"सर्वव्यापी" बाळासाहेब.!
![]() |
शांत, संयमी, नितळ व निर्मळ चेहरा.! |
ना. बाळासाहेब थोरात हे नाव "बोलबोल" करता देशाच्या राजकारणात "सुवर्णक्षरांनी" कोरले गेले आहे. अर्थात कोणीही माणूस सहज मोठा होत नाही. कारण, "टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला "देवपण" येत नाही" हे सर्वश्रुत आहे. आज बाळासाहेब थोरातांनी जे काही नाव कमविले, त्याला कोणाचेही पाठबळ नाही. वडिलांचा वारसा असला तरी त्यांनी तो निती नियमाने जोपासला आहे. सत्तेची लालसा आणि ईडीच्या धमक्यांचा कलंक त्यांनी माथी पडेल असे कोणतेही कृत्य केले नाही. म्हणून तर माजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, थोरात साहेब म्हणजे "धुतललेले पांढरेशुभ्र तांदुळ" त्यांच्यावर "आरोप" करुन "पांढऱ्या कपड्यावर, काळे डाग" पाडू नका. आता यापेक्षा त्यांच्या चांगुलपणाचे वेगळे "प्रमाण" काय असू शकते.? अर्थातच विरोधकांनी देखील गुण गैरवावे असे हे व्यक्तीमत्व होय.! ते नुसते काँग्रेसमध्ये राहिले नाही. तर, त्यांनी तो विचार अंगिकारला. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या वाक्याला वास्तवात आणले. नाहीतर, काल गावकुसाबाहेर असणारा दलित, वंजारी, मुस्लिम, माळी हा समाज आज सत्तेच्या खुर्चीवर स्थानापन्न आहे. म्हणून कोण्या एका जातचे म्हणून नव्हे.! तर, बाळासाहेब म्हणजे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व ठरले आहे.

देशात "सीएए" मुद्द्याहुन वाद "जातीच्या सावलीखाली" येऊन थांबला आहे. त्यामुळे, जनुकाय "पुरोगामी" आणि "प्रतिगामी" असाच वाद उभार राहिल्याचे दिसते आहे. पण, तरी राज्यातील जनतेने "हिंदुत्व" म्हणा की, "बदल" त्यामुळे भाजपलाच कौल दिला होता. तरी, त्रिशंकु सरकार उभे करताना सर्वात मोठा वाटा हा बाळासाहेब थोरात यांचा आहे. हे नाकारुन चालणार नाही. कारण, शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या नशेत होती, भाजप सेना आपली हिंदुत्वाची गाठ सोडून जाणार नाही याची खात्री होती. तर, एकहाती वजिर असणारे पवार यांचे कोण वाली ? सत्तेसाठी ते कोठेही गेले असते तरी त्यांच्या टिकेला लोकं खेळी म्हटले असते. अशा नाजूक परिस्थितीत मुस्लिम समाजाचे मन धरणे, दिल्लीच्या नेतृत्वाला समजून सांगणे, महाराष्ट्रात काँग्रेसचे संपलेले वलय पुन्हा उभे करणे, सत्तेचे स्वप्न देखील पाहण्याचे वातावरण नसताना अचानक काँग्रेसला "अच्छे दिन" खेचून आणणारे व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत. त्यांनी जर हे सरकार स्थापन होण्यापुर्वी गांधी कुटुंबाला थोडी जरी पिन मारली असती. तर आज राज्यात वेगळे चित्र असते. २८८ जागेत सर्व पदे कसे वाटायचे हे सिद्ध करुन झाल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली. यात फार मोठा वाटा साहेबांचा आहे. त्यांनी जसे महाराष्ट्रात राजकारण केले तसेच स्वत:च्या तालुक्यात देखील "सर्वसमावेशक" धोरण राबविले.!
फार नाही.! पण, थोडक्यात उदा. सांगता येतील की, संगमनेर तालुक्यात १२ बलुतेदार व १८ पगड जाती एक करुन त्यांच्या वाड्या वस्तींचा विकास केला. इतकेच काय.! फुले, शाहु, आंबेडकरांचे नाव मुखी घेताना त्यांनी त्यांची विचार देखील अंगिकारले.! म्हणून तर, येथील दलित व अल्पसंख्यांक समाज "शासनकर्ती" जमात होऊ शकला. कारण, तुम्हाला आठवत असेल.! १० वर्षापुर्वी वंजारी समाजाचे नेते गणपत सांगळे यांनी ओपनच्या जागेहुन तिकीट दिले व निवडून आणत त्यांना झेडपीवर पाठविले. तर आज मातंग समाजाचे नेते जगनराव अल्हाट डायरेक्टर आहेत. दरम्यानच्या काळात बी.आर कदम, जी.व्ही रुपवते, भास्कर बागूल, सुधाकर रोहम अशा अनेकांना कारखान्यावर संधी दिली. तर१ दुधसंघात संघात माणिकराव यादव तीन वेळा संधी तर एकदा पं.समितीत सदस्य केले. शेतकी संघात श्री वाघमारे व मार्केट कमिटीवर आत्माराम जगताप, बाळासाहेब गाडकवाड यांना संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुनिता अभंग यांच्यासह मुस्लिम समुदायास अनेकदा संधी देत त्यांनी प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

