"राष्ट्रवादीच्या "मनसुब्यांना" अकोल्यात "सुरुंग".! पं समितीत अवतरले दोन "दत्त".! पिचड "पर्वाला" पुन्हा "प्रारंभ".!

                 
अकोले (प्रतिनिधी) :-
                 विधानसभा मतदारसंघात वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर अकोल्यात असे काही झेंडे मिरविले गेले. की, आता पिचड पर्वाचा अस्तच झाला आहे. आमदरकी गेली खरी, पण, स्थानिक स्वराज्य संस्थांवरदेखील राष्ट्रवादी फना उभरुन भाजपच्या डोक्यावर थूै-थूै नाचेल असा अविर्भाव दाखविण्यात आला. पण, तालुक्यातील पहिल्याच निवडणुकीत हवेत केलेले नेते जमिनीवर आले आहेत. कारण, पंचायत समितीच्या निवडणुकीत पिचडांचे समर्थक दत्ता बोऱ्हाडे सभापती तर दत्ता देशमुख हे उपसभापती झाले आहेत. ५/७ असा रंगलेला सामना पिचड साहेबांनी आपल्या नावे करून तालुक्यात आपली सरशी असल्याचे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या या पराभवाने नाराज झालेले पिचड समर्थक आनंदून गेले असून राष्ट्रवादीच्या नेत व कार्यकर्त्यांचा चांगलाच कुच्चामोड झाल्याचे पहायला मिळाले. या अपयशानंतर तरी यांचे पाय जमिनीवर टेकतील. अशी अपेक्षा सामान्य जनतेने केली आहे.
           
  अकोले पंचायत समितीत पुर्वी पिचड साहेबांच्या पाठींब्यावर शिवसेनेची सत्ता होती. त्यांनी ज्यांना साथ दिली. तेच विधानसभेत त्यांच्या विरोधात आरडून उठले. तरी पिचडांनी शांततेची भुमिका घेत आजवर योग्य वेळेची प्रतिक्षा केली. आज सभापती व उपसभापती निवडीचा मुहुर्त होता. त्यामुळे, अगदी काही दिवसांपासूनच त्यांनी सात सदस्य नजरकैदेत ठेवले होते. अर्थात जीव गेला तरी बेहत्तर.! पण, साहेबांची साथ सोडायची नाही. हेच सात जणांनी वदून दाखविले होते. कोणताही व्हीप वैगरे न जुमानता काहींनी साहेबांना साथ दिली. त्यामुळे, कालची विभक्त सत्ता आज एकहाती आणण्यात साहेबांना यश आले आहे.
            
  एक महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात महाविकास आघाडी झालेली आहे. तोच फंडा बहुतांशी ठिकाणी वापरला गेला. अशी आघाडी करीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात आले. पण, अकोल्यात असल्या आघाड्या फिगाड्या चालत नसतात. हेच पिचडांनी दाखवून दिले आहे. एकीकडे १२ सदस्यांची पंचायत असतांना राष्ट्रवादी (४), भाजप (४) व शिवसेना (४) असे समसमान सदस्य निवडून आलेले आहेत. असे असतांना देखील राष्ट्रवादीला त्यांचे चार सदस्य संभाळता आणता आले नाही. हे किती मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, पवार साहेब म्हणून जनतेने मतदान केले हे स्थानिकांनी विसरुन जाऊन तालुक्यात जो  उन्माद मांडला आहे. त्याला हे ठोस उत्तर समजावे. असे जाणकारांचे मत आहे. आज पंचायत समिती गेली, उद्या झेडपीची जागा जाईल, नंतर कारखाना आणि नगरपंचायत देखील. त्यामुळे, अकोल्यात जो राष्ट्रवादीचा आमदार म्हणून जो अपघात झाला. तो स्थानिक स्वराज्य संस्थांवर होईल.! असे जर कोणाला वाटत असेल. तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. येथे कितीही विरोधक एकवटले. तरी, जनतेला त्यांची चुक कळून चुकली आहे. एक पर्याय म्हणून जनतेने खेळलेला जुगार त्यांच्या अंगलट आला असून त्याची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता करणार नाही. हेच चर्चीले जात आहे. त्यामुळे, आता तरी राष्ट्रवादीने त्यांचे पाय जमिनीवर ठेऊन सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा जर सरकार पाच वर्षे टिकलेच तर, पुढील पाच वर्षानंतर समोरच्याचे डिपॉझिट पिचड साहेब जप्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, देर है तो दुरुस्त है.! याच प्रतिक्षेत जनता आहे.
          

  •           आमदारकीची निवडणुक खरोखर जनतेने हातात घेतली होती. त्यामुळे, जनता जनार्दन आहे. त्यांनी मनात आणले ते झाले. त्याची प्रचिती काय होत आहे. हे आपण पाहतोच आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि आर्वाच्या भाषा सोडून कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे, जनता फसली. तरी, जाणकार लोकप्रतिनिधी दुधखुळे नाहीत. येते ना भांगरे फॅक्टर चालला ना लहामटे फॅक्टर. सात सदस्यांनी पिचडांना समर्थन करीत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे, तालुक्यात राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना सुरुंग लागला असून पुन्हा पिचड फॅक्टर रुजू झाला आहे.


(पंचायत समिती संदर्भात सविस्तर लेख  भाग २ उद्या सायंकाळी प्रसिद्ध होईल)


- सागर शिंदे

=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १५ लाख २५ हजार वाचक)