|
साहेब.! एकदा तरी संधी द्या.!
|
संगमनेर :-
महाविकास आघाडीची अगीनगाडी हळूहळू पुढे सरकू लागली आहे. निवडणूक निकालानंतर १५ दिवसात मुख्यमंत्र्यांसह सात जणांनी शपथ घेतली. त्यानंतर महिनाभर मंत्रीमंडळ विस्ताराचे "गुऱ्हाळ" सुरु राहिले. ते झाल्यानंतर "खातेवाटपावर" येऊन घोडे आडले आणि तो प्रश्न सोटतो न सुटतो तोच "पालकमंत्री" वाटपाहुन तु-तू,मै-मै सुरु झाली. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेसाठी किती हापापलेली आहे. हे नव्याने सांगायला नको. शिवसेनेचा इतिहास तर आपण नुकताच अनुभवला आहे. पण, "शिवसैनिक" मातोश्रीच्या पुढे जात नाहीत. हे सर्वात मोठे सुदैव. पण, एकीकडे काँग्रेसला प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीत मुजरा करावा लागतो आहे. त्यामुळे, हे नको-ते अन् ते नको हे.! असे करण्यात जे सुदैवाने मिळाले. ते सुद्धा रगडून-रगडून हजम करायचे काम सुरु असल्याची टिका त्यांच्यावर होत आहे. आता या सगळ्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून माननिय बाळासाहेब थोरात यांची प्रचंड ताणाताण होत असल्याचे दिसत असून.! त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष, महसुल मंत्री आणि वरुन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असे अनेक कारभार सद्या कार्यभारात येऊ शकतात असे बोलले जाते. मात्र, ते सद्यातरी शक्य होईल.! असे वाटत नाही. कारण, ते शरद पवारांच्या कितीही जवळ असले. तरी, पवारांचे नगर जिल्ह्यावर "विशेष प्रेम" आहे. त्याचबरोबर "विखें" नामक व्यक्तीला "शह" देऊन अजून बरेच "राजकीय हिशोब" चुकवायचे आहे. त्यामुळे, सहा आमदार असताना या जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन आमदारांच्या जोरावर "पालकमंत्रीपद" देणे. हे कितपत योग्य वाटणार आहे. त्यामुळे, पवार साहेबांनी विखेंच्या मुलासाठी "दक्षिणेची जागा" सोडली नाही. ते सहा आमदार असताना पालकमंत्रीपद सोडतील.! हे उघड-उघड गणित कसे बिघडू शकते. याला अपवाद फक्त साहेबांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष अन्यथा नगरच्या बदल्यात पुणे. असेच काही झाले तर ठिक. अन्यथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. बाळासाहेब थोरात हे होणे अशक्य..!!
|
तुमचे आमदार किती आहे २ ! तरी ?
|
शरद पवार साहेब.! हे कोणालाही "न समजलेले व्यक्तीमत्व" आहे. त्यांनी राष्ट्रवादी उभी करताना कधीही "तत्वांशी तडजोड" केली नाही. तर, जेथे तत्व आडवे आले. तेथे त्यांनाही जुमानले नाही. होय.! यालाच "पवार पॅटर्न" म्हणतात. कोणी कितीही जवळचा असो. पण, "राजकारणासाठी लवचिक" राहुन त्यांनी आजवर निर्णय घेतल्याचे इतिहास सांगतो. फार दुरचे उदा. सांगण्यापेक्षा २०१९ साली लोकसभेला नगर दक्षिणची जागा त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी सोडली नाही. अखेर पक्ष फुटला, "मतभेद" आणि "मनभेद" झाली. तरी, साहेब त्यांच्या मतावर ठाम राहिले. नात्यासाठी लवचिक होत त्यांनी पार्थ पवारांना नाकारलेली उमेदवारी पुन्हा बहाल केली. पण, डॉ. विखेंचा बालहट्ट त्यांनी जुमानला नाही. अखेर पवार साहेब १९९१ नंतर पुन्हा २०१९ मध्ये पराभूत झाले. विखे कुटुंबाचा पुन्हा विजय झाला. आता. हे सर्व लक्षात घेऊन नगर दक्षिणेत ते रोहित पवार यांना ताकद देऊन पराजयाचा वचपा काढू शकत होते. कारण, बळजबरीच्या जगतापांपेक्षा लोकप्रिय रोहित पवार विजयश्री होण्याची चिन्हे अगदी फार होती. मात्र, रोहित पवारांचा कौटुंबिक मार्गाने म्हणा किंवा राजकीय कलहातून बिमोड झाला. पण, तरी देखील पवार साहेबांनी नगरवरील प्रेम कमी केले नाही. म्हणून तर या पुरोगामी जिल्ह्याने त्यांच्या पदरात सहा आमदार दिले आहे.
|
कोणीही द्या.! आम्ही सक्षम.!
