अखेर निवृत्ती महाराजांची साडेसाती संपली, पुराव्या आभावी कारवाई नाही.!

                     
अहमदनगर (प्रतिनिधी) :- 
                                  इंदूरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. ज्या माध्यमांनी महाराजांनी केलेल्या वक्तव्याची बातमी छापली होती. त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांनी पुरावा दिल्यास त्या पुराव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्य समितीचे (PCPNDT) जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनामध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. तसेच मूल जन्माबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असेही अंनिस व देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भूमता बिग्रेड यानी इंदूरीकर महाराजांवर पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
       त्या अनुषंगाने महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर अहमदनगर जिल्हा आरोग्य समिती (PCPNDT) कडून इंदूरीकर महाराजांना कारणे देखवा नोटीस बजावली होती. त्याला सात दिवसांचा आवधी दिला होता. त्या नोटिशीला उत्तर देताना महाराज म्हणाले. की, मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यांमध्ये एकही कीर्तन केलेच नाही. त्यामुळे, माझ्या नावाखाली हा कोणीतरी खोडसाळपणा केला आहे. असा खुलासा इंदूरीकर महाराजांनी सादर केला आहे.
       दरम्यान खुलाशासाठी इंदूरीकर महाराज यांच्याबरोबर ज्या माध्यमांनी ही बातमी छापली होती, त्यांना देखील आम्ही नोटिशी बजावल्या आहेत. जर त्या माध्यमांनी आम्हाला त्या वक्तव्याचे पुरावे आणून दिले तर आम्ही त्या पुराव्यांची शहानिशा करुन पुढील कारवाई करु. परंतु, इंदूरीकर महाराजांनी दिलेल्या खुलाशानुसार आणि कोणत्याही पुराव्याअभावी आम्ही महाराजांवर सध्यातरी कारवाई करू शकत नाही. अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे.
             दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी सावध पवित्रा घेत विरोधकांची चांगलीच ठेऊन मारली आहे. आता ज्या युट्युब चॅनलवर निवृत्ती महाराजांचा व्हिडिओ दाखविण्यात आला होता. तो संबंधित व्यक्तीने डिलीट केला आहे. जरी तो कोणी डाऊनोलोड केला असेल. त्यांच्याकडे तो उपलब्ध राहिल. पण, तो आवाज, व्हिडिओ, किर्तन त्यांचेच आहे का ? हे फॉरेन्सिक लॅबमधून तपासावे लागतील. ते करण्यासाठी शासन पुढाकार घेऊ शकत नाही. जर कोणी संबंधित लिंक जपून ठेवली असेल. तरी तो डिलीट केल्यामुळे, तेथे ब्लँक साईड दिसून येईल. त्यामुळे, वास्तव काय ! हे शोधण्यासाठी एक नव्याने संशोधन समिती नेमावी लागेल. ती तपास यंत्रणा विरोधकांना किती जुमानेल. हे देखील पाहणे महत्वाचे राहिल. मात्र, तुर्तास ही सर्व पुढील उठाठेव असून सद्या तरी महाराजांवर कारवाई करता येणार नाही. हेच प्रखर सत्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, निवृत्ती महाराज खुलाशाअंती निश्चिंत झाले असून त्यांच्यामागे लागलेली साडेसती टळल्याचे बोलले जात आहे.

- सागर शिंदे
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)