पिचड साहेब सावधान..! सदस्य, नगरसेवक आणि कार्यकर्तेही फुटत आहे.!

माजी..!!!...........आमदार...!!!

अकोले (प्रतिनिधी) :- 
                  "सुकाळ" असेल तर "भूत" देखील "मानसे" होऊन सोबत राहतात आणि "दु:खाची वेळ" असेल तर "मानसांचेही" भूत होऊन 'डिवचू' लागतात. हिच "राजकारणाची रित" झाली आहे. याचे उत्तम उदा. म्हणजे ज्यांनी ४० वर्षे पिचड साहेबांच्या मागेपुढे फिरुन "गडगंज प्रॉपर्टी" कमविली. तेच आता पडत्या काळात त्यांना सोडू पहात आहे. काल विधानसभा संपल्या आणि त्यात साहेबांना "अपयश" आले. आज त्यांना "आधाराची गरज" असताना त्यांची "नेते, कार्यकर्ते आणि नगरसेवक" देखील विरोधकांशी बैठका करु लागले आहेत. त्यामुळे, "सत्ताकेंद्र" हेच राजकीय फलित असल्याचे दिसते आहे.  अर्थात पिचड साहेबांनी देखील "बंड पुकारताना" तेच पाहिले होते. त्यामुळे, निष्ठेचा विषय येतोच कोठे.? पण, पवार साहेबांनी देखील यशवंतराव चव्हाण, वसंतदादा यांच्या "निष्ठेवर पाणी फिरविले" होते, हे देखील "बेदखल" करुन चालणार नाही. त्यामुळे, निष्ठेपेक्षा "नैतिकता" म्हटलं तर वावघे ठरणार नाही. पण, हे सगळेच "शब्दप्रयोग" २०१९ मध्ये राजकारणाने "लिलावात" काढताना आपण पाहिले आहे. त्यामुळे, सद्यातरी "राजकीय अस्तित्व" टिकवून ठेवण्यासाठी पिचड साहेबांना "संघटनात्मक मोट" बांधने आवश्यक ठरणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे "भाजप पक्षाला" अजेंड्यावर घेतले तर संघटनेचे यश "सारांश शुन्य" ठरेल. पण, भाजप पेक्षा "व्यक्तीगत" माजी मंत्री पिचड साहेब व माजी आमदार वैभव पिचड साहेब यांना माननारा वर्ग मोठा आहे. त्यांचे "भावनिक अॅटॅचमेंट" असणारे संघटन त्यांना तारु शकते. मात्र, त्यांनी "गोलवलकर आणि कट्टर हिंदुत्व" मांडून "भाजपचे बीज" पेरु पाहिले. तर ते "पुरोगामी" तालुक्यात रुजणार नाही. त्याचे फलित "पुन्हा अपयश" सोडून हाती काहीच येणार नाही. त्यामुळे, जे "फुटत" आहे. त्यांची "व्यक्तीप्रेमाची मोट" बांधने सद्या गरजेचे आहे. असे जाणकारांना वाटते आहे.

साहेब आम्हाला क्षमा करा...!

                              कालच एक कार्यक्रमात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी "शब्दप्रयोग" केला. "ज्यांना आजवर मोठे केले, तेच बेईमान झाले". अर्थात हे वाक्य सत्य आहे. हे २०१९ च्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. पण, साहेबांना हे देखील माहित असावे. की, तुमच्याच मांडीला मांडी लावून बसणारे देखील बेईमान होण्यासाठी फितुरांशी बैठका करू लागले आहेत. तुम्ही २०१९ च्या विधानसभेला गाफिल राहिलात. त्याचे फलित काय झाले ? आता दु:खावरच्या खपल्या काढायला नको वाटते. पण, शरद पवारांनी (दादांचा बंड) घरातून धोका खाल्ला. तर, तुम्ही कोण ? आज आजून "पद शाबूत" आहे म्हणून ठिक आहे. पण, ज्यांच्याकडे काही नाही. ते निष्ठावंतांचे झेंडे खाली ठेऊन पळू लागले आहे. आज ना उद्या तुम्हाला बंडाच्या धक्कादायक बातम्या हाती आल्या. तर, आश्चर्य वाटू देऊ नका.

निर्भिड, निष्पपक्षनिस्वार्थी.!

