"कोणाला कोणते खाते.? कोण कोण नाराज.? बड्या नेत्यांना छोटी खाते का ? कोणाला का व कसे डावलले.!
मुंबई :-
अखेर प्रदिर्घ काळानंतर राज्यसरकारला मंत्रीमंडळ स्थापन करुन खातेवाटप करण्यात यश आले आहे. आता फक्त पालकमंत्री पदाचा मुहुर्त राहिला असून रडत खडत का होईना.! ठाकरे सरकार स्टेबल होऊ पाहत आहे. पण, दुधाचे दह्यात रुपांतर झाले आणि सत्तार यांच्या रुपाने माशी शिंकली आणि सत्तेला कलंकाचा सुरुंग लागला. अर्थात आजपासूनच नाराजीचे सुर बाहेर पडू लागले आहेत. कोणाला मोठे, वजनदार म्हणजे मलाईदार "खाते" हवे होते. तर, कोणाला राज्यमंत्री नको, तर कॅबिनेटची संधी हवी होती. त्यामुळे, अगदी प्रत्येक पक्षात घुसमट सुरु असल्याचे पहायला मिळाले. तर, एकीकडे ऊभी हयात विरोधी आणि अपक्ष किंवा केवळ आमदार म्हणून मिरविणाऱ्यांना संधी मिळाल्याने. त्यांची जीव खालीवर होत आहे. सरकार पडते की काय.! पद जाते की काय.? त्यामुळे, ते वारंवार माध्यमांना सामोरे जाऊन म्हणत आहे. कोणी नाराज नाही, कोणी फुटत नाही, सरकार टिकणार आहे. पण, वास्तव पाहता बहुतांशी बडे नेते फार नाराज असल्याचे बोलले जात आहे. सरकार स्थापन होण्यापुर्वी गृहमंत्री, महसुल, उपमुख्यमंत्री, नगर विकास, बांधकाम अशा अनेक पदांवरुन वाद सुरु होते. त्यामुळे, हा गोंधळ आजवर रंगला होता. मात्र, इतक्या दिवसानंतर देखील या वादावर समाधानकारक तोडगा निघाल्याचे दिसत नाही. त्यामुळे, महाविकास आघाडीत अनेकांचे लालदिवे लागले आहेत. यात कोण-कोण नाराज असू शकते आणि त्यांची पात्रता काय होती. याबाबत जनतेला काय वाटते. याबाबत मांडलेला हा छोटासा रिपोर्ट आहे.!
काही झाले तरी गृहमंत्रीपद तुम्हाला नाही.! |
खरे पाहिले तर उद्धव ठाकरे यांना मनोमन वाटत होते. की, "नगरविकास" आणि "गृहमंत्री" हे दोन पदे तरी शिवसेनेच्या गोटात असावेत. पण, गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अडून बसली होती. या खात्यासाठी अजित पवार यांचे नाव अगदी पहिल्यापासून चर्चेत होते. पण, त्यांना उपमुख्यमंत्री पदासह हे देखील खाते हवे होते. वास्तवता शिवसेनेच्या खात्यातील गृहमंत्री खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले खरे. पण, ते ना जयंत पाटील मिळवू शकले ना दादा. या दोघांच्या भांडणात अनिल देशमुख हा तिसराच व्यक्ती बाजी मारुन गेला. यामुळे, ज्या दादांनी राष्ट्रवादी पक्षाचे अर्थकारण बघीतले. त्यांना राज्याचे अर्थकारण संभाळण्याची संधी दिली गेली आहे. खरतर जयंत पाटील यांचे पद फारसे हलके नाही. पण, तरी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून राहिले जात होते. त्या तुलनेत त्यांचे खाते ६० ते ७० टक्के समाधानकारक असले तरी भाचे प्राजक्त तनपुरे यांचे खाते देखील त्यांचेच समजून ते समाधानी असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या यादीत ज्येष्ठ म्हणून छगन भुजबळ यांचे नाव आहे. त्यामुळे, त्यांनी पहिल्या यादीत कॅबिनेट पदाची शपत घेतली होती. त्यांच्या नशिबी दुर्दैवी कारावास होता. असे असताना त्यांना दैवाने पुन्हा मंत्री होण्याची संधी दिली. हे असे असले तरी. ते अन्न व नागरी पुरवठा या खात्याबाबत फारसे समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. खरं पाहिलं तर, धनंजय मुंडे या व्यक्तीमत्वाने राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अगदी दिवस रात्र एक केला. जेवणास वेळ मिळाला नाही. तर, गाडीत मांडीवर डब्बा घेऊन भूक भागविली. राष्ट्रवादीला न्याय देणाऱ्या मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री करुन पक्षाने खरी नाराजीच ओढावून घेतली आहे. पण, त्यांनी दादांच्या भाजप हातमिळवणीला हात दिला होता. त्यामुळे, त्यांच्यावर हा सामाजिक न्याय लादला आहे. अन्यथा राज्याला अनिल देशमुख प्रिय वाटतात की धनंजय मुंडे यावर मतदान झाले. तरी जनतेच्या मनातील आवाज कळून जाईल. त्यांच्या पाठोपाठ दिलीपराव वळसे पाटील हे खरोखर एक जुने जाणते नेते आहेत. विशेष म्हणजे पवार साहेबांच्या जवळचे आहेत. पण, त्यांच्या वाट्याला राज्य उत्पादन शुल्कचे खाते आले आहे. अर्थात ते पालकमंत्री देखील होऊ शकतात. पण, या पदावर ते देखील समाधानी असेल. असे अजिबात वाटत नाही. राष्ट्रवादीत रेखाटावे असे व्यक्तीमत्व म्हणजे जितेंद्र आव्हाड. त्यांनी तर पवारांच्या ह्रदयात घर केले आहे. त्यामुळेच की काय.! त्यांना गृहनिर्माण मंत्री केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. एकेकाळी त्यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र, त्यांना गृहखात्या ऐवजी गृहनिर्माण खाते मिळाले आहे. ते देखील नाराज असल्याचे बोलले जाते.
गेलं तर जाऊदेे गृहखातं, बजेट बसलय ना.! |
एक विशेष बाब म्हणजे.! काल शिवसेनेत आलेल सत्तार नाराज झाले आणि चक्क मंत्रीपदाचा राजिनामा देत बाहेर पडू असा संदेश दिला. पण, त्यांच्या जाण्याने काही होत नाही. हे शिवसेनेने स्पष्ट केले. त्यामुळे, त्यांनी पुन्हा युटर्न घेतला. हे नाराजी नाट्य आता सुरुच राहणार आहे. या सगळ्यात अनेक नवोदित आमदारांची लॉट्री लागली आहे. बाप जायदादी प्रमाणे अनेकांना "अक्कल कमी आणि प्रवास लंडनचा" होणार आहे. तसेच अपेक्ष नसताना आमदार आणि स्वप्नात नसताना चक्क मंत्री अशा गुदगुल्या अनेकांना होताना दिसत आहे. या सरकारमध्ये कोणी नाराज आहेत. तर कोणी समाधानी त्यामुळे, याचाच फायदा घेत वैऱ्याने डाव साधून साम, दाम, दंड, भेद ही निती अवलंबवून सत्ता लुटली नाही म्हणजे बरे. बघुया.! सरकार किती दिवस चालते आहे.
काँग्रेस सेनापती.! |
काँग्रेस
* बाळासाहेब थोरात - महसूल* अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
* नितीन राऊत - ऊर्जा
* विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
* के.सी.पाडवी - आदिवासी विकास
* यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
* अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
* सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन
* वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
* अस्लम शेख - वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
* सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)
* विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री
सबके बादशाह.! |
शिवसेना
* एकनाथ शिंदे - नगरविकास* सुभाष देसाई - उद्योग
* उदय सामंत - उच्च तंत्र शिक्षण
* आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण
* अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज
* शंकरराव गडाख - जलसंधारण
* संदिपान भुमरे - रोजगार हमी
* गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
* दादा भुसे - कृषि
* संजय राठोड - वने
* शंभूराज देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
* अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास
* बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
* राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री
राष्ट्रवादी
* अनिल देशमुख - गृहमंत्री
* छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
* दिलीप वळसे पाटील- राज्य उत्पादन शुल्क, कामगार
* बाळासाहेब पाटील - सहकार
* राजेश टोपे- आरोग्य
* जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
* धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
* राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
* हसन मुश्रीफ - ग्रामविकास
* दत्ता भरणे - जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री
* अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
* संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
* प्राजक्त तनपुरे - राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण