जामातीच्या संपर्कात आलेले आणखी 3 रुग्ण कोरोना बाधित.! संमगमनेरचे 15 नागरिक यांच्याच संपर्कात होते. अहवाल पेंडिंग
अहमदनगर (प्रतिनिधी):-
मुस्लिम धर्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणार्या 14 जणांनी जामखेडमध्ये जमात भरविली होती. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या सानिध्यात आलेल्या अणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात ही संख्या आठवर गेली असून अद्याप काही रिपोर्ट येणे बाकी आहे. यात संमगनेरच्या 15 जणांचा सामावेश आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील मुकुंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपुर्वी आशिया खंडातील आयवरी कोष्टी, इरान, टांझानिय व मुंबई आणि दिल्ली अशा विविध ठिकाणांहुन 14 जण आले होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या दोघांना कोरानाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आले होते. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या 49 जणांना आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. आज (दि.31) त्यापैकी 31 जणांचे अहवाल आले असून त्यापैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान या परदेशी नागरिकांच्या संपर्कात संगमनेर शहरातील 15 नागरिक आले होते. त्यांना काल (दि.30) प्रशासनाने ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांचे नमुना घेऊन ते पुण्याच्या लॅबमध्ये पाठविले असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. अद्याप संगमनेर तालुक्यात एकही कोरोना बाधित रुण नसून प्रशासनाने त्यासाठी चांगली खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. सद्या जामखेडमध्ये एकूण कोरोना बाधित पाच रूग्ण झाले असून बाकी नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर संगमनेरच्या 15 जणांचा रिपोर्ट काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.