरी, पीएसआय दिपक ढोमने यांनी योग्य पद्धतीने केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.
भाग ५
पुढील अंकात
वाचा रोखठोक सार्वभौम
क्राईम रिपोर्टर
सागर शिंदे
मराठी नव वर्षाच्या मुहुर्तावर आम्ही रोखठोक सार्वभौम हे सायंदैनिक वृत्तपत्र आपल्या भेटीस घेऊन येत आहोते. बुधवार दि.२५ मार्च रोजी. अकोले कार्यालयाचा उद्धाटन समारंभ आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय राहिल .!============