तुम्हाला कल्पना असेल. की, अन्य ठिकाणी मागासवर्गीयांचा यत्किंचितही विचार केला जात नाही. अकोले सारख्या ठिकाणी चंद्रकांत सरोदे आणि अन्य अगदी बोटावर मोजण्याइतके लोकं सोडले, तर दलित व अल्पसंख्यांकांच्या पदरी नेहमी उपेक्षाच आली आहे. हेच चित्र राज्यभर आहे. पण, संगमनेर त्यास अपवाद असावे असे मला वाटते. कारण, तुम्हीच विचार करा.! बाजीराव पाटील खेमनर हे धनगर समाजाचे असून त्यांना जिल्हाबँक चेअरमन, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य निवड करण्यासाठी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्षपद देखील त्यांनी दिले होते, गणपतराव सांगळे हे वंजारी समाजाचे असूनही जिल्हा परिषदेचे सभापती व त्यांना संगमनेर सहकारी कारखान्याचे संचालक केले होते. पुढे माळी समाजाच्या सुनीता अभंग यांना पंचायत समिती सभापती केले, बाळासाहेब गायकवाड हे दलित असतांना त्यांना पंचायत समिती उपसभापती केले, सुनंदाताई जोर्वेकर या भगिणी कुंभार समाजाच्या असून त्यांना सद्या पंचायत समितीचे सभापती केले. वसीम शेख या मुस्लिम बंधुस संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष केले, दिलीपशेठ पुंड यांच्या रुपाने माळी समाजाने नगरपालिकेत वारंवार प्रतिनिधीत्व दिले. इतकेच काय.। वंचित घटक असणाऱ्या रामोशी सनाजाचे रमेश गपले यांना युवक काँग्रेस जिल्हा कमिटीवर घतले ! या आणि अशा अनेक बाबा पाहिल्या. तर, सर्वव्यापी बाळासाहेब.! हेच नाव अग्रभागी येते.

थोरात साहेबांनी डॉ. बाबासाहेबांचे संविधान व छत्रपती शिवरायांचे स्वराज्य या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्या वडिलांनी जोपासलेला पुरोगामी विचारांचा वारसा आजवर जोपासला आहे. अर्थात हे बाळकडू त्यांनी अगदी उराशी जोपासले. एक जोर्वेकर सांगतात की, जेव्हा १९९३ साली राज्यात आंबेडकरी चळवळीचे वारे वाहत होते. तेव्हा आम्ही गावागावात डॉ. बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्याचा मानस आखला होता. तेव्हा जोर्वे गावात आम्ही तरुणांनी सिमेंटचा पुतळा बसविण्याचे प्रयोजन केले होते. पण, त्यास साहेबांनी विरोध केला व थोट ब्राँन्झचा पुतळा बसवून दलितांच्या मनात घर केले. हे उदार अंत:करण येथेच थांबले नाही! तर, पुढे १९९४ साली औरंगाबाद विद्यापीठ नामांतरणाचा लढा ऊभा पाहिला होता. त्यावेळी, संगमनेरमध्ये निळ्या फिती धालून बाबासाहेबांचा नारा देत पोलीस ठाण्यात जाणारे ते पहिले आमदार होते. त्यावेळी त्यांना ताब्यत घेण्यात आले होते. यापेक्षा त्यांचे वेगळे वगळेपण रेखाटावे.! त्याच्यासारखा सर्वव्यापी कोणी होणे नाही.!

बाकी तालुक्यांच्या तुलनात्मक दृष्ट्या एक गोष्ट लक्षात येईल. की, जितका संगमनेरचा विकास झाला. तितका नगर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा झाला नाही. एव्हाना, त्याचा पसारा इतका झाला. की, संगमनेर जिल्हा असे प्रशस्त रुप त्याने धारन केले आहे. थोरात कुटुंबाने राजकारण केले. पण, ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण हा शिवसेनेचा फॉर्म्युला असला. तरी, त्याचे वास्तव बाळासाहेबांनी आमलात आणले आहे. आजही मराठा समाजास त्यांनी कोणतीच कमतरा भासू दिली नाही. मोठमोठी पदे व सत्तेतील वाटा. यात त्यांनी नेहमी ताळमेळ बांधला. हे करत असताना मागास-वर्ग प्रवाहाच्या बाहेर जायला नको. त्यासाठी शिवरायांचा वचन नामा अंगिकारला. "सर्वांस पोटास लावणे आहे" हाच अजेंडा त्यांनी संगमनेरात रुजू केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व रिपाई यांनी अगदी राज्यात कधी बौद्ध, वंजारी, धनगर, मुस्लिम या समुदायास स्थानिक स्वराज्य संस्थांवर संधी दिलेली नाही. तितकी बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तालुका हा कम्युनिष्ट व पुरोगामी चळवळीच्या विचारांचा रहावा, येथे साम, दाम, दंड, भेद या तत्वांऐवजी समता, स्वतंत्र्य, न्याय, बंधुता हे पैलु रुजावेत हित स्व. भाऊसाहेब थोरात यांची इच्छा होती. याच संविधानाची दिंडी बाळासाहेब थोरात यांनी सुरु ठेवली आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या तालुक्यास त्यांनी संपन्न केले. शेतकऱ्यांची मुले उभी राहिली पाहिजे. यासाठी सर्वगुणसंपन्न शहर प्रस्थापित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या या व्यक्तीमत्वाला "रोखठोक सार्वभौमकडून" अभिमानाने "सलाम".
प्रिय वाचक मित्रांनो.!
"रोखठोक सार्वभौम" हे चार महिन्यापुर्वीचे "पोर्टल" आपल्या लोकप्रियतेमुळे १७ लाख १० हजार "व्हिवर्स" पर्यंत जाऊन पोहचले आहे. आता आपण उभ्या केलेल्या या रोपट्याचे रुपांतर "वटवृक्षात" होऊ पाहत आहे. कारण, येणाऱ्या काळात "रोखठोक सार्वभौम" हे "सायंदैनिक" अकोले व संगमनेरकरांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. आपले प्रेम आमच्यावर कायम राहो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻
- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
8308139547
8308139547