            उद्या पंचायत समितीच्या सभापती निवडी आहेत. एकीकडे तुमच्याशी हात मिळविणारे.! काळजी करू नका साहेब.! आम्ही तुमच्याच सोबत आहे. असे छातीठोक सांगणारे विरोधकांशी रात्री अपरात्री बैठका करू लागले आहेत. इतकेच काय ! नगरपंचयतीत काल जे तुमच्या नावाचा डंका पिटवत होते. तेच आज  शहरालगतच्या हॉटेलांत पार्ट्या करु लागले आहेत. आज तुमच्या बाजूने असणारे  स्पष्ट बहुमत उद्या एकमत करुन विरोधात गेले नाही म्हणजे बरे.! साहेब, ज्यांना तुुम्ही संधी दिली. त्यातले कोणी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. तर, कोणी राष्ट्रवादीच्या. कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल. पण, तुम्ही घेतलेला निर्णय हा आमच्यावर लादण्यात आला. आम्ही पर्यायशुन्य झालो. म्हणून भाजपत बळजबरीने जायची वेळ आली. नाहीतर, आम्ही फुले, शाहु, आंबेडकर विचारांचे बहुजन नेते. आम्हाला भाजप काय पचते का ? हेच शब्द बारामतीच्या कानी घालुन आल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे, निष्ठेला सुरुंग लागला आहे. यात सुदैव इतकेच.! की, वैभव पिचड यांच्यासोबत असणारी तरुण फळी अजूनही ठाम आहे. यांचे भाऊप्रेम कायम असून फक्त माजी मंत्री साहेबांचा धोतर, टोपी, फेटा, पायजमा, लेंघा, कुर्ता आणि पांढर कपडे धारकऱ्यांनी यावेळी मोठा घात केला. (जूनी जाणती मंडळी) त्यामुळे, आता कोणी म्हणत असेल. मरेपर्यंत फक्त साहेब.! तर त्याला विचारुन घ्या, नेमके कोणते साहेब. कारण, मतदार हरिश्चंद्रासारखे फार चतूर झाले आहेत.

साहेब.! हळूहळू सगळेच सोडून चाललेत ?

         आता विधानसभेच्या पराभवाचे शल्य मनात न बाळगत दोन्ही साहेबांनी व स्वत:ला निष्ठावंत म्हणणाऱ्या तरुणांनी ग्राऊंड लेवलवर येणे गरजेचे आहे. कारण, ही जनतेची प्रचंड विरोधी लाट आहे. त्यातून नैया पार करण्यासाठी जनतेत उतरणे भाग आहे. अन्यथा जनतेला २४ तास उपलब्ध होणारे आमदार कोण ! हे समजले. तरच जनतेच्या काळजाचा ठाव घेता येणार आहे. त्यातल्या त्यात  राऊतांचा वाढिवपणा, गांधी घराण्याला डिवचणे आणि हिंदुत्ववाद यामुळे महाविकास आघाडी फुटली. तर मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावेच लागेल. त्याचा फायदा जनसंपर्कामुळे होऊ शकतो. त्यामुळे, राजकारणात काहीही होऊ शकते. हे गृहीत धरुनच पाऊल टाकले. तर ते फायद्याचे ठरेल. असे जाणकारांचे मत आहे.                     सद्या राष्ट्रवादीच्या गोटातून पदाधिकारी होण्यासाठी प्रचंड मोठ्या हलचाली सुरु आहेत. ही रस्सीखेच भाजपसाठी अत्यंत घातक आहे. कारण, कोण किती व्यक्तींना फुटीर करतय. ही चुरस लागली आहे. त्यामुळे कोण "साहेबराव" होतय कि ही चढाओढ "संपत" नाही. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. अर्थात अजून भाजपमधील किती "नाथपंथी" स्वगृही परततात हे चित्र लवकरच उघड होईल. पण, त्यापुर्वी साहेबांनी ही गळती थांबविली तर ठिक. नाहीतर येणारा काळ भाजपं सोडा. साहेबांसाठी घातक ठरेल. म्हणून साहेब.!  सावधान..! वैऱ्यानं डाव साधला आहे. तुमचेच तुमच्या शेजारी बसून सावज होत आहे.!

 - सागर शिंदे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख १० हजार वाचक)