का नको आहे आ. विखे व ना. थोरात साहेबांना संगमनेर जिल्हा.! समितीने.! आकड सोडा, साकडं घाला.!

संगमनेर :-
गेली ३५ वर्षे संगमनेर जिल्ह्याचा प्रश्न "प्रलंबित" आहे. त्यामुळे, अकोल्यासारख्या "आदिवासी दुर्गम" भागाच्या विकासावर "विपरित परिणाम" झाल्याचे दिसते आहे. जग बदलले पण हा तालुका "जैसे थे" राहिला. अर्थात शेजारी संगमनेरचा "सर्वांगीन विकास" झाला मात्र, अकोले तालुका "मुलभूत" प्रश्नांपासून "वंचित" राहिला. वास्तवत: पुर्वेकडून विखे पाटलांची "विकसित लोणी" व जगप्रसिद्ध "साईबाबा", उत्तरेकडून "एमआयडीसी उन्नत" सिन्नर, दक्षिनेकडून "विद्येचे माहेरघर" पुणे व मावळत्या पश्चिम दिशेला निसर्गाने नटलेला परंतु "बेरोजगारी, अशिक्षित, दुर्लक्षीत" अकोले तालुका. त्यामुळे, संगमनेरच्या तीनही बाजूंनी प्रगती आहे. परंतु, अकोले हा अपवाद राहिला आहे. त्यामुळे, त्याचा विकास करायचा असेल. तर, "संगमनेर जिल्हा" होणे. हे महत्वाचे झाले आहे. आतापर्यंत संगमनेरी बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, लोणीकर राधाकृष्ण विखे, अकोलेकर वैभव पिचड यांनी संगमनेर जिल्ह्यासाठी सपोर्ट केला आहे. मात्र, घोडे कोठे आडले आहे. याचे उत्तर केवळ "राजकीय हेव्यादाव्यात" गुंतल्याचे दिसून येते. थोरात साहेबांना "जिल्ह्याचा मोहरक्या" होऊन देणे विखें साहेबांसाठी कधीही परवडणारे नाही आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे संगमनेरात आयएस, आयपीएस सारखे अधिकारी आणून बसविणे, त्यांची "फुशारकी" आणि "दबंगिरी" सहन करणे. यापेक्षा प्रांत, तहसिल, डेप्युटी आणि पीआय हे नियमित दरबारात "मुजरा" करायला येतात. यापेक्षा अधिक काय हवे आहे.! तसेही साहेबांनी विखे साहेबांसारखे जिल्हा आणि राज्यभर "गटतट" तयार करुन "कुरघोडीचे राजकारण" उभे केले नाही. संगमनेर हिच त्यांची "जन्मभुमी" आणि "कर्मभूमी". त्यामुळे, हवे ते तालुक्यात मिळून जाते व राजकारणाला "आख्खे राज्य" पडले आहे. अशीच काहीसी मानसिकता त्यांची असल्याचे बोलले जाते. तर, अकोले जरी स्वतंत्र मतदारसंघ असला. तरी "पठार भागामुळे" थोरात साहेबांना "डावलून" आमदार होणे शक्य नाही. त्यामुळे, "हक्काचा ईमान" कोणी सोडेल का ? त्यामुळे, त्यांना "जिल्ह्याचा तुकडा" नको आणि संगमनेरच्या एकहाती "वर्चस्वावर गदा" नकोच. हीच मानसिकता पुढे येऊ लावली आहे. पण, एक वास्तव नाकारता येत नाही. की, "श्रीरामपूर" जिल्ह्यासाठी शासन "सकारात्मक" आहे. पण तरी संगमनेर देखील रास्त मागणी आहे. जर, हा जिल्हा झाला नाही तर ते सर्वस्वी अपयश थोरात साहेबांचे राहील असेच बोलले जात आहे. हे देखील तितकेच खरे आहे. त्यासाठी फार मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे.
