पिचड-पांडेंची "शोलेची दोस्ती" तुटली.! ४० वर्षाच्या "मैत्रीत सोडचिठ्ठी"..!
जय..................विरु.! |
अकोले (प्रतिनिधी) :-
जोवर मधुकर पिचड यांचा चलता काळ होता. तोवर त्यांची "सावली" म्हणून तालुक्यातील ठराविक लोक अगदी त्यांना "देव" मानत होते. आता सत्ता गेली तर अचानक "देवाचा दगड" वाटू लागला आहे. वा रे..! निष्ठावंत. खरतर ही सुरुवात आहे. ज्यांच्याकडे पदे नाहीत. त्यांचा हा "बंड" आहे. उद्या बँक, झेडपी, कारखाना, पंचायत समिती, नगरपंचायत यांची पंचवार्षीक निवडणुक येऊद्या.! मग कळेल. "कोणी किती 'आडात' आहे, आणि कोण किती 'पोहऱ्यात' आहे". या सगळ्यांवर मात करायची असेल. तर, किमान वैभव पिचड यांनी तरी प्रवाहात कायम राहणे गरजेचे ठरणार आहे. कारण, अर्थकारणाने राजकारण बदलत नाही. याचा धडा तुम्ही घेतलाच आहे. त्यामुळे, आजची सावधानता उद्याचा फायदा.! असेच काहीसे बोलले जात आहे.
थोड्या दिवसाचे आम्हीही सहकारी.! |
आज (दि.१६) माजी मंत्री मधुकर पिचड यांचे जिवलग मित्र मिनानाथ पांडे यांनी ४० वर्षाच्या मैत्रीला तात्विक दृष्ट्या "पुर्णविराम" दिला. राजकारणातील जुने जाणते आजही सांगतात १९९५ ला पिचड साहेबांच्या विरोधात सगळ्यांनी "बंड" पुकारला. तेव्हा पांडे यांच्यासारखा नेता त्यांच्यामागे खंबिरपणे उभा होता. इतकेच काय ! त्यांच्या ४० वर्षात एकही निवडणुक अपयशी ठरु दिली नाही. पण, २०१९ ला साहेबांनी भाजपत प्रवेश केला आणि ते अपयशी ठरले. पांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. की, भाजपचे विचार आम्हाला "कालही मान्य नव्हते, आजही मान्य नाही, उद्याही नसेल", अर्थात पांडे साहेब मुळात आहेतच पुरोगामी आणि डाव्या विचार सारणीचे. पण, "मित्रत्वाचा" हा "उपदेश" म्हणा की "सल्ला". आता वेळ निघून गेल्यानंतर "अर्थशुन्य" आहे. हे स्पष्ट करायला ज्योतीषाची गरज नाही. जर, हे विचार पटत नव्हते. तर, तेव्हाच का भाजपच्या स्टेजहुन ते "पायऊतार" झाले नाही ? हे समजायला "पराभव होईपर्यंत" वाट पाहावी लागली का ? असे प्रश्न जनता विचारु लागली आहे.पांडे साहेबांचे "आदर्श" शरद पवार नक्कीच आहे. कारण, जेव्हा त्यांच्यावर "इडीने" कारवाई केली. तेव्हा पांडे साहेबांनी स्पष्टपणे कथन केले. की, ही कारवाई "आकसापोटी" करण्यात आली आहे. हाच खरा तेव्हा पिचडांना घरचा आहेर ठरला होता. कारण, खरे काय, खोटे काय.! याचे उत्तर निवडणुकीच्या काळात तरी द्यायचे नसते. हे पांडे साहेबांना कोणी सांगायचे होते.? म्हणून तर, नितीन गडकरी यांनी "भाजप मेघा भरती" विरोधी केलेल्या "स्टेटमेंन्ट" बाबत "संघाने" त्यांची "कानऊघडणी" केली. त्यानंतर ते गप्प बसले. पण, तरी त्याचा तोटा फडणवीस सरकारला नक्कीच भोगावा लागला.
