...अखेर खानापूर बलात्कार व खून प्रकरणातील गर्दनीच्या दुसऱ्या मुख्य आरोपीस ठोकल्या बेड्या


अकोले (प्रतिनिधी) :-
                  अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका आदिवासी मुलीवर बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य भुमिकेत असणारा गर्दनीचा तिसरा आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे.शिवराम खोडके (वय ४५, रा. गर्दनी) असे आरोपीचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार सोमनाथ गायकवाड ( वय ३७, रा.टाकळी) यास पोलिसांनी अटक केलेली आहे. या दोघांनी संगनमताने हे नराधमी कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे. असून याप्रकरणी पोलिसांनी बोकड व अन्य सबळ पुरावे हस्तगत केले आहेत. खोडके हा पीडित मुलीच्या परिसरात राहत असून तो गायकवाड याचा मित्र आहे. आज अकोले पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून या गुन्ह्यातील योग्य तपासामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
   
  याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले पोलिसांनी प्रथमत: फोडसे या संशयीतास ताब्यात घेतले होते. त्यास अटक केली असता त्याच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही. त्याच्याकडून बहुतांशी गोष्टी निव्वळ संदिग्ध वाटत होत्या. त्यामुळे, पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला. दरम्यान पोलिसांना बहुतांशी सोमनाथ गाडकवाड यांच्यावर संशय होता. मात्र, त्याला पुराव्यांची पुष्टी नव्हती. एक संशयीत ताब्यात घेऊनही गाडकवाड हा फरार असल्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. तो अकोले परिसरात आठ दिवस अंडरग्राऊंड राहिला त्यामुळे त्याच्यावरील संशय चांगलाच बळावला होता. अखेर पोलिसांनी गायकवाडला बेड्या ठेकल्यानंतर तो पोपटासारखा बोलता झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच काय, हा गुन्हा करताना आपला साथिदार कोण होता याची देखील माहिती दिली. त्यामुळे, गेली आठवडाभरापासून आकोले पोलीस खोडकेच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांनी त्यास बेड्या ठेकल्या आहेत. शिवरामला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी सांगितलेला घटनाक्रम मिळताजुळता असल्याचे दिसते आहे.
       दरम्यान, उद्या या आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक काळे मॅडम, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे, पोलीस निरीक्षक दिपक ढोमने, कैलास शिपनकर, पो.कॉ. गुडवाल, वाजीद ईनामदार, आनंद मैड आदी पथकाने ही कारवाई केली.

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय नियमित करा. दुर्लक्ष करु नका. तहसिलने दिलेले आदेश वेळोवेळी पाळा.

वाचा पुढील लेख
अकोल्यात आरोग्याट विभागाचा भोंगळा कारभार! शेवटी तो अकोल्याचा दुबई प्रवासी वैतागून गेला. 

 भाग ७ क्रमश:
सागर शिंदे
क्राईम स्पेशल
 ============

       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)