"शरद पवारांच्या चक्रव्युहचे अभिमन्यु अशोक भांगरे.! आमदार होणार ?"- कार्यकर्त्यांची मागणी"
अकोले (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादीचे निष्ठावंत तसेच पक्ष स्थापनेते सदस्य मधुकर पिचड यांनी हातातील घड्याळ सोडले आणि कमळाच्या नादाला लागून पराभव पायावर पाडून घेतला. त्यांचा पक्षपात हा जनतेला जिव्हारी लागला, तरीदेखील त्यांना विजयाची खात्री होती. कारण, अनेक उमेदवारांची मतविभागणी किंवा कोणालातरी पुढे करु एकास-एक होऊ द्यायचे नाही. ही त्यांची व्युव्हरचना सपसेल खोटी ठरली. इतकेच काय ! रिपाई, शिवसेना आणि भाजप यामुळे आपला विजय ५० ते ६० हजारांनी होईल अशी आकडेमोड त्यांच्याभोवती मलिदा खाणाऱ्यांच्या तोंडून वारंवार होत होती. पण, वेळ आली तेव्हा टांग पलटी आणि घोडे फरार झाल्याचे पहायला मिळाले. अर्थात, हा टांगा पलटी करणारा कोण ? असा प्रश्न पडला आणि उत्तर जर आदरणीय आ. डॉ. किरण लहामटे असे मिळत असेल. तर ते निव्वळ व्यक्तीप्रेम म्हणायचे.! पण, आमदारकीच्या रथाचे सारथी खरे कोण असेल. तर ते अशोक भांगरे हे आहेत. त्यांनी जर पुढाकार घेऊन प्रचाराचे कासरे खेचले नसते. तर, ४० वर्षाचा रथ कोणी आकळू शकले नसते. इतकेच काय ! शरद पवार साहेबांच्या चक्रव्युव्हचा अभिमन्यु होण्याचे भाग्य देखील भांगरे यांनी आपल्या कपाळी लावून घेतले आहे. भांगरे यांनी या निवडणुकीत श्रीकृष्णाची भुमिका निभविली. तरच हा विजय शक्य आहे. असे स्पष्ट मत रोखठोक सार्वभौमने मांडले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. आता
सर्वांचे फलित म्हणून तालुक्यात इतिहास रचणाऱ्या अशोक भांगरे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर घ्यावे.! अशी मागणी अकोल्यातील राष्ट्रवादी समर्थकांनी केली आहे.
वियजाचे ..... शिल्पकार.!! |
अशोक भांगरे (रा. शेंडी) माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे सुपुत्र तर माजी आमदार गोपाळ भांगरे यांचे नातलग.! तशीतर फार मोठी परंपरा यांनी जोपासली आहे. परंतु, पिचड कुटुंबाचा पराभव करण्यात त्यांना यश आले नाही. ही सर्वात मोठी खंत आजही त्यांच्या मनात सलत आहे. "हम नही तो और सही".! असे म्हणत डॉ. लहामटे यांना पवार साहेबांच्या शब्दाखातर साथ दिली आणि अकोल्याचा भगवा विधानसभेत पोहचला. खरंतर आजवर भांगरे यांनी अनेक पक्ष बदलले हा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे नकळत त्यांची बदनामी झाली आणि पर्याय म्हणून डॉक्टर समोर आले. पण, वास्तवात त्यांना मागे ठेवण्यासाठी तालुक्यात एक अदृश्य शक्ती कार्यरत होती. हे देखील वेळ आल्यानंतर समोर येईल.
पण, त्यांनी पक्ष बदलले त्याची कारण मिमांत्सा कोणी करु शकले नाही. अर्थात त्यांचा प्रत्येक बंड हा पिचड कुटुंबाच्या विरोधात राहिला आहे. अपवाद म्हणून देखील तुम्हाला कोठे उदाहरण सापडणार नाही. जनता दल, अपक्ष, शिवसेना, मनसे, भाजप असा टोकाचा संघर्ष टिकविण्यासाठी त्यांनी विरोध जिवंत ठेवला. त्याचे फलित म्हणून त्यांना फितुरीचा शिक्का मिळाला. जर, "फितुरी" करायची असती. तर, याच निवडणुकीत काय कमी झाले असते ? पण, "राघोजी भांगऱ्यांचे रक्त" जातीत "बाटलं" गेलं असलं. तरी, त्याला "लालुच" नाही, "बेईमान" नाही. याचे प्रमाण या निवडणुकीने दिले आहे. त्यामुळे, आता "आरोप" करणाऱ्यांच्या "दातखिळ" बसविणारा हा "प्रत्येय" असून यानंतर कोणी 'फितुर' म्हणाल तर "जबड्यात हात घालन, दात हातात देऊ" असेच अमित भांगरे यांनी "ठणकावून" सांगितले आहे.
ही मागणी रास्त वाटते आहे.! |
भांगरे कुटुंबाला ५० वर्षाचा सामाजिक व राजकीय वारसा आहे. तर, त्यांच्या पाठोपाठ अशोक भांगरे यांनी ४० वर्षे तो रथ अविरत चालता ठेवला आहे. त्यामुळे, श्रीगोंदा पॅटर्नची पुनरावृत्ती अकोल्यात यशस्वी पार पाडणाऱ्या भांगरे यांना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी विधानपरिषदेवर घ्यावे. असे साकडे दिपक वैद्य, राजु कुमकर, विनोद हांडे, सतिष शिंदे, डॉ. रामहरी चौधरी, आर. के उगले, विकास बंगाळ, पाटीलबा सावंत, सुनील चौधरी, संतोष नाईकवाडी, अमित नाईकवाडी, सुनील चासकर, अनिल वैद्य, धिराज भाऊ, महेश शिंदे, राजु नवले, महेश तिकांडे, बबन वाळुंज, गीतराम वैद्य, संतोष बंदवणे, दत्ता बंदवने, गोपी भांगरे, गोरख कदम, गणेश शिंदे, अजय भांगरे, संतोष बंदवणे, मंगेश शिंदे, पंकज वैद्य, योगेश नाईकवाडी, रामहरी पांडे, प्रवीण वैद्य, अनिकेत शिंदे, सुनील चव्हाण, चंद्रकांत बंदवणे या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
- सागर शिंदे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)