...तर "पिचड" म्हणतील तो "सभापती"..! अकोले "पंचायत" समितीत सदस्यांची "पंचायत".!

कौन बनाऐगा सभापती ?


अकोले (प्रतिनिधी) :-
                        अकोले पंचायत समितीत "सभापती" पदासाठी "ओबीसीचे आरक्षण" निघाले आणि सगळे "राजकिय गणित" बदलून गेले आहे. तसेही राज्याच्या "महाविकास आघाडीने" विचार, तत्व, मैत्री आणि धर्मवाद अशा अनेक पैलुंना धाब्यावर बसवून "रामानुज" व "पायथागोरस" अशा थोर 'गणित तज्ञांना' लाजवेल असे गणित यांनी जुळवून आणले आहे. त्यामुळे, सत्तेसाठी कोण कोणत्या थराला जाईल. हे "पुरोगामी" महाराष्ट्रातील "अधोगामी" राजकारण नवे राहिले नाही. मागिल पं. समिती सभापती निवडणुकीत "मारुतीने लंका जाळावी" आणि "सेनेचे साम्राज्य" क्षणात होत्याचे नव्हते व्हावे. असेच काहीसे होऊन गेले होते. (हा रामायनातील दाखला आहे) याचा प्रमाण अगदी अनपेक्षित वेळी काहीही होऊ लागले आहे. जसे अजित दादा रातोरात भाजपसोबत जातात काय ! आणि ८० तसात परतताय काय.! म्हणून, राजकारणात कोणी कोणाच्या जवळचा नसतो आणि कोणी कोणाचा विश्वासू देखील नसतो. म्हणून तर आता अकोले पंचायत समितीत राजकीय पक्षाची भेसळ झाली असून १२ सदस्यांची मोठी पंचायत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे, उद्याचा सभापती कोण ? हा तमाम अकोलेकरांना पडलेला प्रश्न आहे.!

कोण बनेगा सभापती ? 

                 राज्यात नुकत्याच "विधानसभा" निवडणुका झाल्या, त्याचा "सावळा गोंधळ" सुरु असतांनाच पंचायत समितींच्या "सभापती" पदाचा घाट पुढे आले. आता काही ठिकाणी ज्यांनी एकमेकांना अगदी गलिच्छ भाषेत आर्वाची शिवीगाळ केली. शब्दानी विवस्र केले. त्यांना महाविकास आघाडीच्या आशिर्वादाने पुन्हा एकमेकांच्या गळाभेटी घेण्याची वेळ आली आहे. इतकेच काय ! स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी भाऊ-दादा म्हणण्याची वेळ आणली आहे. तरी  हरकत नाही. हे राजकारणी सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे आपण पाहतोच आहोत. कदाचित हिच परिस्थिती अकोल्याच्या राजकारणात पहायला मिळणार आहे.
       येथे भाजप ०४, राष्ट्रवादी ०४ व शिवसेना ०४ असे १२ सदस्य पं. समितीवर निवडून गेलेले आहेत. यापैकी सभापती मेंगाळ वगळता सर्वांनीच वैभव पिचड यांना आमदारकीला पाठींबा दिला होता. असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. त्यामुळे, दराडे गट उघडा पडला होता. असे असले तरी,  या सदस्यांमागे जनता गेली नाही. परिणामी निकाल वेगळा लागला. या पलिकडे, पंचायत समितीत ओपनसाठी संधी असताना पिचड साहेबांच्या हस्तक्षेपाने सभापती व उपसभापती दोन्ही पदे आदिवासी समाज्यास गेले. त्यामुळे, शिवसेनेच्या नेत्यांना त्याची झळ बसली आणि नातेसंबंध जोपासताना "नामदेवे" जरी रचीला पाया, तरी "पिचड" कळस झाले.  त्याचे फळ बंडखोर मेंगाळ यांना मिळाले. आता, अमदारकीत मेंगाळ यांनी पिचड साहेबांवर चांगल्याच तोफा डागविल्या. तर साहेबांच्या स्टेजहुन शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोर म्हणत हा वाद कुत्र्यावर नेऊन ठेवला. त्यामुळे, शिवसेनेतील फुट आणि पंचायत समितीतील सदस्यांची पळापळ तालुक्याला पहायला मिळाली. आता मेंगाळ यांच्यासह ज्यांनी ओपनमधून निवडणुका लढविल्या आहेत. त्यांचा विषय संपला आहे. पण, जे ओबीसी आणि मराठा असून कुणबीत कनव्हर्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी हा राजयोग असणार आहे.!

किसको बनाऐगे सभापती ?

          आता एकंदर विचार करता. अशोक भांगरे, मच्छिंद्र धुमाळ व वैभव पिचड तसेच काही अंशी राष्ट्रवादीचे नेते यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.  असे असले तरी, वैभव पिचड यांच्या पराभवाने त्यांना ही सभापती व सातेवाडीची पोटनिवडणुक महत्वाची सोडा.! प्रतिष्ठेची असणार आहे. यावर स्वतंत्र व समग्र लेख लिहावा लागेल. मात्र, यातूनच त्यांना आपली ताकद उभी करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी अत्यंत जमेची बाजू अशी आहे. की, विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता सर्व सदस्य त्यांच्या बाजूने होते. आता कट्टर भाजप स्थिर राहिले आणि कट्टर राष्ट्रवादी अस्थिर झाले. तर, वैभव पिचड यांच्या कानाखालचा सभापती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
         आता काही झाले तरी, घोडेबाजारशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, कधीनव्हे अकोले पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आणि आता अगदी कधीनव्हे उद्या भाजपचा झेंडा फडकला. तर वाईट वाटू देऊ नका. आज घोडेबाजार होणार हे नक्की.! पण, येणारी पं. समिती, झेडपी, कारखाना, मार्केट कमिटी, नगरपंचायत, दुधसंघ, ग्रामपंचायती, या निवडणुका येणाऱ्या  आमदारकीच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे, पिचडांसाठी निवडणुका म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार असल्याचे जाणकारांना वाटते.

 - सागर शिंदे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)