पालघर पाठोपाठ आता उदगीर जिल्हा होऊ घातला आहे. मात्र, हे दोन्ही जिल्हे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच काळात उदयाला आले. पण, संगमनेरला काही मुहुर्त सापडेना. याचा अर्थ समजावा तरी काय ? याची एक बाजू पाहिली तर लक्षात येते की, वास्तवत: शासनाच्या दफ्तरात श्रीरामपूर जिल्ह्याची फाईल आहे. विखे पाटलांचा अग्रह संगमनेर कम श्रीरामपूर जास्त आहे. त्यामुळे, हा प्रलंबित प्रश्न बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आडून राहिला असावा. कारण, त्यांनी श्रीरामपूर पेक्षा संगमनेरचा अग्रह कायम ठेवल्याचे समजते आहे. पण, ते आपली भुमिका नेहमी गुलदस्त्यात ठेवताना दिसून येतात. आता यात दुर्दैव असे की, संगमनेर आणि कृती समन्वयक यांची भुमिका म्हणजे एकात एक नाही आणि बापात लेक नाही. कारण, ज्यांना संगमनेर जिल्हा व्हावा असे वाटते. ते हितचितक बाळासाहेबांना कमी पण, विखे पाटलांना जास्त महत्व देतात. जिल्ह्याचा प्रश्न महसुलमंत्र्यांकडे कमी पण माजी गृहनिर्माण मंत्र्यांकडे जास्त मांडताना दिसतात. त्यामुळे, "घरचा भेदी आणि लंका दहन" व्हायला वेळ लागत नाही. अर्थातच घरातलं भांडण शेजारी सोडवायला गेले. तर, ते वाढेल की मिटेल.! हे नव्याने सांगण्याची गरज काय ? असेच काहीेसे होऊन बसले आहे.
खरे पाहिले तर, संगमनेरकरांना जिल्हा हवा असे वाटत असेल. तर, त्यांनी जुन्या जाणत्या व्यक्तींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. १९७७ ते ८० पासून असोपा, कासट, मनियार यांच्यासह अनेकांनी ३१ दिवस साखळी उपोषण व सह्यांची मोहिम राबवून या चळवळीची पेरणी केली आहे. त्यांची समन्वय समिती आणि काही शिष्टमंडळांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. खरतर संगमनेर जिल्हा होणे हा एक क्रांतीकारक निर्णय आहे. तो पुर्णत्वाला जाण्यासाठी अनेकांनी योगदान देणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा १९२० पासून भाषावार प्रांतरचनेचा विचार सुरु झाला. त्यानंतर २१ नोव्हेंबर १९५६ पर्यंत तो सुरु असताना दरम्यानच्या काळात प्र.के आत्र्यांनी पत्रकार म्हणून सर्वात मोठी भुमिका पार पाडली होती. म्हणून तर संयुक्त महाराष्ट्र ऊभा राहिला. त्याप्रमाणे येथे वराट, तिवारी, हासे, घाडगे,आहेर, पानसरे, पावसे, नेहे अकोल्यातून गजे, वैद्य, टाकळकर, आवारी, सातपुते, रेनुकादास, खरबस यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच क्रांतीकारी व पुरोगामी चळवळीच्या वैचारिक व्यक्तींनी थोडे सक्रिय होणे आवश्यक आहे. जशी अकोले व संगमनेर येथे पाणी लढा, उसाचा प्रश्न, कामगार युनियन, विडी कामगार तसेच किसान सभेने अनेक चळवळी उभ्या केल्या. तसेच एकदा संगमनेर जिल्ह्यासाठी लढा उभा राहणे गरजेचे झाले आहे.
