डॉ. बाबासाहेबांचे "निधन" आणि संगमनेरात मंत्रीपदाचे "सेलिब्रेशन"

निधन.... ते..... सेलिब्रेशन

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                   संगमनेर तालुक्याला अगदी पुर्वीपासून "पुरोगामी" आणि "डाव्या चळवळीचा वारसा" आहे.  फार दूर नाही. पण, आदरणीय भाऊसाहेब थोरात आणि स्व. बी.जे खताळ पाटील यांचाच इतिहास पाहिला. तर, त्यांनी "फुले, शाहु, आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांना" येथे कधीच "मुठमाती" दिली नाही. सहकारमहर्षी थोरात साहेबांनी कम्युनिष्टात राहुन "डाव्या विचारांनी" तालुक्याचा "मुकूट" चमचमता  ठेऊन संगमनेरचा झेंडा राज्यात नव्हे देशात "अटकेपार" फडकविला. त्यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र आदरणीय मंत्री महोदय बाळासाहेब थोरात यांनी "पिताश्रींच्या विचारांना" अगदी कोठेच "कलंक" लावला नाही. "ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी" या म्हणीप्रमाणे साहेब काँग्रेस पक्षाशी "एकनिष्ठ" राहिले. त्यामुळे, त्यांच्या "नितळ, निर्मळ आणि प्रामाणिक" स्वभावाला "हिदुत्ववादी" आणि "शिवसेना-भाजप" विचारसारणीचे विरोधक वगळता अगदी तळागाळातील "मागासवर्गीय बहुजन" लोकांनी कधीच "दगा" दिला नाही.
प्रकाश आंबेडकरांची "वंचित आघाडी" व ओवेसी साहेबांची "एमआयएम" त्यांच्यासमोर आव्हान होती. तरी, संगमनेरच्या "आंबेडकरवादी" मतदारांनी त्यांची साथ सोडली नाही. अर्थात हे सर्व सांगण्यामागे फार मोठे काही कारण, नाही. पण, केवळ "भावनिक अस्मिता" आहे. जरा स्पष्टच सांगायचे ठरले तर आज "६ डिसेंबर" आहे.
             
ज्या महामानवाने दिन दलीतांना जगण्याचा अधिकार दिला. ज्या क्रांतीसुर्याने स्रीयांना समाज्यात स्थान दिले. ज्या शिल्पकाराने एससी, एसटी, ओबीसी व ३४० कलमान्वे मराठा आरक्षण दिले. ज्यांच्या आशिर्वादाने लोक आमदार, खासदार झाले आणि खास करुन ९ कोटी लोकांची माय माऊली होऊन त्यांना पदरात घेऊन जगण्याचा अधिकार दिला अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. जो दिवस मागासवर्गीयांसाठी "काळा दिवस" असतो. अगदी त्याच दिवशी अशा व्यक्तीची जंगी मिरवणूक असावी.! ज्याला बाबासाहेबांच्याच लेकराला (प्रकाश आंबेडकर) मतदान न करता त्यांच्या लेकरांनी थोरात साहेबांना निवडून दिले. त्याच दिवशी ज्या दिवशी बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दिवशी मंत्री झाले म्हणून जंगी मिरवणूक निघावी. हे बाबासाहेबांच्या अनुयायांना कोठेतरी बोचण्यासारखे आहे. त्यामुळे, या दिवशी मिरवणूक काढणे, हे योग्य की अयोग्य !! हे कार्यकर्ते किंवा नेत्यांनीच ठरवायचे. असा आवाज बाबासाहेबांच्या अनुयायांनी रोखठोक सार्वभौमशी व्यक्त केला आहे.
           
