"हैद्राबाद" पोलीसच आता आरोपाच्या "एन्काऊंटरवर".! का आहे संशय ?
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
हैद्राबाद येथे एका २६ वर्षीय "महिला" डॉक्टरवर "बलात्कार" करुन त्यांची "जाळून हत्या" करण्यात आली. या निर्दयी कृत्यानंतर तेलंगणा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले होते. काल त्यांना तपासासाठी घटनास्थळी नेले असता. चौघांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, न्यायालयाच्या न्यायदानापुर्वीच चौघा आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आला व खऱ्या अर्थाने पीडितेला तत्काळ न्याय मिळवून देण्यात पोलिसांना "नैसर्गिक" म्हणा वा "कृत्रीम" यश आले. नक्कीच पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. पण, त्यानंतर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हे आरोपी खरे होते का ? यांचा एन्काऊंटर झाला की घडवून आणला ? हे सर्वच आरोपी होते का ? यांच्या विरोधात सबळ पुरावे होते का ? की, घटनेवर पडदा पडावा म्हणून पोलिसांनी एन्काऊंटर करून विषयच संपवून टाकला आहे. !! ही मुले नेमकी कोणत्या जातीची होती आणि त्यांची नावे बनावट करून धर्म देखील का बदलला ? खरे आरोपी असतील तर यांना अल्पवयीन म्हणून शिक्षा झाली असती का ? एन्काऊंटर घडवून आणला असेल तर त्यापेक्षा फास्ट्रॅक न्यायालयातून २-४ महिन्यात खटला निकाला काढता आला नसता का ? जर, हे आरोपी नसतील तर पीडितेच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल का ? असे एक ना अनेक प्रश्न सद्या माध्यमांतून पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे, एन्काऊंटर मागील वास्तव काय ? हे लवकरच समोर येणार आहे. सद्या उज्ज्वल निकम यांनी सुद्धा या एन्काऊंनेटरवर प्रश्नचिन्ह ऊभे केले आहे.
आपल्याला आठवत असेल. अकोले तालुक्यातील विरगाव येथे दरोडा पडला होता. त्यात अत्याचार झाल्याचे देखील बोलले गेले. हे प्रकरण इतके चिघळले गेले. की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर पोलिसांनी कोणास ठाऊक कोठून चारपाच तरुण ते ही विशिष्ट समाज्याचे धरुन आणले आणि गुन्हानिर्गती केली. लोक शांत झाले. पण, जेव्हा केस कोर्टात उभी केली. तेव्हा समजले. हे ते आरोपी नव्हते. त्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यानंतर पीडित कुटंबाला न्याय मिळालाच नाही. नंतर जनता स्थिर झाली होती. हे एकच उदाहरण नाही. असे हजारो उदाहरणे आहेत. आम्ही क्राईम रिपोर्टींग करताना असे खूप अनुभव घेतले आहे. पण, खाकीने रंगविलेल्या कागदासमोर कोणाचेही काहीच चालत नाही. त्याही पेक्षा जनतेच्या ऊद्रेखासमोर तर नाहीच नाही. साप समजून दोरी बडविण्यात जनता धन्यता मानते. आज शिवसेनेच्या प्रवक्त्या निलमताई गोऱ्हे व प्रकाश आंबेडकर यांनी अगदी प्रांजळपणे बाजू मांडली आहे. पीडितेला न्याय तेव्हाच मिळेल. जेव्हा खरे आरोपी फासावर लटकविले जातील. त्यामुळे, त्यांच्या मागणीत गैर काही नाही. असे बोलले जाते. की, हे तरुण अल्पवयीन होते. त्यातल्या त्यात त्यांचा धर्म बदलवून हिंदु असल्याचे भासविण्यात आले होते. हा प्रकार एका हिदुत्ववादी संघटनेने समोर आणला असता. मोठा वादंग उभा राहु लागला होता. हा व्हायरल व्हिडिओ अधिक प्रसारीत झाला असता. तर, देशात दोन जातींच्या दंगली पेटल्या असत्या. त्यामुळे, न्याय अन्याय दूरच पण, पोलिसांना फार मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले असते. तशी मागणी देखील करण्यात आली होती. पोलिसांसाठी धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून, आर या पारच्या लढाईत हा एन्काऊंटर झाला असावा अशी खाक्या वर्तुळात चर्चा आहे. खरे पाहिले तर एन्काऊंटर झाला असेल तर शेकडो सॅल्युट व घडवून आणला असेल तर लाखो सॅल्युट असे कौतुक तेलंगणा पोलिसांचे होते आहे. यावर आम्ही देखील सहमत आहोत. उलट आमच्याकडून एक अब्ज सॅल्युट पण, फक्त ते आरोपी खरोखरचे होते का ? कि घटनेवर पडदा टाकण्यासाठी हा प्रकार घडवून आणला आहे. याची मागणी विचारवंतांकडून होत आहे.
