संगमनेरात "तहसिल" व वाळुतस्करांचा "नंगानाच".! धमकी देणाऱ्या त्या हितचिंतकावर गुन्हा दाखल.!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
वाळुतस्करांचे "प्याव उघडे" पाडणाऱ्या "पत्रकारास" अश्लिल "शिवीगाळ" करीत 'धमकी' देण्यात आली होती. इतकेच काय ! एक "खंडणीच्या" खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची "वाच्चता" करुन "तोंडदाबी" करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी "अपशब्द" वापरुन "मी हितचिंतक" आहे. असे म्हणणाऱ्या व्यक्तीवर गणेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली असून. दलाली करणाऱ्या पत्रकारांच्या "बिनबोल थोबाडात" मारल्यासारखे झाले आहे. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.
अदखलपात्र फिर्याद.! |
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश आहेर यांनी संगमनेर तालुक्यातील नांदुरखंदूरमाळ येथील "बनावट वाळू लिलावावर" प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्याची सखोल माहिती घेण्यासाठी आहेर यांनी "तहसिल" गाठले असता त्यांना अधिकाऱ्यांनी "अपमानास्पद वागणूक" दिली. इतकेच काय ? कार्यालयातून चालता हो, म्हणत "लोकशाहीत हुकूमशाही" गाजवू पाहिली. हे त्याच तहसिलमध्ये घडले. ज्या तहसीलने काल-परवा वाळुचे वाहन पकडून "अर्थ"पुर्ण हितसंबंध जोपासू पाहिले. जेव्हा "बोभाटा" झाला. तेव्हा तेच सोडून दिलेले वाहन पुन्हा कार्यालयासमोर आणून लावण्याची विनंती केली.हे तेच कार्यालय आहे. जेथे "वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करुण घेण्यासाठी अगदी 'निर्विवाद सहकार्य' केले जाते". हे तेच कार्यालय आहे. जेथे "वाळु तस्करांचे आड्डे" असल्याचे बोलले जाते आणि हे तेच कार्यालय आहे. जेथील अधिकारी महिलांना "डाळींब सोलून" देण्याची इच्छा बाळगतात. अशा ठिकाणी पत्रकार गणेशराव गेले. तो त्यांना घरचा "आहेरच" वाटला की काय ? त्यामुळे, चालता हो..! या पलिकडे शब्दच सुचले नाही.! इतकेच काय ! याच महाशयांनी त्यांच्यावर हितचिंतक म्हणून माणसे सोडली. आनंदाची बाब अशी की, हे हितचिंतक महाशय "शिव्या" घालून, "आयमाय" काढून 'समजून' सांगत होते. या "संगमनेरी भाषेची ख्याती" नव्याने बाहेर रुजू पहात आहे. आता काय समजून घ्यायचे आणि काय नाही. हे आहेर यांनी समजून घेतले आणि बिनबोल त्यांच्यावर गुन्हा ठोकला. आता त्यांच्या जिवीताला खरोखर धोका निर्माण होऊन बसला आहे. त्यामुळे, त्यांनी हा प्रकार "पोलीस अधिक्षक सागर पाटिल" यांच्या कानावर घातला आहे. त्यांच्या आदेशान्वे पुढील कार्यवाही होणार आहे. तसे पत्र साहेबांना पत्रकार संघाकडून प्राप्त होणार आहे.
आजकाल संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी जोर धरु लागला आहे. तर, दुसरीकडे हा अद्याप तालुकाच असून येथे श्रीरामपुर व नगर शहराच्या तुलनेत "गुन्हेगारी" फोपाऊ लागली आहे. चोऱ्या, अत्याचार, चेन स्नेचिंग, अपहारण, फसवणूक, खंडणी, रस्तालुट, वाळू तस्करी, राजकीय वादंग, रस्ते अपघात, अनियजित गर्दी, अतिक्रमण, सिग्नलांचे वाटोळे, कत्तरलखाने, देहविक्री व्यवसाय, अशुद्ध पाणी, अस्वच्छता, चोऱ्या, दरोडे, जातीय दंगली, राडे, छेडछाड, तोतया पत्रकार या आणि अशा कोणत्याही गुन्हेगारी विश्वात संगमनेर मागे राहिलेले दिसत नाही. त्यामुळे, जिल्ह्यासारखी सुसज्ज परिस्थिती येथे निर्माण झाली असून ठारविक व्यक्तींच्या हातात येथील सत्ता देणे योग्य की अयोग्य.! याचा विचार सरकार नक्कीच करेल. तुर्तास येथे फुले, शाहु, आंबेडकर व छत्रपतींच्या नावाचे "राजकारण" करुन "लोकशाहीचा गळा घोटू" पाहणारे "प्रशासन" आणि "मुठभर दलाल" यांचा "बंदोबस्त" जनतेने केला. तरच, खुलेआम होणारी ही "धमकीशाही" बंद होऊन येथे लोकशाही रुजेल. असे झाले. तर, सामान्य जनतेला त्याचा आनंद होईल. असे जाणकार व सुज्ञ नगरिकांना वाटते आहे.- सुशांत पावसे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख ५० हजार वाचक)