..तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निवडीनंतर, अकोल्याच्या भाजपत मेघा भरती होईल.!

              
अकोले (प्रतिनिधी) :-
                      विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला "अनाकलनिय यश" मिळाले आणि तालुक्यात घड्याळाची भलतीच "घोडदौड" सुरु झाली. एक "प्रखर" आणि "वास्तव" सांगायचे ठरले. तर, घड्याळाचे काटे "सम दिशेने" फिरण्याची अपेक्षा असतांना ते "विषम दिशेने" भिरभिरु लागल्याचे पहायला मिळू लागले आहे. कारण, "आमदारांच्या स्वभावावर होणारी टिप्पण्णी" आणि "तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी" यामुळे, तालुक्यात फार उलटपालट चर्चा सुरु आहे. एकतर अगदी काल-परवा डॉक्टरांनी अशोक भांगरे यांच्या कार्यकर्त्यास दिलेला "ढोशा" आणि "अपशब्द" हा सद्या चर्चेचा विषय आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष कोण होणार.? हे राजकीय वातावरण वादाच्या भोवऱ्यात सापडून चांगलेच गरम झाले आहे. याच कारणाने राष्ट्रवादी अस्वस्थ असून काल "कोमजलेल्या कमळाला" हे वातावरण अगदी "पोषक" ठरताना दिसत आहे. त्यामुळे, "सत्तेपुढे शहानपण" न दाखविता, जाणकार नेत्यांनी थोडी "समझदारी" घेऊन "संयमाने" वागले तर ठिक.! अन्यथा "एक विट ढासाळली तर भल्याभल्या एकसंघाला उतरती कळा" लागलेली आपण पाहिली आहे. त्यामुळे, येथे काय होईल.! हे नव्याने सांगायला नको.!
             आमदारकी होऊन आता अर्धे वर्षे होत आले. मनसे, काँग्रेस, भाजपमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. पण, राष्ट्रवादीला काही पदाधिकारी येईना. पिचड साहेबांच्या एका निर्णयामुळे, राष्ट्रवादीतील छोट्या-बड्यांना फार मोठी संधी मिळाली. अर्थात आख्खी राष्ट्रवादी खाली झाली. पण, दुर्दैव असे की, समोर दिसतय.! पण खाता येईना अशीच काहीशी गत कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यासाठी तालुकाध्यक्ष नेमणे गरजेचे असले. तर, ते पद नेमके द्यायचे कोणाला ? हा सर्वात मोठा प्रश्न वरिष्टांना पडला आहे. मंत्रीपदांची वाटप करतांना राष्ट्रवादीने जसे "जात" व "विभाग" यांचा विचार केला. अगदी तसाच अकोले तालुक्यातील पदांची विभागणी करतांना समतोल राखणे गरजेचे ठरणार आहे. खरंतर, तालुकाध्यक्ष पदासाठी (मराठा) बहुजन चेहरा पुढे काढला पाहिजे. असे प्रत्येकाला वाटते. तर, तसेही आदिवासी समाजाचा आमदार आहे. त्यामुळे, तेथे कोणाची घुसपेठ होणार नाही. हे संविधानाची देण आहे. परंतु, या मतदारसंघात मराठा व अन्यत्र जाती देखील असून त्यांच्या हाती प्रतिनिधीत्व दिले. तरच हे संघटन टिकू शकते. अन्यथा अकोल्यात पुन्हा भाजपत "मेघाभरती" निघू शकते. कारण, आज नकळत राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण निर्माण होत चालले आहे. 
         काल-परवा राजुरला काही मुलाखती झाल्या. त्यावेळी, इतकी प्रचंड नाराजी उफाळून आलेली होती. की, चक्क अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असणाऱ्यांनीच एकमेकांवर तोंड टाखाटाखी केली. हा प्रकार इथेच थांबला नाही. तर, कुरघोडीच्या राजकारणामुळे, एक कट्टर राष्ट्रवादी इच्छुकाने मुलाखत न देताच काढता पाय घेऊ पाहिला होता. पण, त्यांची मनधरणी झाली आणि वादावर पडदा पडला. पण, एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. की, प्रथमत: ५ ते ६ उमेदवार मुलाखती देणार होते. मग अचानक हा २५ जणांचा लोंढा आला कोठून.? हे न ऊमजणारे कोडे आहे. जरी हौशा नवशा गौंशांनी इच्छा व्यक्त केली. तर याचा अर्थ असा. की, कोणालाही एका व्यक्तीचे नेतृत्व मान्य नाही. खरंतर या प्रश्नावर एक जालिम उपाय होता. की, भांगरे कुटुंबात हे पद द्यायचे. पण, बहुजन वर्गातून त्याला देखील काहीसा विरोध होताना दिसून आला. सगळी मोठी पदे वरतीच विभागली जात असतील तर आम्ही काय करायचे ? हा स्पष्ट सवाल पुढे काढला गेला. पण, या गोष्टीसाठी भांगरे कुटुंब राजी होईल की नाही.! यावर साशंकता आहे. कारण, उद्या यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची संधी मिळू शकते. तेव्हा बहुजन समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिल. पण, या दरम्यान त्यांनी तालुक्याच्या पदापेक्षा राष्ट्रवादीच्या संघटनाकडे लक्ष दिले. तर, ते त्यांच्या भविष्यासाठी फार पोषक ठरु शकते. असे जाणकारांना वाटते आहे. या विषयावर एक स्वतंत्र मंथन केले तेच योग्य ठरेल. मात्र, तुर्तास अनेकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी दंड थोपटले असून कोणी बारामती तर कोणी पुणे, कोणी कोपरगाव तर कोणी मुंबईहुन सेटिंग लावू पाहत आहे.
           दरम्यान या पदासाठी आघाडीची तीन नावे वरिष्ठांकडे गेल्याचे समजले आहे. आता दोघांचे भांडण अन् तिसऱ्या लाभ असे झाले नाही म्हणजे बरे.! आता काहीही झाले तरी नाराजी हे जगजाहिर आहे. पण, पिचड साहेबांनी आजवर जो "हातखंडा" वापरला तो राष्ट्रवादीला वापरता येईना. त्यांनी बहुजन समाजातील अनेक नेते पुढे आणले. त्यांना राजकारणात स्थैैर्य दिले. येथे मात्र, जे हवे ते आम्हालाच. ही भुमिका घेतली तर येणारा काळ अवघड असणार आहे. हिच अतर्गत चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहे.!

- सागर शिंदे
८८८८७८२०१०
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)