सातेवाडी गटात, पिचडांची "कसोटी", डॉ. लहामटेंची "कसरत" आणि १७ शे ६० इच्छुक.! आ देखे जरा किसमे कितना हे दम
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले विधानसभा निवडणुकीत मा. आ. वैभव पिचड यांचा पराभव झाला आणि तालुक्यात राष्ट्रवादीमय वातावरण तयार झाले. पण, थोड्याच दिवसात राष्ट्रवादी आणि नव्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात इतकी "धिटाई" सुरु केली. की, नकळत झालेला बदल जनतेच्या "बोकांडी" बसला की काय.? असा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादी इतकी हवेत गेली. की, आमदारकीनंतर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकींचा विसरच पडून गेला. कारण, गेल्या आठवड्यात पंचायत समितीत निवडणुका झाल्या आणि त्यात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी देखील पिचड गटाला पाठींबा दिला. अर्थात हि निवडणुक डॉ. लहामटे व मा. पिचड यांच्यासाठी कसोटीची होती. मात्र, ४० वर्षाच्या अनुभवासमोर डॉक्टरांचे अॉपरेशन फेल गेले. भलेही ही निवडणुक जनतेतून नसूद्या. पण, गणिमी कावा किंवा सत्तेची समिकरणे वापरुन पंयाचत समितीवर महाविकासआघाडीचा झेंडा फडकविता आला असता. पण, दुर्दैव असे की, ज्या शिवसेनेला लोकं "फितूर" म्हणत होते. ते चारही सदस्य ठाम राहिले आणि "भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला". आता ही निवडणुक गेली. पण, पिचड साहेबांची खरी कसोटी व डॉ. लहामटेंची खरी कसरत जिल्हा परिषदेच्या अकोल्यातील सातेवाडी पोटनिवडणुकात लागणार आहे. इच्छुकांना सांभाळायचे, बंडखोरांची मनधरणी, उताविळ नवरे आणि खरे मिरिटचे उमेदवार, यांची गणिते जुळविता-जुळविता दोन्ही पक्षांच्या "नाकीनव" येणार आहे.! तेव्हा खरी रंगित तालिम जनतेला पहायला मिळणार आहे.
गेली ४० वर्षे पिचड कुटुंबाने अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजविले. पण, जोवर ते पवार कुटुंबाला धरुन होते. तोवर त्यांचा अस्तित्वावर कधी गदा आली नाही. मात्र, कोणास ठाऊक मैत्री संबंधातून कसा कमळाचा मोह झाला आणि त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्या एका निर्णयाने तालुक्यातील चित्र बदलून गेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, गेल्या ४० वर्षात त्यांनी विरोधकांना वार करण्याची संधीच कोठे ठेवली नव्हती. अगदी आमदारकीचे चक्रव्युव्ह अभेद्य होते. पण, साधी एक संधी मिळाली आणि बालेकिल्ल्याला खिंडार पडली. या दरम्यानच्या काळात अनेक तरुणांनी बंडाचे निशाण हाती घेतले. ४० वर्षे काय केले. हा ४० वर्षात कधी न विचारला जाणारा प्रश्न चार दिवसात पुढे आला. तालुक्यातील अनेक अस्मितेचे प्रश्न ऐरणीवर आले आणि साहेबांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आता जो रोष होता त्याचे वलय कमी-कमी होताना दिसत आहे. जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.! त्यामुळे, अद्याप जनमानसांमध्ये राष्ट्रवादी आणि आमदार यांच्यात सर्वकाही अलबेले असले. तरी, पदाधिकारी, ज्येष्ठ, जाणकार युवा नेतृत्व, ज्यांनी विधानसभेत राष्ट्रवादीसाठी दिवस रात्र एक केला. अशा व्यक्तींच्या प्रतिक्रिया प्रचंड नकारात्मक येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोणी राजकारणाकडे दुर्लक्ष करतय तर कोणी निवडणुका आल्या की देवाधर्माला निघून जातय. ही पक्षातील किती मोठी अराजकता आहे.! त्यामुळे, तळागाळात जरी लोकांना अनुभव नसला. तरी, जाणकार राजकारणी पुन्हा वैभव पर्वाची आठवण करु लागले आहे. कारण, त्यांनी कधी कोणाची मने दुखविली नाही. नेलं काम पडू दिले नाही, माणसे तोडली नाही पण जोपासली. असे उद्गार जाणकारांकडून बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे, उद्याच्या निवडणुकीत त्यांची फार मोठी कसोटी असणार आहे.अर्थात, साोतेवाडी गटातून भाजपच्या वतीने डॉ. किरण लहामटे हे झेडपीवर सदस्य म्हणून गेले होते. तर, गणातून दत्ताजी यांनी पंचायत समिती गाठली. त्यामुळे, सातेवाडी हा मुळत: भाजपचा बालेकिल्लाच म्हणावा लागेल. पण, डॉक्टरांमुळे तेथील वातावरण बदलेल असे पंचायत समितीला वाटत होते. पण, घडले ते नवलच. उलट त्यांच्याच गटात भाजपचा सभापती झाला. आता सभापती पद तेथे काही फुकट दिले नाही. त्यांना तालुका संभाळता-संभाळता गट देखील उभा करावा लागणार आहे.
उद्याच्या सातेवाडी पोटनिवडणुकीत प्रचंड मतांनी भाजपचा उमेदवार लागेल. असे नियोजन अखावे लागणार आहे. त्यासाठी ही धडपड सुरु आहे. मात्र, भाजपकडून अनेक नावे पुढे येत असून इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळू लागली आहे. तर, दुसरीकडे डॉक्टर आमदार झाल्यानंतर त्यांच्यामागे फार मोठे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे, अनेकांची पोपटपंची त्यांच्या सभोवताली पहायला मिळते आहे. या चलतीच्या काळात कोणकोण वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे नजरेआड होत नाही. परंतु साहेब वाटतात तितके सोपे नाहीत. ते वेळेनुरुप योग्य निर्णय घेतीलच. ते फुकट आमदार झालेले नाहीत. त्यामुळे, ते देखील स्वत:ची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. एकंदरीत सातेवाडीत "राजकीय धुरळा" पहायला मिळणार आहे.अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निच्छीत झाला नसला. तरी, सतिश भांगरे यांनी आपला मोर्चा सातेवाडीत दाखल केला आहे. या महाखिचडीत कोणाचे तिकीट मिळो वा न मिळो, पण मैदानात उतरायचेच हा निच्छय त्यांनी केला आहे. त्यामुळे, ही लढत किती रंगी होईल हे सांगता येणे शक्य नाही. पण, एक बाकी नक्की.! आता दुरंगी लढत होणे अशक्य आहे. त्यामुळे, अस्तित्व, सिद्धता, कसोटी, कसरत हे सगळ्यांचेच पणाला लागणार आहे. चला बघुया.! किसमे कितना है दम.!
भाग २ सातेवाडीचा राजकीय महासंग्राम: कोणकोण आहेत इच्छूक १० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी. कोणाला कोणाचे पाठबळ, कोण कोणास जड भरेल. कोणत्या बड्या नेत्यांची कसरत असेल. कोण विजयी होऊ शकते. वाचा रोखठोक सार्वभौमचा पुढील लेख.! सातेवाडीचा राजकीय महासंग्राम : भाग २