राज्यात राजकारणाला नवे वळण, देेवेंद्र फडणविस पुन्हा मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री शपथविधी पहाटे संपन्न

मुख्यमंत्री..! उपमुख्ययमंत्री

अकोले (प्रतिनिधी) :- राज्यात      
                         महाविकासआघाडीच्या हलचाली सुरु असताना  रात्रीतून वेळ बदलली असून पहाटे राष्ट्रवादी व भाजप यांनी सत्ता स्थापन केली आहे. सकाळी सकाळी मुंबईत राजभवनात राजपालांच्या समक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविस यांनी शपथ घेतली. तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. हा १९५२ ते २०१९ पर्यंत कधी नव्हे असे वळण राजकारणाने घेतला आहे. यामुळे, शिवसेना व काँग्रेस तोंडघाशी पडली असून शरद पवार यांनी पुन्हा पाठीत खंजिर खुपसला की काय ! अशी चर्चा सुरु झाली आहे.
बसा सगळे बाेंबट्या मारत.!
   
 एकीकडे राष्ट्रवादीने सगळ्यांना उताविळ करून सोडले  आणि हजार बैठका आणि शेकडो भेटीगाठी होऊन देखील सरकार स्थापन होऊ शकले नाही. परिणामी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणाऱ्या फडणविस यांनी सुर्योदयाच्या गर्भात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी. पण, राष्ट्रवादीचा एखादा गट भाजपाला भिडलाय का ? ह पाहणे महत्वाचे आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेथे सगळे राजकारण बदलून गेले आहे.

'चर्चा संपत नव्हती. नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढत होत्या. असंच सुरू झालं तर स्थिर सरकार कसं मिळणार हा माझ्यापुढे होता. म्हणून मी हा निर्णय घेतला,' असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, 'कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळासारखा प्रश्न आ वासून उभा असताना राज्याला स्थिर सरकारची अत्यंत गरज होती. सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणताही निर्णय होत नव्हता. त्यामुळे हे सरकार स्थापन झाले आणि मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देतो की त्यांना अखेर स्थिर सरकार मिळाले आहे.

    - सागर शिंदे
   - सुशांत पावसे

===============

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)