संगमनेरच्या सराफावर "गोळीबार" करणाऱ्या दरोडेखारांच्या "मुसक्या "आवळल्या.! घुलेवाडीतील एकास अटक !

     
 संगमनेर (प्रतिनिधी) :-
                         संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात सराफांवर गोळीबार करत लाखो रुपयांचा ऐवज लुटून एकास ठार करणाऱ्या आरोपींस नगरच्या एलसीबीने अटक केली आहे. गणेश गायकवाड (रा. घुलेवाडी, संगमनेर), दिपक कोळेकर, भरत पाटील असे या व्यक्तींची नावे आहेत. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन खाकीचा दणका दाखविली असता ते पोपटासारखे बोलते झाले व घटनेची हकीकत सांगितली. या प्रकरणात त्यांने अधिकची धक्कादायक माहिती सांगितली असून सहआरोपी दिपक विनायक कोळेकर (रा. सिडको, नाशिक), भरत विष्णु पाटील (रा. पंचवटी, नाशिक), निलेश (संपुर्ण नाव माहित नाही), समाधान कुंडलिक गोडसे (रा. पुणे), अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलवाडी, संगमनेर) यांनी मिळून सराफास लुटले. तर संगनमताने (३४ प्रमाणे) खून केल्याची माहिती त्याने दिली आहे.
एलसीबी पोलीस अन्य आरोपींच्या मागावर आहेत. हे आरोपी स्थानिक असले तरी, एक साथिदार शेजारील परिसर व अन्य बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यात सराफाच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वरावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा मृत्यु झाला होता. तर, सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर अवघ्या चार दिवसात पोलीसांनी या घटनेचा छडा लावला आहे. त्यामुळे, एलसीबी पीआय दिलीप पवार व टिमने केलेल्या कामगिरीचे अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
             
              याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.५) सायंकाळी साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दुकान बंद करुन घराकडे चालले होते. संगमनेरच्या घुलेवाडी पोलीस ठाण्याच्या अगदी हकेच्या अंतरावर गेले असता त्यांना एक कार आडवी झाली. त्यात गणेश गायकवाड यांच्यासह अन्य चौघे बसलेले होते. त्यातील तिघांनी गाडीच्या खाली उतरुन चिंतामणी यांच्या काचेवर वार केले होते. गाडीच्या काचा फुटल्यानंतर ते घाबरले व त्यांनी सराफास दमदाटी सुरु केली होती. दरम्यान गोळीबार व गाडीच्या फोडलेल्या काचेमुळे रस्त्यावर फोर मोठा आवाज झाला. सराफ व लुटारु यांच्यात चालेल्या झटापटीमुळे अविनाश शर्मा सराफाच्या जवळ आला असता आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली. गोळी मांडीला लागली मात्र, अंतर कमी असल्यामुळे गोळीचा वेग प्रचंड होता. ती थेट वर नाजूक भागापर्यंत गेली. परिणामी त्याचा मृत्यु झाला. दरम्यान लुटारुंनी सराफाकडील चांदीची पिशवी हिसकडून ते नाशिकच्या दिशेने पळून गेले होते.
         हा तपास करत असताना स्थानिक पोलीस व एलसीबी यांनी प्रचंड मेहनत घेतली. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ यंत्रणा कार्यन्वित केली. त्यामुळे, गाडीची ओळख पटण्यात त्याचा तर्क लावण्यात पोलीसांना यश आले होते. तर, दुसरीकडे पोलीसांना आरोपींचा छडा लागला होता. मात्र, सर्व पुराव्यसह आरोपी मिळावेत म्हणून स्थानिक पोलीसांनी थबकती भुमीका घेतली. इतकेच काय ! तीन संशयीत म्हणून त्याची चौकशी केली. मात्र, पोलीसांना चकवा देणारे अखेर पोलीसांच्या ताब्यात सापडले व एलसीबीने त्यांना बोलते केले. आता या संशयीतांकडून माहिती घेत पोलीसांनी पुढील सुत्र हलविले असून लवकरच अन्य आरोपींना जेरबंद करण्यात येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 प्रिय वाचक मित्रांनो.!
       "रोखठोक सार्वभौम" हे चार महिन्यापुर्वीचे "पोर्टल" आपल्या लोकप्रियतेमुळे १७ लाख १० हजार "व्हिवर्स" पर्यंत जाऊन पोहचले आहे. आता आपण उभ्या केलेल्या या रोपट्याचे रुपांतर "वटवृक्षात" होऊ पाहत आहे. कारण, येणाऱ्या काळात "रोखठोक सार्वभौम" हे "सायंदैनिक" अकोले व संगमनेरकरांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. आपले प्रेम आमच्यावर कायम राहो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻
घारगाव, बोटा, धांदरफळ, संगमनेर, तळेगाव, साकूर, मंगळापूर, समनापूर, अकोले, देवठाण, समशेरपूर, राजूर, कोतूळ अशा अन्य ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे
     संपर्क करा
8308139547
८८८८७८२०१०
============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)

- सागर शिंदे

(क्राईम रिपोर्टर)