विधानसभेत पहिल्याच दिवशी डॉ. लहामटेंना अडविले. कोण रे हे ? अरे..! सोडा-सोडा त्यांना ते आमदार आहेत - खा. सुळे
आरे सोडा मला सोडा ..! |
राज्यात कधी नव्हे इतका "सत्ता स्थापन" करण्यासाठी "पेच" निर्माण झाला होता. त्यामुळे, "घोडेबाजार" होण्याची दाट शक्यता होती. मात्र, "कुंपनच शेत खाऊन गेले". (दादांचा बंड) म्हणून ज्यांना निवडून दिले. त्यांनाच "संभाळण्याची" वेळ पक्षांवर आल्याचे पहायला मिळाले. हे "अविश्वासू आमदार" तूप रोटीत भिजविताना पक्षाने त्यांच्यावर "कोट्यावधी रुपयांचा खर्च" केला आहे. जोवर "शपतविधी" होत नाही. तोवर त्यांची प्रचंड उठाठेव करताना पक्षांना "नाकीनव" आल्याचे दिसले. पण, जेव्हा काल (दि.२७) सर्वांना "विधानसभेत" आणले. तेव्हा अकोल्याचे डॉ. किरण लहामटे यांना "सुरक्षा रक्षकांनी" पहिल्याच दिवशी "पहिल्याच गेटवर" अडविल्याचे दिसून आले. त्यांचा सर्वसामान्य पोषाख, गळ्यात भगवी मफलर, कपाळी टिळा आणि सफेद कुर्ता हे "गावचे व्यक्तीमत्व" गेटवर अडविले खरे.! पण, त्यांच्या मदतीला थेट "बारामतीच्या खा. सुप्रियाताई सुळे" धावून आल्या. "आरे..! सोडा-सोडा त्यांना. ते आमदार आहेत". असे म्हणत ताईंनी साद दिली आणि साहेब आत आले.
कदाचित डॉक्टर साहेबांनी स्वत:वर काहीतरी तरी "मिश्किन" केली आणि खासदार व आमदार "दिलखुलास" हासले. त्यामुळे, डॉक्टरांचे मन हलके व काळीज धिट होऊन ते पुढे चालते झाले. या प्रसंगाचा "व्हिडिओ" राज्यात चांगलाच "व्हायरल" झाला आहे. त्यानंतर "जय आदिवासीचा" जयघोष करुन साहेबांनी "शपतविधी" पार पाडून तब्बल एक "महिन्यानंतर" त्यांनी "विधीमडळचे सभासदत्व" आपल्या नावे करुन घेतले. पण, या सर्वात त्यांचा जो गडबड गोंधळ झाला. तो त्यांना प्रगतीपथावर नेवू शकतो. कारण, १९६० साली "विधानसभेच्या गॅलरीत" शरद पवारांचा जो "अपमान" झाला होता. त्याहुन प्रेरित होऊन साहेबांनी "देशाच्या राजकारणात" आपले "पाय घट्ट रोवले" आहे ते आजवर. पण, इकडे परिस्थिती वेगळी आहे. "डॉक्टरांना" काही सांगायला गेलं की त्यांचे "उतावीळ कार्यकर्ते टांगायला नेतात". त्यामुळे, 'चांगला मित्र तृट्या सांगू शकतो' आणि "स्वार्थी" मित्र "गुनगाण" गाऊन "चाटूगिरी" करून "गोड-गोड छापून, बोलून" बिनबोल "घात" करू शकतो. हे समजून सांगायला कोणी "बोळ्याने दुध" पित नाही. तरी लोकांना तेच गोड वाटतं. त्यामुळे, कोणी काही म्हणाले. तरी, "रोखठोक सार्वभौम" आपली भूमिका "रोखठोकच" पार पाडेल. यात शंकाच नाही.
ताई ..! मी काय आमदार वाटत नाही का ? |

"शरद पवार" आणि त्यांचे "आमदार" यांच्यात अगदी "जमीन आसमानचा" फरक आहे. एव्हाणा तुलनाच होऊ शकत नाही. कारण, "आमदार स्वत:हुन संपतात आणि पवार साहेब संपलेले उभे करतात". याला म्हणतात "पावर आॅफ पवार"! मी एका ठिकाणी वाचले आहे. सन १९६० साल होते. शरद पवार नावाचा तरुण बारामतीहुन पुण्याला शिकण्यासाठी आला होता. सहज वाटले आपण मुंबई पहावी. म्हणून चार गोष्टींचे त्यांना प्रचंड आकर्षण होते. त्यापैकी एक "विधानभवन" होय. नशिबीनं त्यांची पाऊले मुंबईत पडली. ठरलं तर मग.! पहिले विधानसभा पहायची. त्यावेळी आचार्य आत्रेंचे भाषण सुरु होते. आत जायला परवानगी नव्हती. पण, त्या सभागृहाच्या बाहेर गॅलरी होती. त्यात चारदोन खुर्च्या पडलेल्या होत्या. यांनी लगबगीनं जाऊन त्यावर आपली बैठक मांडली. मनात प्रचंड कुतूहल होते. त्यामुळे, डोळ्यांच्या पापण्या देखील ते खाली पडू देत नसे.
