शपथविधीत शिवरायांचा जयघोष नाही.! नेटकरी नाराज आ. लहामटेंना दाखविले काळे झेंडे

नेटकऱ्यांचा संताप........!

अकोले (प्रतिनिधी) :-
              अकोल्याचे "नवनिर्वाचीत आमदार" डॉ. किरण लहामटे यांनी "विधानसभेत" आज "गोपनियतेची शपथ" घेतली. आज खऱ्या अर्थाने ते "आमदार" झाले असून त्यांची विधीमंडळाच्या दरबारी "आमदार" म्हणून नोंद झाली आहे. तालुक्याला या गोष्टीचा "अत्याआनंद" होत असला. तरी त्यांनी विधानसभेत शपथ घेतल्यानंतर शेवटी "छत्रपती शिवरायांचे" नाव घेणे अपेक्षित होते. इतकेच काय तर ज्या "डॉ. बाबासाहेबांनी" त्यांना ही "संधी" उपलब्ध करून दिली. त्यांचे देखील नाव घेणे अपेक्षीत होते. असे "सोशल मीडियात" त्यांच्याच नावाने सुरु असलेल्या अनेक "गृपवर चर्चा" सुरु आहे. या राजकारण्यांना "फुले, शाहु, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज" केवळ "भांडवल" करायला लागतात का ? निवडणुका संपल्यानंतर यांच्यातला "खरा धर्म" जागा होता का ? अशी टिका आता डॉ. लहामटे यांच्यावर होऊ लागली आहे. त्यामुळे, ज्या "विश्वासाने" त्यांना मोठ्या "मताधिक्याने" जनतेने निवडून दिले. त्यांच्याकडून भावनिक "भ्रमनिराश" होऊ लागला आहे की काय ?असा प्रश्न तरुण वर्गासह त्यांच्यासाठी "आहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी" केला आहे. त्यांनी राघोजी भांगरे व बिरसा मुंडा, जय आदिवासी असे प्रकर्षाने नमुद केले. त्याबद्दल कोणालाही "दुमत" वाटले नाही. मात्र, तुम्हाला निवडून देण्यासाठी जो समाज झटला. त्यांचा "आदर्श" तुम्ही "महाराष्ट्राची अस्मिता" असणाऱ्या विधीमंडळ ठिकाणी मांडला नाही. याचा "खेद" उफाळून आल्याचे पहायला मिळाले आहे.
                   अकोले तालुका हा "पुरोगामी" आणि "डाव्या चळवळीचा" असल्याचे आजही ओळखले जाते. मात्र, येथे अनेक "संधीसाधुंनी" तालुक्याची परंपरा मोडीत काढल्याचे आजवर पहायला मिळाले आहे. १९७२ पुर्वीचा इतिहास पाहिला तर बुवासाहेब नवले यांनी तालुक्यात सळसळते क्रांतीकारी रक्त पेरले आहे. त्यांच्यासह यशवंतराव भांगरे, दादासाहेब गायकवाड, हमीदभाई फारुकी, साथी मेहता, भाऊसाहेब हांडे, बी.के देशमुख, मधुकर पिचड, दशरथ सावंत, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, यांच्यापर्यंत मात्तबर मंडळींनी तालुक्याचे वैभव कायम ठेवले. यांच्या पाठोपाठ वैभव पिचड, मधुभाऊ नवले, डॉ. अजित नवले, सिताराम पाटील गायकर, विनय सावंत, विजय वाकचौरे, सुरेश खांडगे, शांताराम संगारे याच्यासह अनेकांनी तालुक्याला वैचारिक ठेवण दिली. अर्थात तालुक्याला डाव्या चळवळीचे तरी म्हणता येईल. असे वातावरण तरी कायम ठेवले. परंतु, पिचड कुटुंबाचा एक निर्णय तालुक्यात खळबळ माजवून गेला. त्यामुळे, जनतेने भाजपसापखा जातीयवादी पक्ष स्विकारला नाही. परिणामी जनतेने डॉ. किरण लहामटे यांना पर्याय म्हणून निवडले. एकिकडे धनशक्ती व दुसरीकडे जनशक्ती असाच काहीसा सामना झाल्याचे पहायला मिळाले.
         

