साहेब.! क्या हुवा.? तुम्हारा वादा ! वो "कसम" वो "ईरादा".! तुम्हीतर नाही-नाही म्हणत "पालकमंत्री" झालात.!

अहमदनगर :-
                    काँग्रेसचे पचकाळू प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे डोहाळे मीडियाने लावून दिले होते. त्यावर "रोखठोक सार्वभौमने" विश्लेषण करीत त्यांना हे पद मिळणे अशक्य कसे आहे. यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी थोरात साहेबांनी आपण, नगरचे पालकमंत्री होणार नाही. मी मुळात स्थानिक असल्यामुळे जिल्ह्याचा पालकच आहे. सद्या अनेकजण नाराज असून अन्य व्यक्तींना संधी द्यायची आहे. त्यामुळे, मी नगरचेच काय कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले होते. पण, काल त्यांनी कोल्हापुरचे पालकमंत्रीपद स्विकारले आहे.  अर्थात त्यांना नगरच्या पालकमंत्रीपद अपेक्षा होती. मात्र, ते राष्ट्रवादीच्या कोठ्यात असल्यामुळे त्यावर पवार साहेब पाणी सोडणे अशक्य होते. हे वास्तव थोरात साहेबांना ज्ञात असले तरी देखील एक टोला त्यांनी लावत प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी उदात्त अंत:करणाच्या आडून वास्तवावर पांघरुन घातले व मला कुठलेच पालकमंत्रीपद नको. अशी घोषणा केली. परंतु, वाटाघाटीची वेळ आली आणि साहेब पुढे सरसावले. अचानक यादीत कोल्हापुरच्या नावापुढे नाव आले. त्यामुळे, क्या हुवा.! तुम्हारा वादा, वो कसम वो इरादा.! असे म्हणत त्यांच्यावर टिका होऊ लागली  आहे.
                 
  एक निष्ठावंत म्हणून थोरात साहेबांनी दिल्लीच्या मनात जी जागा निर्माण केली आहे. त्याला तोड नाही. पण, सर्व काही हवे.! ते मनासारखेच हा त्यांचा अट्टाहास किंवा त्यासाठी रचलेल्या खेळ्या अफलातून असतात. महाविकास आघाडी होताना मुस्लिम समाजाचा राग ओढावून घ्यायला नको. तेव्हा साहेब चर्चेतून अलिप्त राहणे पसंत केले. ठाकरे, पवार व गांधी अशी थेट चर्चा झाली. त्यानंतर खात्यांच्या वाटपाची बैठक सुरु झाली आणि कोणाला काहीही मिळो.! त्यांनी महसुल खात्यावर अग्रही बोट ठेवले. ते होते कोठे  नाहीतर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्च्या सुरु झाल्या. त्यांनी त्या चर्चेचे खंडण करीत मला नगरच काय.! राज्यातील कोणत्याही जिल्ह्याचे पालकत्व नको आहे. कारण काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या १० जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे, खातेवाटपात अनेकजन नाराज आहे. त्यामुळे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. म्हणून साहेबांनी शर्यतीतून माघार घेतली. अर्थात जे कोणी कमी खात्याचे नाराज नेते असतील. त्यांच्या गगनात आनंद मावेनासा झाला असेल. काही झालं तरी आता पालकमंत्री होण्याचे भाग्य कपाळी लागेल असे वेटींगवर असणाऱ्या चौघांना वाटत असेल. पण, झालं तर वेगळच. यादी बाहेर पडली आणि रिकाम्या जागी भलतीच गाळलेली जागा भरलेली दिसली. अर्थात या निर्णयामुळे काँग्रेसवाले नाराज नसतील नवलच म्हणायचे. त्यामुळे, येणाऱ्या काळात हे नाराजीनाट्या आपल्याला लवकरच पहायला मिळेल. अशी शंका आहे. आता साहेबांना कोल्हापुरचे पालकमंत्रीपद भेटले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तेथे पुराने थौमान घातले होते. जेव्हा तेथे गृहनिर्माणमंत्री विखेपाटील वेळीच गेले नाही. असा आरोप करणारे थोरात साहेब.! या जिल्ह्याला किती वेळ देतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. साहेब नक्कीच चांगला निधी आणून कोल्हापुरला सुजलाम सुफलाम करतील हिच आपेक्षा.!
       

हसन साहब.!

  तर दुसरीकडे नगर जिल्ह्यासाठी दिलीपराव वळसेपाटील किंवा शंकरराव गडाख यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या दोन्हींची नावे मागे पडत हसन मियालाल मुश्रीफ हे नगरचे पहिल्यांदाच पालकमंत्री झाले आहेत. कोण आहेत हसन मुश्रीफ.? तर
मुश्रीफ हे कागल मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत. त्यानी घाटगे यांचा पराभव करीत पारंपारीक लढत आजवर जिकली आहे. मुश्रीफ हे शरद पवारांचे अगदी जवळचे आहेत. गेल्या वर्षी म्हणजे भाजपच्या काळात त्यांच्या घरावर इडी व आयकर विभागाने छापे टाकले होते. तेव्हा ते म्हणाले होते. शरद पवार आमचे देव आहेत. त्यामुळे, जे होईल त्यास सामोरे जायला तयार आहोत. अशा मुश्रीफांच्या निष्ठेचे हे फळ त्यांना मिळाले आहे.
 
 
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी.!
मुंबई दि. ८ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

 1. पुणे - श्री. अजित अनंतराव पवार
2. *मुंबई शहर*- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. *मुंबई उपनगर*- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. *ठाणे*- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. *रायगड* - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. *रत्नागिरी*- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. *सिंधुदुर्ग*- श्री. उदय रविंद्र सामंत
8. *पालघर*- श्री. दादाजी दगडू भुसे
9. *नाशिक*- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. *धुळे*- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. *नंदुरबार*- ॲड. के.सी. पाडवी
12. *जळगाव*- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. *अहमदनगर*- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. *सातारा*- श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. *सांगली*- श्री. जयंत राजाराम पाटील
16. *सोलापूर*- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. *कोल्हापूर*- श्री. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. *औरंगाबाद*- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. *जालना*- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. *परभणी*- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. *हिंगोली*- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. *बीड*- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. *नांदेड*- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. *उस्मानाबाद*- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. *लातूर*- श्री. अमित विलासराव देशमुख
26. *अमरावती*- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
27. *अकोला*- श्री. बच्चू बाबाराव कडू
28. *वाशिम*- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. *बुलढाणा*- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. *यवतमाळ*- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. *नागपूर*- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. *वर्धा*- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. *भंडारा*- श्री. सतेज डी. पाटील
34. *गोंदिया*- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. *चंद्रपूर*- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. *गडचिरोली*- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

- सुशांत पावसे

=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १५ लाख २५ हजार वाचक)