 देशाचे "राजकारण" कोठून कोठे व कसे फिरेल हे काही सांगता येत नाही. भाजपने "राष्ट्रीय अस्मिता" समोर ठेऊन "पुलवामा, बालाकोट, ३७० कलम  असे मुद्दे समोर आणले आणि सत्ता काबीज करु पाहिली. तर राष्ट्रवादीने एक "इडीची नोटीस, दादा, आव्हाड, व साहेबांची रडारड आणि पावसात भिजून "भावनिक अस्मिता" जमा केली. त्याचेच फलित म्हणून "काँग्रेस" आज सत्तेत बसली आहे. तर, कालपर्यंत "हिदुत्ववादी" म्हणून "धार्मिक अस्मितेच्या" अजेंड्यावर शिवसेना आजवर लढत राहिली. त्यामुळे, "अस्मितेला" किती महत्व असते. हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, आज "दलित" समाज्याची "अस्मिता" कोठेतरी दुखावली जाऊ लागल्याची "खदखद" बाहेर पडू लागली आहे. कारण,
                            थोरात साहेब जेव्हाकधी "आनंदोत्सवाचा मुहुर्त" काढतात. त्या दिवशी नेमकी काहीतरी "दु:खद" घटना घडलेले असते. एक उदाहरण सांगायचे झाले. तर, दिल्लीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या "शिला दिक्षीत" यांचे "निधन" झाले होते. तर, राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे संगमनेरात जोरदार "सेलिब्रेशन" सुरु होते. एक "नैतिक जबाबदारी" म्हणून किमान २४ तास तरी "दुखवटा" दिन पाळला जावा. हे "राष्ट्रीय तत्व" आहे. म्हणून तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगमनेर व अकोल्यात प्रचारदौऱ्यास येणार त्याच दिवशी "अरुण जेटली" यांचे "निधन" झाले आणि त्यांनी दौरे रद्द करुन तीन दिवसांचा "दुखवटा" पाळला. असे संगमनेरात पहायला मिळाले नाही. उलट येथे "खमंग जेवणाच्या पंगती" उठल्या. आता हा मुद्दा उचलून धरत ना. विखे पाटलांनी त्याचे "भांडवल" केले. पण, थोरात साहेबांनी अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे वैयक्तीक लक्ष दिले. तर, ११ वेळा आमदार होणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे रेकॉर्ड ते मोडू शकतात. इतकी ताकद त्यांच्या स्वभावात आहे. अन्यथा "मी पुन्हा येईन"..! म्हणणाऱ्यांना "मी" किती नडला आणि छत्रपतींच्या गादीचा "ग" बाळगणाऱ्या उदयनराजेंचा "ग" त्यांना किती नडला. ही दोन्ही उदाहरणे आपल्या डोळ्यासमोरच आहे.

दुष्ट काळाने प्राणज्योत चोरली.!

         
 यातील अणखी एक "ज्वलंत" उदा. म्हणजे आज 'कंप्लेट' एक वर्षे झाले. हाच तो ६ डिसेंबर २०१८ चा दिवस.! याच दिवशी कोपरगावच्या माजी आमदार कोल्हे यांनी "मुख्यमंत्री चषकाची" मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना सुरु असताना वाजत-गाजत काढली होती. कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आली होती. की, डॉ. बाबासाहेब तुमच्यालेखी कोणी असेल-नसेल माहित नाही. पण, आमच्या लेखी आजचा "काळा दिवस" आहे. कारण, या दिवशी "आमचा बाप" अनंतात "विलिन" झाला आहे. पण, कार्यकर्ते मोठे उत्साही.! त्यांनी बँड चालु करून मिरवणुक पुढे घेतली. त्यावेळी, लोकप्रतिनिधी म्हणून दलित समाज्याने त्यांचा निषेध केला. हे प्रकरण पेपरला छापून आले. तेव्हा स्थानिकांनी "शपथ घेतली" होती. "नोटा" चालवू. पण, यांना "मतदान करायचे नाही" म्हणजे नाही.! अखेर कोल्हेंचा पराभव झाला. त्यात "खारीचा वाटा" त्या "भावनिक अस्मितेच्या उद्रेखाचा" देखील आहे. हे त्यांच्या पराभवानंतर एका कार्येकर्त्याने लिहिले होते. त्यामुळे, इतिहास रचनारी जनता, इतिहासाचे "खंडन" करुन देखील इतिहास घडवू सुद्धा शकते. हे "आती आत्मविश्वास" बाळगणाऱ्यांनी विसरु नये. हाच संदेश जनता देत आहे.