एकीकडे पवार साहेबांना आदर्श मानत असताना त्यांच्या पाठीत खंजिर खुपसणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून देण्यासाठी दिवसरात्र एक करत होतात. हे तुम्ही विसला असाल. पण जनता विसरली नाही. त्यामुळेच की काय.! त्यांच्या बोलण्यातून प्रचंड विरोधाभास जाणविला. ते म्हणाले की, "मी अद्याप राष्ट्रवादीतच" आहे. भाजपचे सदस्यत्व घेतले नाही. हा किती मोठा "घुमजाव" आहे. पांडे साहेबांनी त्यांच्या अनेक भाषणात आपल्या भाजपच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. त्यासाठी राष्ट्रवादीच्या विरोधात सभा, बैठका घेऊन भाषणे ठोकली. आज पिचड पडले तर यांच्या तोंडून "शब्दप्रयोग" बाहेर पडले. "मी भाजपात कधीही नव्हतो". हे विखे पाटलांसारखे झाले. काँग्रेसमध्ये राहुन भाजपचा प्रचार करणे. त्यांनी तरी डॉ. सुजय विखेंचा गुप्त प्रचार केला आणि यशही मिळविले. तरी ते वारंवार स्पष्ट करीत होते. मी काँग्रेसचाच विरोधीपक्षनेता आहे. पण, यांनीतर भर सभेत भाजप स्विकारली आणि आता "थेट युटर्न" घेत आहेत. हे कोठेतरी "बोचण्यासारखे" आहे.
आता "दोस्तीत कुस्ती" होऊ पहात असली. तरी, दोन्ही मित्रांना भारतीय संविधानाने "व्यक्तीस्वातंत्र्य" दिले आहे. पण, नकळत आरोप प्रत्यारोपाने व्यक्तीदोष चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काल परवा पिचड साहेब म्हणाले.! ज्यांना मी मोठे केले. ते "बेईमान" झाले.! आता ते "बेईमान" कोण ? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, दुसरीकडे, त्यांचे "निकटवर्तीय" त्यांना सोडून जाऊ लागले आहेत. त्यामुळे, त्यांची "अस्वस्थता" चांगलीच वाढत आहे. अर्थात हा अपयशाचा एक "सदमा" आहे. तो का नसावा ? कारण, ४० वर्षाचा "विजयरथ" जनतेने रोखला. त्यात अनेकांनी "मालदार" होऊन घेतले आणि आता भेट घेण्यासाठी देखील कोणी येईनासे झाले आहेत. त्यामुळे, हा खेद का नसावा.? त्यांनी अनेक "बहुजन" नेत्यांना मोठे केले आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून "भ्रमनिराश" झाल्याचे "शल्य" चिडचिडत झाले. तर, बिघडले काठे ? त्यात काय वावघे आहे. ते देखील आता या नेत्यांना सहन होत नाही. उमेदवार का पडला.? याचा जाब देखील विचारु नये.! असे नेत्यांना वाटू लागले आहे. अर्थात ज्यांचे हात "सत्तेखाली गुंतलेले" नाहीत. त्यांनी साहेबांच्या विरोधात "बंड" पुकारणे सुरु केले आहे. तसेच जे सत्तेत आहेत. त्यांना सत्ता भोगेपर्यंत "हाताची घडी, तोडावर बोट" यापलिकडे पर्याय नाही.
संघ शिक्षण.! |
एक बाब जाणकारांना फार "अचंबित" करून जाते. पिचड यांचा "भाजप पक्षप्रवेश" फारच "जिव्हारी" लागला. पण, अशी कोणती अधोगामी विचारधारा अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी अवलंबविली होती. जी "पुरोगामी आणि डाव्या चळवळीला "काळींबा" फासणारी होती ? कदाचित असे एकही उदाहरण नाही. पण, किती "अवडंंबर" माजविला गेला, आणि गंमत अशी. की, समोरचा उमेदवार कोण होता ? जो कट्टर भाजप प्रणित ते देखील संघाचे संचलन, काठी, हाफचड्डीसह संघाचे विचार अंगिकारणारे व्यक्तीमत्व.! असे तर ४० वर्षात पिचड कुटुंबाला कोणी "हाफ चड्डीत" कोणी पाहिले नाही. "संचलन" करीत डोक्यावर टोपी परिधान करून रांगत चालताना ते कधी दिसले नाही. मग, "व्यक्ती" म्हणून त्यांना टाळले की "पक्ष" म्हणून.!! "विचार" महत्वाचा की "व्यक्ती" ? पण, इतिहास डोकाऊन सांगतो. की, कधीकाळी काँग्रेसला "कट्टर विरोध" करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील "काँग्रेसची उमेदवारी" करावी लागली होती. त्यात जनतेने त्यांना "स्विकारले" देखील. इतकेच काय ! कालपर्यंत शाहु, आंबेडकरांच्या नावे "पुरोगामीत्वाचा" टेंभा मिरविणारी राष्ट्रवादी रातोरात भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन करते. तेव्हा कोठे होती "वैचारिक चळवळ". त्यामुळे, व्यक्ती, पक्ष आणि विचार हे समजून घ्यायला. पहिले जनता सुज्ञ असावी लागते. हे बाकी नक्की.!