काहीही झाले तरी आरोपी खरे असतील. तर घटनाबाह्य का होईना या एन्काऊंटरचे समर्थन केलेच पाहिजे. आणि काही गोष्टी दडपण्यासाठी घटनाक्रम उभा केला असेल. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण, संविधानातील तृटींच्या आडून कोणी लोकशाहीचा गळा घोटत असेल. तर ते चुकच आहे. असेच सुज्ञ नागरिकांना वाटते.
(क्राईम रिपोर्टर)

घटनेच्या चौकटीत राहुन विचार केला. तर, हा एन्काऊंटर चुकीचा नक्कीच वाटेल. कारण, आज राज्यघटनेतील तृटींचा वापर करुन गुन्हा सिद्ध होण्याच्या पुर्वीच पोलीस न्याय देऊ पहात असेल. तर, कशाला हवे संविधान आणि कशाला हवे न्यायालय.! लांबणाऱ्या प्रोसेसला किंवा घटनेवर पडदा टाकण्यासाठी असे प्रकार घडत असतील. तर आज ही डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली नाही. उलट त्यांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला फाशी दिल्यासारखे आहे. पण, याच आरोपींवर दोन महिने का होईना खटला सुरु झाला असता. हेच ते आरोपी आहेत. हे सिद्ध झाले असते. नंतर एन्काऊंटर झाले असते. तर, आज शंकेला वाव उरला नसता. त्यामुळे, भावनिक दृष्ट्या विचार करता त्यांना गोळ्या घालून नाही, चौकात लटकवून ठेचून मारले. तरी ते कमीच आहे. फक्त घटनेचे गांभिर्य लक्षात घेता. समाज्याची दिशाभूल होते का ? याची शहनिशा होणे गरजेचे आहे. कारण, जे दिसते व वाटते तसे वास्तवात कधीच नसते. ही खूप जूनी म्हण आहे. त्यामुळे, याची चिकित्सा सामान्य माणूस कधीच करु शकत नाही. पण, अभ्यासक, कायदेतज्ञ व सजग नागरिकांनी नक्की करणे आवश्यक असते. कारण, खोटा न्याय हा बुजगावण्यासारखा असतो. वाटतो मनुष्यासारखा पण त्यात भूसा भरलेला असतो. म्हणून खरे काय ? हे जॉली एलएलबी या चित्रपटात जसे वकील साहेब अक्षय कुमार यांनी उकलले होते. तसे कदाचित याची देखील उकल झाली. तर, आश्चर्य वाटू देऊ नका.
काहीही झाले तरी आरोपी खरे असतील. तर घटनाबाह्य का होईना या एन्काऊंटरचे समर्थन केलेच पाहिजे. आणि काही गोष्टी दडपण्यासाठी घटनाक्रम उभा केला असेल. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण, संविधानातील तृटींच्या आडून कोणी लोकशाहीचा गळा घोटत असेल. तर ते चुकच आहे. असेच सुज्ञ नागरिकांना वाटते.
तेलंगणा पोलिसांचे जाहिर अभिनंदन. अशी असावी न्याय देण्याची हटके स्टाईल. मी खऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात होणार्या एन्काऊंटरचा समर्थक..!!सागर शिंदे
(क्राईम रिपोर्टर)