अभिवादन इतके शांत असते, नसतो बाजा.!

         एकंदर विचार करता थोरात साहेब "मंत्री" काय !! "मुख्यमंत्री" झाले. तर तालुका सोडून जिल्ह्याला आनंद होईल. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नाही.! तर, छत्रपती शिवराय, शाहु महाराज, महात्मा फुले, छत्रपती संभाजी राजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंढा यांच्यासह कोणत्याही थोर पुरुषांच्या "निर्वानदिनी" साहेबांसारख्या "पुरोगामी" विचार सारणीच्या व्यक्तीने "पद मिळाले म्हणून" डिजेच्या तालावर "आनंदोत्सव" करणे. हे "आंबेडकरी" जनतेला कोठेतरी "अपचन" झाल्यासारखे वाटते. तसेही ही अपेक्षा कोण्या भाजप उमेदवाराकडून केली असती तर नक्कीच गैर वाटली असती. पण, ज्यांच्याकडे "पुरोगामीत्वाचा नितळ आणि निर्मळ चेहरा" आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे अगदी काहीच गैर वाटत नाही. म्हणून जनतेच्या मनात जी खदखद आहे. ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अर्थात आम्ही माडले म्हणून अनेकांना रोष निर्माण होईल. पण, हेच उपक्रम शिवजयंती, भीमजयंती अशा दिवशी असते. तर, त्याचे बहुजनांनी नक्कीच स्वागत केले असते. पण, १५ कोटी जनतेचा बाप आणि "जगाचा पालनहार" निचित पडलेला असताना कोणी "उत्सव सेलिब्रेशनचे निमंत्रण" देत असेल. तर, नक्कीच त्यावर जनता योग्यवेळी विचार करेल. असे मत "बहुजन वर्गातून" व्यक्त होत आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या नंतर धाय मोकलून रडणारी जनता.!

         
कारण, डॉ. बाबासाहेब समग्र आहेत. संकुचित नाहीत. म्हणून, देशातील बहुसंख्य लोक या दिवशी चैत्यभुमीवर जातात. साहेबांना अभिवादन करतात, कोणी आजच्या दिवशीअन्नपाण्याचा त्याग करतो, कोणी २४ तास वाचन करतो, कोणी मौन बाळगतो, एक कलेक्टर महोदय दिवसभर पुस्तक स्टँल लावून त्यांची विक्रि करतात, महिला निरंकार उपवास करतात. कारण, प्रत्येक जातीतले लोक आज आपल्या घरातील माणून भगवंताने हिसकावून नेला. म्हणून काळा दिवस मानतात. ही खरी भावना आहे. पण, बुरखे घातलेल्या नेत्यांचे  तसे नसते. आता हे पुढारी एक इमेज पोष्ट तयार करतील. त्यावर स्वत:चे नाव, पद टाकून व्हाटस्अॅपला शेअर करतील व सकाळी उठून पुतळ्याला हार घालून रात्री वेगवेगळे "सेलिब्रेशन" करतील. किती "फ्लेक्झीबल" आहेत ना यांच्या स्वार्थी भावना.? पण, यात मतदारांच्या भावनिक अस्मितेला धक्का लागणार नाही. याचीच काळजी घ्यावी. हिच विनंती बहुजन समाज्याकडून होताना दिसत आहे. बाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य बहाल केले आहे. प्रश्न फक्त भावनेचा आहे. बस इतकच...!!

- सुशांत पावसे
- सागर शिंदे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)