|
आता अशात येथील पालकमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला द्यायचे. हे त्यांच्या मनाला देखील पटणार नाही. सद्या मंत्री महोदय बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चीले जात आहे. त्यामुळे, एक गोष्ट नमुद करावी वाटते. की, विखे आणि थोरात हे दोन्ही व्यक्ती पवारांच्या पारड्यात टाकल्या. तर, सर्वाधिक झुकते माप बेशक थोरात साहेबांना राहिल. कारण, संगमनेरात राष्ट्रवादी वार्डावर कमी पण बोर्डावर जास्त झळकताना दिसते. म्हणजे, अविनाश थोरात यांच्यासारखा कडवा विरोध आता दुर्मिळ झाला आहे. येथे राष्ट्रवादीला सत्तेत वाटा दिला जात नाही. तरी देखील बाळासाहेबांना बारामती कधी जाब विचारत नाही. याला म्हणतात प्रेम.! तितके प्रेम विखे यांच्या विरोधात आजवर दिसून आलेले नाही. उलट, आघाडीत राहुन देखील यांची तोंडे दोन टोकाला दोन दिसून आले. इतकेच काय.! विखे पाटलांवर पक्ष बदलण्याची वेळ केवळ या नगर दक्षिण जागेने आणली. त्यामुळे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फारच अग्रह धराला. तो ही प्रेमाचा. तरच, पवार साहेब होकार देऊ शकतात. मात्र, त्या बदल्यात पुणे किंवा अन्य महत्वाची जागा काँग्रेसकडून घेऊ शकतात. आता, संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन का फोडले, त्यांनी काय काय आरोप केले. बाळासाहेबांच्या विरोधात हाय, हाय का केले. याची उत्तरे शोधण्याचे काम सुरु आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये सद्या स्वार्थापोटीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे, अंतर्गत गटबाजी वाढत चालली असून. त्याला विरोधक खतपाणी घालत असल्याचे आपल्याला दिसत आहे. याची प्रचिती काल अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या शाब्दीक चक्रिवादळातून सर्वांनी अनुभविली आहे.!
अर्थात बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास ती आनंदाची बाब असेल. हे काँग्रेसपेक्षा ते त्यांचे स्वत:चे "राजकीय मिरीट" असेल. कारण, यापुर्वी देखील त्यांनी आघाडी सरकारच्या काळात प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. मधुकर पिचड यांनी पवार साहेबांची कास धरुन आपली पोळी भाजून घेतली होती. यापुर्वी दिलीपराव वळसेपाटील असतांना त्यांनी जिल्हा नियोजन चांगले केल्याचे बोलले जाते. त्यांच्या पाठोपाठ बबनराव पाचपुते आणि नंतर पिचड साहेब. अशी ही राष्ट्रवादीची परंपरा आहे. मात्र, आता थोरात साहेबांना तुल्यबळ विरोधक नाही. असे बोलले जाते. की, शंकरराव गडाख यांची शिवसेनेकडून वर्णी लागू शकते. मात्र, गडाख यांना कॅबिनेटवर घेत शिवसेनेने आधीच चांगला सन्मान दिला आहे. त्यामुळे, त्यांचा विषय तेथेच संपतो. तर, प्राजक्त तनपुरे नवोदीत असून त्यांना मामा पावले. हेच त्यांचे नशिब आहे. त्यामुळे, मंत्री म्हणून उरले फक्त थोरात साहेब. पण, त्यांच्यापेक्षा पवारांना पक्ष वाढवायचा आहे. विखेंचे बळ कमी करायचे आहे. त्यामुळे, बाळासाहेबांना बळ देण्यापेक्षा दिलीपराव वळसे पाटलांना बळ देऊन सहा आमदारांचा हातात हात घेऊन ते नगर जिल्हा पुन्हा एक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करतील. असा अंदाज जाणकारांचा आहे. त्यामुळे, अपवाद वगळता तडजोड झाली नाही. तर, बाळासाहेब थोरात पालकमंत्री होणे अशक्य वाटते आहे. जर झालेच. तर, संगमनेरच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला जाईल. त्याचा सर्वांनाच आनंद होईल.
अर्थात हे एक अंदाज असतात आणि अंदाज फारसे मनावर घ्यायचे नसतात. त्यातल्या त्यात मीडियाचे तर नाहीच नाही. नाहीतर एक्झिट पोलमध्ये थोरात साहेब पराभूत दाखविले. तर, डॉ. किरण लहामटे मंत्री. तसेच, पुढील पालकमंत्री राम शिंदे कि राधाकृष्ण विखे पाटील हा वाद सुरु असताना सत्ता अनपेक्षित तीन वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांची आली. म्हणून, वाटते ते होईल असे नाही आणि घडले तेच वास्तव आहे असेही नाही. त्यामुळे.! औंदाच्या राजकीय घडामोडीत तरी, वेट & वॉच.!
- सागर शिंदे
=============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १५ लाख १५ हजार वाचक)