"छ. शिवराय व भिमरायांना मी "नतमस्तक" होतो; जातीचे "राजकारण्यांचा" बंदोबस्त करु :- आ. लहामटे"
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोल्याचे नवनिर्वाचीत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान माझ्या मनात आहे. त्यामुळे, माझ्या शपथविधीचा कोणी विपर्यास करू नये. असे त्यांनी स्पष्ठ केले आहे. गेल्या २४ तासापासून सोशल मीडियावर शिवसैनिक व मराठा समाज्याने आमदारांवर रोष व्यक्त केला होता. शपथ घेत असताना छत्रपती शिवराय व डॉ. भिमराव यांचे नाव का घेतले नाही. त्यामुळे, संभाजी ब्रिगेड, सकल मराठा समाज क्रांती मोर्चा, बहुजन संघटना व दलित संघटनांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. त्याला अनुसरुन रोखठोक सार्वभौमने लेख लिहीला होता. या सर्वांचा परामर्श घेऊन आमदार किरण लहामटे यांनी आपले स्पष्टीकरण दिले असून विरोधकांना धमकीवजा विनंती केली आहे. जातीयवाद कराल तर तुमचा बंदोबस्त करावा लागेल. अशा परखड शब्दात आपल्या भावना व्यक्त करत छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे.
![]() |
हात जोडतो, जाती पातीचे राजकारण नको.! |
डॉ. लहामटे म्हणाले, मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. तालुक्यात मला विकासाचे राजकारण करायचे आहे. लोकांनी एकोप्याने येऊन मला आमदार केले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात विकास करायचा असून गलिच्छ राजकारण करायचे नाही. शिवरायांना मी आदर्श मानले नसते तर मी त्यांच्या जन्मभुमिची माती कपाळी लावून माझा अर्ज भरला नसता. छत्रपती हे महराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचे स्थान माझ्या मनात आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी इथवर आहे. त्यांच्या राज्यघटनेलाच साक्षी ठेऊन मी शपथ घेतली आहे. त्यामुळे, त्यांचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे आहे. म्हणून, तालुक्यातील जनतेने गैरसमज करून घेऊ नये. या तालुक्यातील प्रत्येक माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून तर मी तालुक्याला माझे कुटुंब मानतो. या तालुक्याची ख्याती मला सर्वदूर न्यायची आहे. त्यामुळे, जनतेने मला साथ द्यावी हीच विनंती आहे.तालुक्यात जी काही राजकीय पिलावळ आहे. त्यांच्यामुळे जाती व धर्मभेदाचे बीज जनतेत पारले जात आहे. ते विकासाला घातक असून जनतेला मारक आहे. त्यामुळे, गैरसमज करू नये. मी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बीरसा मुंडा, राघोजी भांगरे व ज्यांनी-ज्यांनी हा महाराष्ट्र व देश घडविण्यास क्रांतीची मशाल हाती घेऊन बलिदान दिले. त्या सर्वांना मी नतमस्तक होतो. असे, आमदारांनी स्पष्ट केले.
आता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह अणखी दोघे शपथ घेऊ शकतील.