अखेर अकोल्यातील खानापूर बलात्कार प्रकरणी आरोपी जेरबंद; गुन्ह्याची कबुली


अकोले (प्रतिनिधी) :- 
                     अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टिमने जेरबंद केला आहे दत्ता भिमा पडसे (रा. खानापूर) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून उद्या पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी हा पीडित मुलीच्या घराच्या परिसरात कायम वास्तव्यास आहे. त्याला पीडित मुलीचा दिनक्रम माहित होता. ती स्वभावाने शांत असल्यामुळे तो नेहमी तिच्याशी लगट करीत असे. त्या दिवशी ही पीडित मुलगी रानात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता याने तिच्यावर पाळत ठेवली. दुपारी तीला एकटे पाहुन या नराधमाने तिच्या एकट्यापणाचा व शांत स्वभावाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तीने आरडाओरड करु नये म्हणून तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. अत्याचार झाल्यानंतर त्याने घटनास्थळाहु पळ काढला. या दरम्यान पीडित मुलगी वेदनांनी बेशुद्ध झाली असता तिचा गुद्मरुन मृत्यू झाला.
       ही घटना लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र काही काळानंतर त्या परिसरातील नागरिकांनी हे प्रेत अनोळखी आसल्याने गावकऱ्यांना सांगितले. दरम्यानच्या काळात पीडित मुलीची ओळख पटली आणि खानापूर व गर्दनी परिसरासह तालुक्यात एकच खळबळ ऊडाली. स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र दोन दिवस त्यांनी पथके तयार करुन काही संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी स्वत: लक्ष घालत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनाच्यासह पथकांना पाचारण केेले. त्यांच्या टिमने दोन दिवस या परिसरात साधे वेश धारण करुन काही स्थानिक तरुणांच्या मदतीने या तपासाला गती दिली.
     यावेळी दत्ता भिमा पडसे हा तरुण संशयीत मिळून आला. यावेळी पडसे यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळून आले असून त्याच्या अंगावर देखील काही व्रण आहेत. त्यामुळे, त्याच्या संशयीत हलचाली लक्षात घेता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घटनेची उकल केली आहे. या घटनेचा पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत
      ही कारवाई एसपी सागर पाटील, डिवायएसपी रोशन पंडीत, एलसीबी पीआय दिलीप पवार व आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देशमुख, पीएसआय इंगळे, हे.कॉ. सुनिल चव्हाण, सागर ससाणे, सातपुते, कोळेकर, शंकर चौधरी आदी पथकाने केली.

क्राईम रिपोर्टर
सागर शिंदे
8888782010

रोखठोक सार्वभौमहे सायंदैनिक वृत्तपत्र आम्ही आपल्या भेटीस घेऊन येत आहोते. रविवार दि.१५ मार्च रोजी. अकोले कार्यालयाचा उद्धाटन समारंभ आयोजित केला आहे. तरी आपण उपस्थित रहावे.!
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)