बोकड्या चोरताना नियत फिरली.! खानापूर बलात्कार व खून प्रकरणाला वेगळे वळण, कुख्यात गुंड सोमनाथ गायकवाडला अटक!
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका आदिवासी मुलीवर बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेला वेगळे वळण मिळाले असून पीडितेची निघृणपणे हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार सोमनाथ गायकवाड ( वय ३७, रा.टाकळी) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी पोलिसांनी सबळ पुरावे हस्तगत केले आहे. गायकवाड याचा एक मित्र या घटनेत सहभागी असल्याचा संशय असून त्याचा शोध अद्याप सुरु आहे. दरम्यान यापुर्वी अटक केलेल्या फोडसे याचा या घटनेत काय संबंध आहे. याची चाचपणी सद्या सुरु असून लवकरच या गुन्ह्यातील सखोल माहिती समोर येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले पोलिसांनी यापुर्वी दत्ता फोडसे यास संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. त्यास अटक केली असता न्यायालयाने पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. यात बहुतांशी गोष्टी निव्वळ संदिग्ध वाटत होत्या. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित यांनी पुढील तपास सुरु ठेवला. दरम्यान पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून एक विशेष पथक नेमले होते. काहीही झाले तरी या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा व पीडितेस न्याय मिळून योग्य आरोपी अटक व्हावेत अशा सुचना पाटील यांनी दिल्या होेत्या. त्यानंतर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी गेली आठ दिवस अकोल्यात आपला डेरा दाखल केला. गर्दनी, खानापूर, टाकळी, ढोकरी, म्हाळादेवी, निळवंडे अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपली टिम कामाला लावली. कादरी हे पुर्वी राजूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यामुळे, त्यांना सोमनाथ गायकवाड याचे सर्व कारनामे माहित होते. कारण, गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी बलात्काराचा गुन्हा आहे. त्याने देवठाण परिसरातील एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यानच्या काळात त्यास पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. गायकवाड हा या परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून असले कृत्य करण्याचे धाडस तोच करु शकतो. याची खात्री कादरी यांना होती. त्यामुळे, त्यांनी गायकवाडचा पिछा सोडला नाही. त्यांच्या टिमने गेली आठ दिवस त्याचा मागोवा घेत नदी, नाले, स्मशानभुमी, वाडी, वस्ती, दारुचे गुट्टे अशा अनेक ठिकाणी शोध घेतला. तर दुसऱ्या टिमने त्याच्या विरोधातील पुरावे जमा करण्याचे काम केले. एकीकडे एक गुन्हेगार म्हणून फोडसे यास ताब्यात घेतले होते. त्यामुळे, हा गुन्हा येथेच संपला असे वाटत असतांना एक गोपनिय टिम मुख्य आरोपीच्या मागावर होती. त्यामुळे, अकोलेकरांचे लक्ष विचलित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
कसा केला गुन्हा.!

दरम्यान या प्रकरणात पीएसआय ढोमने, गुडवाल, लांडे, गणेश शिंदे, मैड, शिपनकर यांसारख्या कर्माचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करुन पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. या घटनेत अणखी खळबळजनक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यातरी पोलिसांनी संयमाची भुमिका घेत तपास योग्य मार्गावर आणला आहे. त्यामुळे, अकोलेकरांनी सागर पाटील, रोशन पंडित व एपीआय पप्पू कादरी यांचे आभार मानले आहे. आज गायकवाड यास न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यास पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुन्ह्याचा सविस्तर उलगडा होईल.
क्राईम रिपोर्टर
सागर शिंदे

आरोपी सोमनाथ गायकवाड हा टाकळी, ढोकरी, गर्दनी अशा अनेक ठिकाणी चोऱ्या करण्याचे काम करतो. एकीकडे छोट्या-छोट्या चोऱ्या असल्याने लोक दुर्लक्ष करतात व गुन्हे दाखल करत नाहीत. तर, दुसरीकडे या परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे, त्याचे नाव घेण्याची हिंमत देखील कोणी करत नाही. त्यामुळे, गायकवाड राजरोस दिवसा ढवळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य करतो अशी पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे, त्या दिवशी तो खानापूर परिसरात एका मित्रासोबत गेला होता. दरम्यान त्याला बोकड्या चोरायचा होता, त्यामुळे त्याने तसा प्रयत्न केला. मात्र, दरम्यानच्या काळात त्याची नजर फिरली आणि पीडित मुलगी या नराधमाची शिकार झाली. अर्थात यामागे काही अधिकचा इतिहास दडलेला आहे. मात्र, वासनेपोटी निरापराध मुलीचा बळी यांनी घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान या प्रकरणात पीएसआय ढोमने, गुडवाल, लांडे, गणेश शिंदे, मैड, शिपनकर यांसारख्या कर्माचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करुन पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. या घटनेत अणखी खळबळजनक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यातरी पोलिसांनी संयमाची भुमिका घेत तपास योग्य मार्गावर आणला आहे. त्यामुळे, अकोलेकरांनी सागर पाटील, रोशन पंडित व एपीआय पप्पू कादरी यांचे आभार मानले आहे. आज गायकवाड यास न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यास पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुन्ह्याचा सविस्तर उलगडा होईल.
क्राईम रिपोर्टर
सागर शिंदे
============
मराठी नव वर्षाच्या मुहुर्तावर आम्ही रोखठोक सार्वभौम हे सायंदैनिक वृत्तपत्र आपल्या भेटीस घेऊन येत आहोते. बुधवार दि.२५ मार्च रोजी. अकोले कार्यालयाचा उद्धाटन समारंभ आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय राहिल .!