अजित पवारांनी" "शरद" पवारांच्या पाठीत "खंजिर" खुपसला..! काय म्हणाले शरद पवार.

शरद पवारांची पत्रकार परिषद

अजित पवारांवर कारवाई होणार म्हणजे होणार !!

मला अजितने केले. त्याबाबत मला यत्किंतही शंक नव्हती.!

अजित पवार गेले तरी भाजपकडे बहुमत सिद्ध होणार नाही.!

राजकारण म्हणजे रात्रीस खेळ चाले असे नाही.

इडी वैगरेसाठी किंवा सुप्रिय सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल.  असे कोणाला वाटत असेल. तर ते चूक आहे.

जे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीसाठी गेेले होते. त्यांना देखील अगदी काहीच माहित नव्हते. ते पुन्हा निघून आले.

बहुमत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. आम्ही सरकार स्थापन करु.!

राष्ट्रवादीतून कोणी गेले. तरी मला काही फरक पडत नाही. १९८० साली ५६ आमदार फुटून ६ बाकी होते. तरी मी परत ६० केले होते.

जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. ते पुन्हा माघारी येत आहेत.

आता जर फेर निवडणुक लागली. तर अजित पवारांचा देखील पराभव करु..!

पक्षांतर बंदी कायद्यामुळे आमदार फोडणे वाटतं तितकं सोपं नाही. दोन तृतीअंश संख्याबळ फुटत नसते.

अजित पावारांनी राज्यपालांची व आमची देखील फसवणूक केली आहे.

जे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यांच्या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या. तर, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस तीन पक्ष मिळून समोरच्या उमेदवाराचा पराभव करु.


पाठीत खंजिर खुपसला !!


असे करायला नको होतं.!


                  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सरकार स्थापन होत असताना राष्ट्रवादीचा अजित पवार गट रात्रीतून बाहेर पडला आणि पहाटे त्यांनी भाजपला पाठींबा देऊन सुर्य अंधाराच्या गर्भात असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ५४ आमदार सोबत घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पवार हे गटनेता असल्याने त्यांच्याकडे जी आमदारांची यादी आहे. त्यानुसार ते पाठींबा देऊ शकतात. त्यात प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर पवार गटासोबत किती आमदार आहेत. हे पहावे लागणार आहे. यात महत्वाचे म्हणजे अध्यक्ष निवडीत गुप्त मतदान होत असते. त्यामुळे, कोणाचे मत कोणाला गेले हे अध्यक्ष निवडीनंतर लक्षात येईल. या व्यतिरिक्त अजित पवार यांना जे ५४ आमदारांचे पत्र गटनेता म्हणून दिले होते. त्याचा गैरवापर केल्याचे मलिक म्हणाले आहे. त्यामुळे, अजित पवार यांनी नक्कीच शरद पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसला हे निच्छित झाले आहे. दादांच्या या कृतीने महाराष्ट्राला १९७८ ची आठवण झाली आहे. की, शरद पवार यांनी काँग्रेस पक्षात असताना वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधील ४० आमदार फोडून पुलोद सरकार स्थापन केले व स्वत: मुख्यमंत्री झाले. अगदी तशीच पुनरावृत्ती आज २०१९ मध्ये पहायली मिळाली आहे. त्यामुळे, पेरले ते उगू लागले आहे की काय ? किंवा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ लागली आहे की काय असा प्रकार जनतेला दिसू लागला आहे.

काका, मामा, दादा, क्षमा असावी.!

       सन १८ जुलै १९७८ चे साली दोन्ही काँग्रेस विधानसभेला अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला ९९, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा पवार साहेब त्यात "उद्याेगमंत्री" होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नसे. त्यांना कंटाळून  पवारांनी सर्वात मोठी चाल खेळली. आणि त्यावेळी  ते ४० आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले. परिणामी सरकार अल्पमतात आले. वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहुन पायऊतार व्हावे लागले.
त्यावेळी, शरद पवार, यांनी "जनतादलाशी" बैठक घेऊन म्हणजे, आजच्या "भाजपच्या पाठींब्याने" सरकार स्थापन केले. अखेर, १८ जुलै १९७८ रोजी "पवार प्रणित भाजपची सत्ता" महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या ३८ वर्षी पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस व वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याच इतिहासाला अनुसरुन आज अजित पवार यांनी ५४ आमदार घेऊन भाजपला साथ दिली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे, पवारांच्या पाठीत दादांनी खंजिर खुपसला असेच म्हणावे लागले.

हम साथ साथ है !

        आता कायदेशीर बाबी लक्षात घेता. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते आहे. जर, राष्ट्रवादीने दादांवर अविश्वास दाखविला. तर, प्रथमत: दादांची पक्षातून हकलपट्टी करावी लागणार आहे. तर, दादांनी ५४ आमदारांच्या हजेरी यादीचा गैरवापर केला आहे. असे राज्यपालांना सांगावे लागणार आहे. जरी आमदार फुटणार असतील. तर, दोन तृतीअंश आमदार म्हणजे जवळजवळ ३८ आमदार एकाच वेळी बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे, दादांचा पाठींबा कितपत टिकेल. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
          एकीकडे रात्रीस खेळ चाले. हे दिसून येत असतना शरद पवार यांना सकाळीच क्लेर केले. की, अजित पवार यांचा निर्णय हा राष्ट्रवादीचा नाही. त्यामुळे, कधी नव्हे हा कुटुंबकलह पहायला मिळाला आहे. पार्थ पवार यांच्या मावळ उमेदवारी पासून तर इडीच्या चौकशीपर्यंत पवार कुटुंबात कलह पहायला मिळाला. तरी, शरद पवार यांनी दादांना सामावून घेतले होते. त्यानंतर, विधानसभा निवडणुका त्यांनी शितापीने हताळल्या. त्यानंतर चांगले यश मिळाले आणि शरद पवार यांनी सत्ता स्थापनेसाठी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि अंतीम नरेंद्र मोदी यांच्या भेटी घेऊन सत्तेची गणिते जुळवू पाहिले. यात अजित पवार कोठेही नसताना त्यांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. ! हे अनाकलनिय आहे. यात शरद पवारांचा हात नसेल. असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. कारण, इडीच्या चौकशा, केंद्रात आणि राज्यात सत्ता या सर्वांवर उत्तर मिळणार असेल. तर, ही चाल खेळलेली राष्ट्रवादीला कधीही साधक आहे. त्यामुळे, ही नौटंकी म्हणायची की अनपेक्षित खळबळ. हे येणारी ३० नोव्हेंबर सांगेल. कारण, राज्यपालांनी सात दिवसांचा काळ बहुमत सिद्ध करण्यासाठी दिले आहे.
  - सागर शिंदे

===============

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)