सद्या विद्यमान जिल्हा कृती समितीने चांगले नियोजन केले होते. ४६ दिवस उपोषण व पावनेदोन लाख स्वाक्षऱ्यांनी शासनाला साद घातली. पण, संगमनेरच्या बादशाहची मनधरणी करण्यात त्यांना अपयश आले. त्यांच्याकडे आम्ही का जावे, त्यांनी आमच्याकडे का येऊ नये ? त्यांना सकारात्मक कोण करणार ? त्यांना शरण कोण जाणार ? त्यांना काळजी नाही का ? अर्थात असे एक ना अनेक प्रश्न वारंवार एरणीवर येतात आणि प्रत्येकाचा "इगो" जागा होतो. पण, ते राज्याचे महसुलमंत्री आहेत, त्यांच्याकडे तो अधिकार आहे. जे करायचे ते त्यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे, स्थानिक राजकारण, वैयक्तीक हेवेदावे आणि थोडासा "मी" पणा प्रत्येकाने थोडावेळ बाजुला ठेवला. तर, जे संगमनेर जिल्हा कृती समितीच्या मस्टरवर सपोर्ट करणारी लेखी सही करतात. त्यांना विधानसभेतील प्रस्तावावर सही करायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे, सुसुत्रता, नम्रता, संयम, नियोजन व योग्य अहवाल हाच संगमनेरला जिल्ह्याचे रुप देऊ शकते. हे नाकारुन चालणार नाही. अन्यथा "मी" पणाने जसे भाजप सरकार गेले. तसे संगमनेर जिल्हा होण्याचे महतभाग्य निघून जाईल. हे जिल्हा हितचिंतकांनी विसरु नये.!

काय आहे संगमनेरमध्ये ?
वैचारिक चळवळीचा वारसा
स्व.भा.थो. साखर कारखाना
कृषी महाविद्यालय संगमनेर
१८३८-पहिली मराठी शाळा
१८६१- माध्यमिक विद्यालय
संगमनेर महाविद्यालय
सह्याद्री महाविद्यालय
सराफ महाविद्यालय
दंत वै. महाविद्यालय
सर्वात मोठी बाजारपेठ
आयएसओ प्रमा. पतसंस्था
२ वैद्याकीय महाविद्यालय
२ आयुर्वेदीक महाविद्यालय
२ अभियांत्रीकी महाविद्यालय
२ औषध निर्माण शास्र महा.
२५ नोव्हे १८५७ ची पालिका
१८७३ चे कॉटेज हॉस्पिटल
१९६९ ची बाजार समिती
१९७८ वैचारिक व्या.माला
मालपाणी उद्योग समुहं
म्हळुंगी व प्रवराेचे संगम
एसआर, नवले दुधसंघ
एमआयडीसी भुखंड
नाशिक-पुणे राज्यमहामार्ग
शिर्डी बाह्यवळण रस्ता
कोल्हार-घोटी महामार्ग
मेडीकल,कृषी,मॅनेजमेंट महा.
उर्दु शाळा व महाविद्यालय
१८ छोटो मोठे केटिवेअर
निळवंडे सं. पाणी पुरवठा
जवळच कृषी संशोधन केंद्र
जिल्हा सत्र न्यायालय
प्रांत कार्यालय संगमनेर
चार पोलीस ठाणे
पोलीस विभागीय कार्यालय
महा. जीवण प्राधिकरण कार्य.
शेती विकास महामंडळ कार्य.
विज वितरण कार्यालय
समृद्धी महामार्ग नजीक
शिर्डी देवस्थान नजीक
शिर्डी विमानतळ नजीक
अकोले मीनी कश्मिर नजीक
मुळा,भंडारदरा निळवंडे
भोजापूर, आढळा, पिंपळगाव
सर्वात मोठे बस स्थानक
तुलनेत सुसज्ज रस्ते
रेल्वेचे दोन मार्ग प्रस्तावित
शेकडे सुसज्ज दवाखाने
प्रशासकीय प्रशस्त ईमारती
यांच्यासह अन्य सेवा व सुविधा
रोखठोक सार्वभौमच्या वृत्तानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग आली नसली. तरी, रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे व शिवसेनेचे सतिश भांगरे यांनी तालुक्यात पुढाकार घेतला आहे. वाकचौरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले आहे. तर, भांगेर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करावा. त्यासाठी अभ्यासपुर्ण माहिती देऊन निवेदन दिले आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांना देखील हे निवेदन पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.
भाग चार क्रमश:
- सागर शिंदे
(अकोले)