"थोरात साहेबांच्या सहकार "तटबंदीत", तडजोडीअंती विखेंचा तज्ञ संचालक!"

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                          "ऊसाशिवाय साखरेला आणि साखरे शिवाय राजकारणाला गोडवा येत नाही". या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्याच्या प्रत्येक  निवडणुकांमध्ये प्रकर्षाने पहायला मिळत आहे. आजकाल एक दोन नव्हे तर १०० हुन अधिक "साखर सम्राट" विधानसभेच्या रणांगणात आपले नशीब आजमावत असतात. त्यांची ही राजकीय आखाड्यातील "साखर पेरणी" फळाला येणार का ? हे पाहणे नेहमी उत्सुकतेचे ठरले आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारीतुन "राजकारण" अन राजकारणातुन "सत्ता" हे एक समिकरणच होऊन बसले आहे. हे वर्तुळ पुर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या "साखर सम्राटांना" सर्वच पक्षांनी "पायघड्या" अंथरल्या आहेत. त्यामुळे, सहकार चळवळीचा आत्मा असलेली साखर कारखानदारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रबिंदु ठरू पाहत आहे. ज्याची सहकारावर पकड तो तेथील बादशाह हेच गणित निश्चित झाले आहे. असेच एक राज्यात गाजलेले दोन साखर सम्राटांचे युद्ध म्हणजे विखे व थोरात साहेब. यांच्या साखरयुद्धाची प्रचिती काल पहायला मिळाली. कारण, काल बहुचर्चित संगमनेर मधील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती.  विखे गटाने प्रचंड यातायात करुनही ना. थोरतांचे नेहमीप्रमाणे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
           
            स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी सन-१९६६ साली सहकारी साखर कारखाण्याची स्थापना केली. तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांच्या विरोधात तोंडी लावण्यापुरता अवघा एक संचालक देखील निवडून आलेला नव्हता. इतकेच काय.! यांचे दुर्दैव असे की, सहकारातील अनेक निवडणुकींमध्ये संपूर्ण पॅनल सोडा पण, साधा एकास-एक तुल्यबळ उमेदवार देखील देण्यास विरोधकांना उमेदवार मिळालेला नाही. या अपयशाचे सांत्वन करताना ते पोचारा फिरवितात की, थोरतांच्या गटाला हरवणे यात आपल्याला काही अप्रूप नाही. असाच "बुळगा विरोध" संगमनेरमधील विरोधकांनकडुन होताना दिसत आलेला आहे. हे फ्लेक्झिबल व तात्विक विरोधक तहान लागली की विहीर खोंदतात. अशी टिका त्यांच्यावर होत आहे.  निवडणूक तोंडावर येताच बैठका घेतात, मोर्चे बांधणी करतात, हरवण्याची भाषा करतात, निव्वळ वलग्ना करुन फडफड करतात. त्यामुळे  वास्तव सांगायचे ठरले. तर, संगमनेर मधील विरोधकांची अवस्था म्हणजे, "दोनहाना, पण पुढारी म्हणा" अशीच झाली आहे.
         
 राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे सलग आठवेळा आमदार म्हणुन निवडून आले आहे. याचे रहस्य जर उलगडले तर आपल्याला लक्षात येईल की, स्व.भाऊसाहेबजी थोरात यांनी संगमनेरला घालुन दिलेली सहकाराची "तटबंदी" व यावर थोरातांचे नेहमी मताधिक्य वाढवते राहिले आहे. भाऊसाहेब थोरात हे दूरदृष्टी असणारे सेनानी होते. त्यांचा भविष्याचा राजकारणाचा वेध घेत सहकारी संस्थाची निर्मिती केली व पुढे हे जाळे प्रत्येक गावा-गावात पसरले. हा सहकारच ना. बाळासाहेब थोरातांचा परिवार झाला व परिवारावर येणारे संकट सर्व जण मिळून नेटाने परतावून लावतात. विरोधकांनी एकुण ११ उमेदवारी अर्ज भरले होते. तर अर्ज छाननीत ३ अर्ज बाद झाले आणि ६ जणांनी माघार घेतली. अर्जमाघार घेण्याचे दिवशी थोरात समर्थक व विरोधकांमध्ये एका हॉस्पिटलमध्ये बैठक झाली.
                तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, तसेच अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी विरोधी गटाचे नेते अॅड.भास्करराव दिघे, भाजपाचे तालुकाअध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शरद नाना थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव‍ विखे पाटील कृषी परीषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, रहिमपूर सोसायटीचे चेअरमन गणपतराव शिंदे यांचेशी चर्चा करुन अर्ज मागे घेण्याची विनंती केली. झालेल्या चर्चेनंतर सौ. शिंदे यांना संचालक मंडळात तज्ज्ञ संचालक मंडळात घेण्याचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ या चर्चेत जाहीर केले. अशा पद्धतीने कारखान्याची निवडणुक बिनविरोध पार पडली.

- सुशांत पावसे. 


 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)