आत्रेंचे भाषण ऐकण्यात मग्न असताना अचानक पायावर पाय गेला आणि जणू आपण आमदारच आहोत की काय ! असा भास झाला. त्यांचे असे पाटीलकीसारखे बसणे पाहुन "मार्शल" आले आणि त्यांना सुचना केली. पाय खाली ठेऊन सरळ बसा. असे बसणे येथे अलाऊड नाही. सॉरी म्हणत पवारांनी पाय खाली घेतला. पण, स्वप्न इतकी बुलंद होती. की, सगळी आतुरता त्या राजमीजाशी व्यवस्थेकडे लागली होती. त्यामुळे, पुन्हा त्यांचा पाय पायवर गेला. आता मात्र "मार्शल" आले आणि त्यांनी पवारांची थेट "कॉलर पकडून" गॅलरीच्याही बाहेर काढले. तो प्रसंग त्यांच्या "जिव्हारी" धाव करु गेला. जाता-जात तोच पवार नामक मुलगा त्या मार्शलला ओरडून सांगत होता. लक्षात ठेवा..! आज तुम्ही काॅलरला हात घालून बाहेर काढलेत. पण, आता या विधानसभेत येईल तर थेट आमदार म्हणूनच पाय टाकील. त्यानंतर फार काळ लोटला नाही. १९६७ साली शरद पवार आमदार होऊन त्याच विधानसभेत गेले. किती काळीज हेलावणारा प्रसंग आहे. आज आपल्याला फक्त ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. तर, हे स्वप्न वास्तवात उतरविणाऱ्या पवारांची मनस्थिती काय असेल. हा मुलगा येथेच थांबला नाही. तर, १७ जुलै १९७८ साली म्हणजे वयाच्या ३८ व्या वर्षी तो या स्वतंत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. याला म्हणतात अपमानाचा सकारात्मक बदला घेणे.
म्हणून, डॉ. लहामटे यांना साहेबांनी संधी दिली आहे. आज आमदार झाले. उद्या चांगला स्वभाव आणि संयम ठेवला तर कदाचित राज्य मंत्री होतील. पुढे तोंडात साखर आणि रोषविरहीत मन ठेवले तर कॅबिनेट मंत्री होतील. याही पलिकडे आपले कोण आणि परके कोण, निष्ठावंत कोण आणि सोंग घेऊन मागे-पुढे फिरणारे कोण ! हे ओळखले तर वर्षानुवर्षे तालुक्याचे आमदार आणि राष्ट्रवादीचे विश्वस्त म्हणून बहुमान प्राप्त करतील. अन्यथा येरे माझ्या मागल्या.! हेच चित्र पहायला मिळेल. हे त्यांच्या भोळ्या भक्तांनी नमुद करुन ठेवावे.
आता पहिल्या फेरित कदाचित साहेबांची वर्णी लागेल अशी शक्यता फारच धुसर आहे. पण, पुढील विस्तारात त्यांना नक्की संधी मिळू शकेल. असे चिन्ह आहे. जिल्ह्यात किती मंत्रीपदे मिळतात. यावर त्यांचा विचार होऊ शकतो. पण, एक मात्र नक्की. जर डॉक्टर "शातीर" होण्यापेक्षा "माहिर" झाले. तर, येणाऱ्या काळात त्यांचा इतिहास अगदी रंजकतेने लिहीला जाईल. कारण, पहिल्याच दिवशी, पहिल्याच गेटवर आडविलेला आमदार "टिंबटिंब" झाला. हे सांगताना इतिहास देखील गर्वाने फुलून जाईल आणि त्याहुन अकोलेकरांची छाती दुप्पट फुगलेली असेल.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले
यांना विनम्र अभिवादन !!
लवकरच रोखठोक सार्वभौम नावाचे वृत्तपत्र येत आहे. त्यासाठी निर्भिड, निष्पक्ष, अभ्यासू, विनालाचार, स्थानिक व सुशिक्षीत तरुणांना पत्रकार होण्याची संधी मिळणार आहे. योग्यवेळी जाहिरात सोडली जाईल. खालील मेल आयडीवर अर्ज सेंड करा.