आमदार साहेब..! हे वागण बर नव्ह..!

कधी नव्हे तालुक्यातील शिवसैनिकांनी भगव्या मफलरीकडे पाहता. मातोश्रीचे आदेश देखील पाळले नाही. जय भवानी, जय शिवाजी असा नारा देत  हजारो मावळे डॉक्टरांच्या सोबत दौडले. इतकेच काय ! डॉक्टरांनी अर्ज भरण्यापुर्वी चक्क शिवभक्तांची अस्मिता म्हणून शिवनेरी सर करून मराठा तरुणाची मने जिंकली. ज्या वाड्या वस्त्यांमध्ये दिन-दलित समाज राहतो. त्यांच्यात जाऊन जयभिमचा नारा दिला. म्हणून तर बघता बघता त्यांच्या भोवती मतदारांचे जाळे उभे राहिले. या दरम्यान जेव्हा कधी सभा असे. तेव्हा शिवराय ते भिमराय हा नारा त्यांच्या तोंडून कधीच चुकला नाही. म्हणून तर जयभिम बोलो और किधरभी चलो.! हेच चित्र दिसून आले. एरव्ही विकला जाणारा समाज डॉक्टरांच्या पाठीशी ठाम होता. मात्र, जेव्हा त्यांनी सकाळी विधानसभेत शपथ घेतली. तेव्हा त्यांनी केवळ आदिवासी म्हणून स्वत:ला प्रतित केले. हा महाराष्ट्र कधी कोणाला विसरत नाही. उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहे. त्यांनी संसदेत शपथ घेताना राज्यांचा नामोल्लेख केला नाही. तर त्यांची खरडपट्टी काढली होती. हा अगदी ५ पहिन्याचा देखील काळ नाही. त्यामुळे, अस्मितेच्या आपेक्षा आपल्याच मानसांकडून असतात. त्या भंग पावल्या की मनाला प्रचंड वेदना होतात. असेच काहीसे आज पहायला मिळाले आहे.
        डॉक्टरांनी राघोजी व बिरसा या थोरांची नावे घेतली. त्यामुळे आदिवासी समाज्यात किती नवचैतन्य भरुन आले आहे. सगळ्या गृपवर त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. परंतु, त्याच संदेशाने ज्यांनी तुम्हाला मतदान मागताना शिवरायांच्या घोषणा देताना पाहिले. तेच निवडून आल्यानंतर ठराविक घोषणा देऊन शिवबा आणि भीमाला विसरत असतील. तर, तो नक्कीच त्या समाज्याचा अपमान आहे. एकवेळी जय महाराष्ट्र म्हणून ते थांबले असते. तरी कोणाला गैर वाटले नसते. पण, त्यांच्या संकुचित जयजयकाराने अकोलेकरांची मने खरोखर दुखावल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळाले. अर्थात अकोल्यात तिकांडे, खांडगे, नाईकवाडी, साळवे, नवले, शेणकर यांसारख्या बहुजन चेहऱ्यांनी शिवरायांचा जयघोष करुन मते मागितली, तसेच ज्या विनय सावंतांनी पुरोगामीत्वाचे झेंडे मिरविले. त्या सर्वांना उद्या कोणी शिवराय व भिमराय केवळ मते मागण्यापुरतेच चालतात का ? असा प्रश्न केला. तर त्यांनी वाईट वाटू घेऊ नये. कारण, वैचारिक लोकांनी तुमच्याकडे पाहुन मते दिली आहेत. त्यामुळे, याचे उत्तर देणे हे तुमचे उत्तरदायीत्व आहे. अर्थात त्यांचे उत्तर "नया है वह".! असेच असणार आहे. परंतु, आता साहेब यदाकदाचित मंत्री  झालेच तर, शपथ घेताना तरी अशी चुक करणार नाही. अशीच मापक अपेक्षा करूया.
जय शिवराय, जय जिजाऊ, जय संभाजी, जय फुले, शाहु, आंबेडकर, लहुजी, बिरसा, राघोजी जय महाराष्ट्र..!!

- सागर शिंदे


=============


                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 110 दिवसात 220 लेखांचे  13 लाख 30 हजार वाचक)